Back
सातारा जिला परिषद अध्यक्ष चयन के बाद महायुती में मंत्री-युद्ध तेज
TTTUSHAR TAPASE
Mar 22, 2026 08:16:14
Satara, Maharashtra
सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर महायुतीतीलच चार मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई ,मंत्री मकरंद पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. नेमकं काय झालं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवडीवरून यावरचा हा रिपोर्ट... व्हिओ 1- सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. महायुतीतील भाजप ने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेनेने राष्ट्रवादी ला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली.65 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 27 तर राष्ट्रवादीला 20,शिवसेनेला 15 जागांवर विजय मिळाला पण 33 जागांची मॅजिक फिगर कोणालाच गाठता आली नाही.त्या नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्याचे सदस्य फुटू नये यासाठी त्यांना निकालानंतर बाहेर अज्ञात स्थळी पाठवून दिले.таб्बल 45 दिवस हे सदस्य गायब होते.मात्र भाजपने राष्ट्रवादी चे 2 तर शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात यश मिळवले.मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निवडीच्या दिवशी राष्ट्रवादीचा अजून एक सदस्य फोडत 2 राष्ट्रवादीचा सदस्यांना अपहरणाचा गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केली त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.या नाट्यमयी घडामोडी नंतर भाजपला 33 मॅजिक फिगर गाठता आली आणि त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा भाजपने ताब्यात घेतले.यावेळी राष्ट्रवादीचा दोन सदस्यांना पोलिस अटक करतेवेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले.या अटकेवेळी भाजपाने पोलिस बलाचा वापर केल्याचा आणि पोलिस भाजपचा घरगड्यासारखे वागल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे . बाईट - मंत्री शंभूराज देसाई व्हिओ 2- दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलिस येत असतील तर या सारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नसल्याची टीका मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे. बाईट -मंत्री मकरंद पाटील व्हिओ - तर अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील कसे घेऊन येऊ शकतात असा सवाल उपस्थित करत यांनी 45 दिवस त्यांनी त्यांचा सदस्यांना डांबून ठेवल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.त्याच बरोबर मंत्री देसाई पोलिसांना वेटीला धरण्याचे काम करतात असा आरोप देखील गोरे यांनी केला आहे. बाईट - मंत्री जयकुमार गोरे व्हिओ 4- पोलीसांच्या कारवाईत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी आडवे पडणे योग्य नव्हते आम्ही त्यांच्यावर हल्ला आम्ही केलेला नाही बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हिओ 5- एकूणच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून साताऱ्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे भविष्यात हा वाद विकोपाला जाणार की senior_midस्थी नंतर थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 22, 2026 09:09:07994
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 08:31:021085
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:171080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:17:441082
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 08:04:131048
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 07:42:021010
Report
SKShubham Koli
FollowMar 22, 2026 07:40:391009
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 07:01:311084
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 22, 2026 07:00:491076
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 22, 2026 07:00:361077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 06:38:121008
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 22, 2026 06:36:231039
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 22, 2026 06:36:09978
Report
AKAMAR KANE
FollowMar 22, 2026 06:17:221057
Report