Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सासपड़े में नाबालिग लड़की की निर्भस हत्या: फास्ट्रैक ट्रायल और फांसी की सिफारिश

TTTUSHAR TAPASE
Oct 16, 2025 10:14:30
Satara, Maharashtra
सातारा - सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. राज्‍य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Oct 16, 2025 13:57:36
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 13:56:42
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष गंभीर बनला असून बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षी चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून आक्रमक शेतकऱ्यांनी बेल्हे जेजुरी महामार्ग रोखून आंदोलन सुरू केलंय. गेली पाच तासांपासून हे आंदोलन सुरू असून भर पावसात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधी या आंदोलनाला उपस्थित आहेत. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून आमच्या हद्दीत बिबट्या नकोच वनविभागाने त्यांच्या फॉरेस्टच्या जागेत बिबट्याचा बंदोबस्त करावा यांसारख्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सुरू आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 16, 2025 13:36:53
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये नागरिकांचे गर्दीच्या ठिकाणांहून तसेच घरातून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता, जो अकोला पोलिसांनी शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द केला आहे.पोलिसांनी विशेष मोहिम राबवून चोरीच्या मोबाईल फोनचा मागोवा घेतला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून संबंधित व्यक्तींना शोधण्यात आले आणि त्यांच्याकडून मोबाईल तसेच इतर वस्तू जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आल्या.या मोहिमेत काही दुचाकी आणि मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे.आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. दिवाळीपूर्वी आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांनीच आपली दिवाळी उजळवली असल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा अकोला पोलिसांचा जोर कायम असल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 16, 2025 13:17:06
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; पोस्को अंतर्गत दुसऱ्यांदा कारवाई खेड तालुक्यातील वारकरी संप्रदायाशी संबंधित भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या प्रकरणात भारतीय दंड संहिते कलम 64(2), 65(1), 74, 351(3)(5) तसेच POCSO अधिनियमाच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यात कोकरे महाराज यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती, मात्र आज त्या पहिल्या प्रकरणात त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) मिळाली आहे. दरम्यान, याच दिवशी नव्याने आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, कोकरे महाराज पुन्हा अडचणीत आले आहेत. तपास यंत्रणांनी आता या दोन्ही प्रकरणांचा तपास एकत्रितपणे वेगाने सुरू केला असून, आश्रमातील कार्यकर्ते आणि संबंधित व्यक्तींची चौकशीही सुरु आहे. या प्रकरणामुळे खेड व चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. POCSO कलमांनुसार हा गुन्हा गंभीर आणि अजामिनपात्र असल्याने, पुढील काही दिवसांत या प्रकरणात निर्णायक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 16, 2025 13:16:52
Thane, Maharashtra:भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार आणि दिवाळी भत्ता न मिळाल्याने कामगारांनी केला निषेध... दिवाळीनिमित्त, संपूर्ण शहर प्रकाश आणि आनंदाच्या उत्सवाच्या तयारीत व्यस्त असताना, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा कामगार त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. आशा कामगारांनी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवत म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांना त्यांचे मानधन (पगार) मिळालेले नाही आणि त्यांचा दिवाळी भत्ताही रोखण्यात आला आहे. नाराजी व्यक्त करताना आशा कामगार म्हणाल्या, "आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस शेतात काम करतो. मध्यरात्री गर्भवती महिलेच्या प्रसूतीबद्दल फोन आला की आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतो. पण आता, सणासुदीच्या काळातही, आम्हाला आमचे मानधन आणि बोनस दिला जात नाही. यामुळे आमच्या कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे."
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 13:04:16
Nashik, Maharashtra:Slug - Bharat Kokate Byte अँकर - राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भावाने आज नाशिकमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची बातमी आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भारत कोकाटे यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांच लक्ष लागलय. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे या इच्छुक असतांनाच भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं भारत कोकाटे यांनी म्हंटलय.. बाईट - भारत कोकाटे, माणिकराव कोकाटे यांचे बंधू
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 16, 2025 12:46:00
Mumbai, Maharashtra:मुंबई शहरात प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियमॅक मंडळाने बडगा उचलायला सुरुवात केली आहे. भांडुपच्या लेक रोड परिसरामध्ये न्यूकेम प्रॉडक्ट्स कॉर्पोरेशन कंपनीला राष्ट्रीय ग्रीन लवादाने चोवीस लाख पस्तीस हजारांचा दंड ठोठावला आहे. या परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी हरित लवादाकडे या परिसरात प्रदूषणाचा थर वाढला असल्यासंदर्भात तक्रार केली होती, ज्यानंतर हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट देऊन पाहणी केली असता या न्यूकेम प्रॉडक्ट्स कॉर्पोरेशन हा उद्योग वैध परवानगीशिवाय चालू असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यूकेम कंपनीला २४.३७ लाखांची पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारली आहे.वरील आदेशानुसार ही भरपाई रक्कम पत्र प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या नावे जमा करण्याचे निर्देश या कंपनीला देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे न्यूकेम प्रॉडक्ट्स कॉर्पोरेशन कंपनी मोठ्या अडचणीत सापडली असून या कंपनीचे संचालक निमिष सुरा यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 16, 2025 12:45:49
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 16, 2025 12:41:35
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पश्चिम येथील गजानन वडापाव’ या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चटणीत अळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी खाण्यासाठी वडापाव घेतला असता, त्यामधील चटणीत अळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या प्रकाराची माहिती दिली. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी त्वरित ही बाब महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. राजेश सावंत यांनी तातडीने वडापावच्या दुकानात पाहणी करून, आरोग्य विभागाला सूचित करत संबंधित दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या या तात्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, अशा अस्वच्छ खाद्य विक्रेत्यांवर नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे。
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 16, 2025 12:01:24
Thane, Maharashtra:भिवंडी महानगरपालिके समोर शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा... शाळेची इमारत धोकादायकच्या नावाखालं मुलांना केलं स्थलांतरित.... भि.नि.श.मनपा संचालित प‌द्मानगर तेलुगु माध्यमिक ही शाळा इ.८ वी ते इ.१० वी पर्यंत एकूण ६५ विद्यार्थ्या शिक्षण घेत आहेत. तेलुगु माध्यमिक शाळा सन २००९ पासून सुरू करण्यात आली होती. प्रभाग समिती क्र. ३ मध्ये असलेली शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेली शाळा क्र ५९ च्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थांलातरीत करण्यात आले. शाळा क्र ५९ च्या इमारती मध्ये इ.१ पहिली ते इ.७वी पर्यत पहिलेच एकूण तीन शाळा भरतात. शाळा कं-५९ (तेलुगु माध्यम) विद्यार्थी संख्या ७०, शाळा कं ५५ (मराठी माध्यम) विद्यार्थी संख्या - १४०, शाळा के - ३६ (हिंन्दी माध्यम) विद्यार्थी संख्या असून एकूण वर्ग खोल्या १२ आहेत. माध्यमिक शाळेची इमारत ११/१०/२०२५ रोजी तोडण्यात आली. ती शाळा तोडून शाळे ऐवजी जिम व हॉल बांधण्यात येणार आहे. असं झाले तर तेलुगु समाजातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी स्वंतत्र इमारत रहणार नाही. सध्या शाळेतील इ.८ वी ते इ.१०वी चे वर्ग शाळा क्र.५९ मध्ये भरवण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांची गैर-सोय होत आहे. भविष्यात शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्ग खोल्या उपलब्ध राहणार नाही. यासाठी शाळेक्या विद्यार्थी पालक व शिक्षक सगळेच मिळून मनापावर आपल्या हक्क न्यायासाठी येऊन धडकले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top