Back
चिपळूण के कोकरे महाराज पर POCSO केस: नया आरोप दर्ज
PPPRANAV POLEKAR
Oct 16, 2025 13:17:06
Ratnagiri, Maharashtra
चिपळूण-भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; पोस्को अंतर्गत दुसऱ्यांदा कारवाई
खेड तालुक्यातील वारकरी संप्रदायाशी संबंधित भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या प्रकरणात भारतीय दंड संहिते कलम 64(2), 65(1), 74, 351(3)(5) तसेच POCSO अधिनियमाच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यात कोकरे महाराज यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती, मात्र आज त्या पहिल्या प्रकरणात त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) मिळाली आहे.
दरम्यान, याच दिवशी नव्याने आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, कोकरे महाराज पुन्हा अडचणीत आले आहेत. तपास यंत्रणांनी आता या दोन्ही प्रकरणांचा तपास एकत्रितपणे वेगाने सुरू केला असून, आश्रमातील कार्यकर्ते आणि संबंधित व्यक्तींची चौकशीही सुरु आहे.
या प्रकरणामुळे खेड व चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
POCSO कलमांनुसार हा गुन्हा गंभीर आणि अजामिनपात्र असल्याने, पुढील काही दिवसांत या प्रकरणात निर्णायक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:19:143
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 06:19:052
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:07:490
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 06:05:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:48:214
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 09, 2025 05:37:521
Report
AKAMAR KANE
FollowNov 09, 2025 05:36:311
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:35:433
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 05:34:503
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:21:202
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 09, 2025 05:02:577
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:01:597
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 05:01:234
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 04:48:4011
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 04:48:2711
Report