Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा में संभाजी महाराज की पुण्यतिथि पर मौन पदयात्रा, नागरिकों की भीड़

TTTUSHAR TAPASE
Mar 19, 2026 01:30:37
Satara, Maharashtra
सातारा - स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त सातारा शहरातून सायंकाळी मूकपदयात्रा काढण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने ही मूकपदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. साताऱ्यातील शिवतीर्थ ते राजवाडा अशी ही मूक पदयात्रा काढण्यात आली होती
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 02:16:43
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर स्टेशन विभाग अंतर्गत पंचवटी परिसरात मध्यरात्री अचानक इंडियन कोब्रा नाग दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शांततेत झोपलेल्या परिसरात एका महिलेच्या किंकाळीने वातावरणच हादरले आणि क्षणार्धात नागरिक घराबाहेर धावत आली.समोर फणा काढून उभा असलेला विषारी नाग पाहताच नागरिकांच्या अंगावर शहारे आले. नाग पाहण्यासाठी काही वेळातच परिसरात नागरिकांची गर्दी उसळली, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चपळाईने आणि अत्यंत सावधगिरीने त्या विषारी नागाला पकडले. फणा फुगवत असलेल्या नागाला त्यांनी सुरक्षितपणे भरणीत बंद केले आणि नागरिकांचा मोठा धोका टाळला.यानंतर सर्पमित्रांनी या नागाला जंगलात सोडत परिसर सुरक्षित केला。
452
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 12:48:42
Yavatmal, Maharashtra:देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत, अनेक उपाय योजना त्यासाठी होत असताना, भुलथापा देऊन सायबर फसवणुकीचे गुन्हे घडविणाऱ्यांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्याच हातावर तुरी देत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार यवतमाळच्या उमरखेड येथे उघडकीस आला आहे. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांची एका सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्याने दोन हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. आपण पोलीस महासंचालकांचा खबरी आहोत असे भासवून या भामट्याने एसडीपीओ गायकवाड यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला. उमरखेड परिसरात मोठा गुन्हा घडणार आहे सात पिस्टल, 18 जिवंत काडतूसे, सहा किलो एमडी ड्रग घेऊन एक कार बस स्थानक समोर येणार आहे. तसेच संशयित आरोपी एका लॉज मध्ये थांबलेले आहेत अशी खोटी माहिती त्यांना देण्यात आली. एसडीपीओ गायकवाड यांनी वरिष्ठांच्या कामात विलंब नको म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. त्याने मित्राच्या अकाउंटवरून दोन हजार रुपये पाठविले. दरम्यान पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू केला असता सांगितलेली माहिती खोटी निघाली व ज्या मोबाईल वरून कॉल आला तो देखील स्विचऑफ झाला होता. पोलिसांना खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
999
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 18, 2026 12:46:47
Rui, Maharashtra:बारामती मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव कायम... अजित दादांच्या नावाचा काढलेला अध्यादेश सरकारने घेतला मागे.... DATE 18 Mar 26 बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय सलग्न सर्वोपचार रुग्णालयास देण्यात आलेलं दिवंगत नेते अजितदादांचं नाव शासनाने अखेर मागे घेतला आहे. या निर्णयाच धनगर समाजातील नेत्यांनी स्वागत केलं आहे. राज्य सरकारने बारामती मधील सर्वोपचार रुग्णालयाला अजितदादांचे नाव दिल, त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने नऊ मार्च रोजी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केलं होतं. अखेर समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा जीआर मागे घेतला आहे. या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहात माहिती दिली आहे. राज्य सरकारने 13 मार्च 2026 रोजी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सलग्न सर्वोपचार रुग्णालयासही तेच नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. बाईट_ नवनाथ पडळकर, भाजप नेते
1086
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 12:46:28
Shirur, Maharashtra:पुणेाच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी गाव... आज हे गाव केवळ सुन्न नाही, तर संतापाने पेटून उठलंय! ज्या मातीत लहान मुलं खेळायला हवी होती, त्याच मातीत एकामागून एक दोन निष्पाप जीवांचा बळी गेलाय. १२ वर्षांच्या साईराज मांजरेची हत्या ही केवळ एक घटना आहे, की एखाद्या 'सिरीयल किलर'च्या विकृत मानसिकतेची चाहूल? असा भयावह प्रश्न आता संपूर्ण पुणे जिल्ह्याला पडलाय. हे केवळ योगायोग असूच शकत नाही! ज्या ऊसाच्या शेतात साईराजचा मृतदेह आढळला, अगदी त्याच जागी...त्याच शेतात आणि त्याच अवस्थेत... २१ महिन्यांपूर्वी १० वर्षांच्या यश गायकवाडचाही असाच अंत झाला होता. यशच्या मृत्यूवेळी बिबट्याचा संशय होता, पण हैदराबाद फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टने बॉम्ब फोड़ला – यशचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालाच नव्हता! तरीही यंत्रणा ढिम्म राहिली. तपासाची चक्रं वेगाने फिरली नाहीत आणि आज त्याचाच परिणाम म्हणून साईराजचा घात झाला. एकाच 'डेथ स्पॉट'वर दोन चिमुरड्यांचा 'गेम' होतो, याच प्रश्नावर आज दहिवडीकरांनी घटनास्थळावरच ठिय्या मांडला. 'जोपर्यंत नराधम समोर येत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही' हा ग्रामस्थांचा पवित्रा पोलिसांनाही घाम फोडणारा होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि अवघ्या काही तासांत पोलिसांनी एका संशयिताला बेड्या ठोकल्या. पण तपासात जे समोर आलंय, ते ऐकून तुमचेही पाय कापतील. संशयित आरोपी 'बाय-सेक्सुअल' असल्याची माहिती असून एका विकृत वासनेपोटी या चिमुरड्यांचा बळी दिला गेला का? २१ महिन्यांपूर्वीच्या त्या गूढ हत्येचा सूत्रधारही हाच आहे का? की हा केवळ एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा एक दुवा? धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेला संशयित आणि मृत साईराज हे मित्र होते. एका मित्रानेच आपल्या मित्राचा असा क्रूर बळी घ्यावा? या प्रश्नाने माणुसकीही सुन्न झाली है. आरोपी जेरबंद झाला असला तरी, साईराज आणि यशच्या कुटुंबाचे अश्रू थांबलेले नाहीत. दहिवडीच्या त्या ऊसाच्या शेतात नेमका कोणता सैतान लपला होता, हे आता समोर येईलच. पण प्रश्न उरतो तो सुरक्षिततेचा! समाजात वावरणाऱ्या अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांपासून आपल्या चिमुरड्यांना वाचवणार कोण? हे प्रतिनिधी: हेमंत चापुडे झी मीडिया, शिरूर, पुणे.
1010
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 12:32:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम...नव्या समीकरणाची नांदी... अँकर - सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर भाजपाचा करेक्ट कार्यक्रम झालाय,जयंत पाटील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या त्रिमूर्तीनी भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून रोखत,महाविकास आघाडीचा झेंडा सांगली जिल्हा परिषदेवर फडकवलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटात पडलेली उभी फुट हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली,त्या जोरावर महाविकास आघाडीने भाजपाला सांगली जिल्हा परिषदेत सत्ते पासून रोखले आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाविकास आघाडीने फडकवला जिल्हा परिषदेवर झेंडा जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि विशाल पाटील त्रिमूर्तीनी भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून ठेवलं चार हात लांब सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला बसला मोठा धक्का व्हि वो - सांगली जिल्हा परिषदेत सत्तेपासून भाजपाला रोखण्यात महाविकास आघाडीला अखेर यश आले आहे. भाजपाचा अध्यक्ष होईल असा दावा वारंवार पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून करण्यात येत होता मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत,सांगली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) व्ही वो - वास्तविक सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हता,मात्र काँग्रेस महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती,महाविकास आघाडीचे 30 सदस्य संख्या निवडून आले,अवघ्या एका जागेमुळे महाविकास आघाडी ही सत्तेपासून दूर होती,भाजपाचे अवघे 16 सदस्य निवडून आले होते ,तर शिवसेना शिंदे गटाचे सात,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा असे सदस्य आणि जनसुराज्य व रयत क्रांती संघटनेचे प्रत्येकी एक,त्यामुळे भाजपाच्या सत्तेची मदार मित्र पक्षांवर अवलंबून होती. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर.. भाजपा - 16 राष्ट्रवादी अजित पवार - 06 शिवसेना शिंदे पक्ष - 07 रयत क्रांती संघटना - 01 जनसुराज्य शक्ती पक्ष - 01 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 18 शिवसेना ठाकरे पक्ष -01 व्ही वो - जिल्ह्यातील स्थानिक राजकारण जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर संघर्ष व भाजपा विरोधात असणारा रोष, यामुळे जयंत पाटील,विश्वजीत कदम,विशाल पाटील,रोहित पाटलांनी एकत्रित एक राष्ट्रवादी अजित पवार गटाला निवडणूक आधीच सोबत घेतलं होतं,त्यामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जोरावर सत्ता स्थापनेची व्यूहरचना आखली होती. व्हि वो - परंतु महायुती म्हणून राज्यातल्या सत्तेच्या समीकरणाप्रमाणेच जिल्हा परिषद सत्तेत देखील राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत येईल,अशी अपेक्षा भाजपाला होती, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात उभी फूट पडल्याने चार सदस्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याने,भाजपाची गोची झाली,मात्र तरी देखील निवडणुकीत चमत्कार होईल,अशी अशा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाच्या नेत्यांना होती. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा. व्ही वो - काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकत्रित भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून रोखायची अशी रणनीती आखली होती,माजी खासदार संजयकाका पाटील,यांनी ऐनवेळी भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी ट्विस्ट येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात होती. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार, - राष्ट्रवादी अजित पवार . व्ही वो - मात्र राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी माव विकास आघाडी सोबतच जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील या 34 मतांनी अध्यक्ष पदाच्या निवडीत तर उपाध्यक्ष पदाच्या निवडीत काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे विजयी झाले त्या दोघांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार स्वप्नाली मासाळ जाधव यांचा नव मतांनी पराभव केला. व्ही वो - सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडीने यश तर मिळवलंचं,याशिवाय सांगली जिल्ह्यात भाजपाला रोखण्यासाठी नव्या समीकरणाच्या नांदीची सुरुवात झाल्याचे देखील दाखवून दिलंय..
965
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 12:32:11
Bhimashankar, Maharashtra:खासदार निशिकांत दुबे यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग? Anc :- भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान गंभीर प्रकार समोर आलाय Vo :- झारखंडचे खासदार निशिकांत दुबे हे दर्शनासाठी भिमाशंकरला हेलिकॉप्टरने आले असताना, लँडिंगसाठी वापरण्यात आलेल्या स्मोक मार्करमुळे जंगल परिसरात आग लागल्याची घटना घडली होती सुदैवाने आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही, मात्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या या भागात अशा प्रकारामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या घटनेमुळे नियमांचे पालन, सुरक्षा आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
1022
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 18, 2026 12:31:57
Ambernath, Maharashtra:पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या बदलापूर पोलिसांनी केली पतीला अटक बदलापूर पूर्वेतील यादवनगर परिसरात कौटुंबिक वादातून चंद्रकांत थोरात नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीची कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून हत्या केली आहे. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी पत्नीची हत्या करणारा आरोपी चंद्रकांत थोरात याला बेड्या ठोकल्या आहेत. या बाबत बदलापूर पोलिस वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, पती पत्नी्मध्ये सातत्याने कौटूंबंधिक वाद सुरु होता. या दोघांची १७ वर्षाची मुलगी आहे. ती रात्री बाहेर का फिरते ? या वरुन पत्नी अश्विनी थाेरात आणि पती चंद्रकांत थोरात यांच्यात वाद होता. या वादातून मंगळवारी परत एकता याच कारणावरुन वाद झाला. मुलगी झोपली असता चंद्रकांत थोरात यांनी गळा आवळून पत्नीची हत्या केली. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
1084
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 12:18:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरकर सध्या स्वयंपाकाच्या गॅस टंCnाईने हैराण झालेत. 2-2 आठवडे बुकिंग केले असले तरी सिलिंडर घरी पोचत नसल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. आपली मजुरी, व्यवसाय बुडवून ग्राहक रांगेत उभी आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, महिलाही या कारणासाठी तासनतास तिष्ठत आहेत. ओटीपी येऊनही सिलिंडर घरपोच येत नसल्याने एजन्सीवर तोबा गर्दी उसळली आहे. एजन्सी धारकानाही कंपन्यांकडून अनियमित गॅस सिलिंडर पुरवठा होत आहे. मोठ्या प्रयत्नाने सिलिंडर मिळाले तर अति धोकादायक गॅस सिलिंडरची ग्राहकांना दुचाकी आणि आटो मधून वाहतूक करावी लागत आहे. नागरिक गॅस टंचाईमुळे नियम भंग करण्यास बाध्य आहेत. भरलेले गॅस सिलिंडर मिळाल्यावर विश्व चषक मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.
1097
comment0
Report
Advertisement
Back to top