Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में विष्णुदास भावे गौरव पदक: नीना कुलकर्णी को सम्मान

SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 08:03:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली फ्लॅश स्लग - यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री, नाटककार नीना कुलकर्णी यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगलीतील विष्णुदास भावे गौरव पदक समितीकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमिदिनी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रोख रुपये, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे यंदाचे हे ५७ वर्षा असुन रंगभूमी वरील उल्लेखनीय कामगिरी दरवर्षी नाट्य क्षेत्रातल्या कलाकारांनी व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 10:17:35
Bhandara, Maharashtra:अल्पवयीन बालिका के साथ बलात्कार के दोषी दीपक हलमारे को 5 वर्ष की सश्रम सजा... अवघ्या नऊ वर्षांच्या बालिकेसोबत बळजबरी करून कुकर्म करणाऱ्या सेलोटी (ता. लाखनी) येथील दीपक कुसोबा हलमारे या नराधमास पाच वर्षांच्या सश्रम कारावासासह २५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसात १५ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. आपल्यााच नात्यातील एका नऊ वर्षीय बालिकेशी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध कलम ३७६ (ए बी) ३५४ (ए) ३५४ (बी) भादंवि सह कलम ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. साक्षीपुरावे आणि साक्षीदारांच्या बयानावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा कोर्ट दुसरे भारती काळे यांच्या न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 10:12:50
Bhandara, Maharashtra:देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत भंडारा येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डमध्ये चालणान्या एका देह व्यापार अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे. भंडारा हद्दीतील एका दुमजली राहत्या घरावर धाड टाकण्यात आली असता, मुख्य आरोपी संगीता धारगावे (वय 45 वर्ष) आणि तिच्यासोबतचे अन्य दोन आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलाना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गंभीर प्रकरणी, आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 03, 2025 09:46:18
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 03, 2025 09:35:51
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 03, 2025 09:32:45
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या काळा तलावात "कमर्शियल फूड प्लाझा".. झाडं तोडून बनवला जातोय फूड प्लाझा.. वॉकला येणाऱ्या नागरिकांचा विरोध.. कॅफेच्या जागेवर फूड प्लाझा सुरु करा. कल्याण डोंबिवली मधील विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक काळा तलावाचे स्मार्ट सिटी च्या माध्यमातून शुशोभीकारण करण्यात आले होते. या सुशीभिकरनाच्या माध्यमातून फूड प्लाझाची उभारणी देखील केली होती. हा फूड प्लाझा ताठे बंद असतानाच काळा तलाव जॉगिंग ट्रॅक च्या बाजूला फूड प्लाझा च्या नावाखाली गाळे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे कोट्यवधी खर्चून उभारण्यात आलेला हा फूड प्लाझा अद्यापही बंद आहे मग नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी व्यायामासाठी असले या जागेवर नव्याने गाळे उभारण्याचे गरज काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. धक्कादायक म्हणजे झाडे तोडून हे काम सुरू आहे त्यामुळे सकाळी संध्याकाळी येणाऱ्या नागरिकांनी वॉक, आणि व्यायाम कुठे करायचा. रोज सकाळ संध्याकाळी हजारो लोक या ठिकाणी येत असतात आधीच सोयीसुविधা नाही एक ओपन जिम आहे त्याची पण दूरवस्था आहे स्वच्छता नाही, फूड प्लाझा सुरु केले तर घाणीचे साम्राज्य पसरेल यामुळे नागरिकांनी विरोध केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 03, 2025 09:13:50
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे शहराचे लाडके दैवत बालाजी रथोत्सव मिरवणूकिला सुरुवात झाली आहे. श्री बालाजी भगवान यांच्या रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या बालाजी रथोत्सवाला तब्बल १45 वर्षांची परंपरा आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला विविध धार्मिक विधीचे आयोजन केले जाते. बालाजी भक्त याकाळात मनोभावे बालाजीची सेवा करतात. नवरात्री उत्सव नंतर हा रथोत्सव साजरा केला जात असून, रथाला फुलानी सजवला जात. बालाजी भगवंताची मूर्ती वर्षातून फक्त एकदा या रातोत्सवासाठी बाहेर काढली जाते. शहरातील सर्व प्रमुख चौकामंधून बालाजीची मिरवणूक काढली जाते. हा रथ ओढण्याचा मान बाजार समितीतील हमालांना असून, संपूर्ण शहरात हा रथ फिरवीत असताना त्याच नियंत्रण हमाल बांधव करतात. हा रथ उत्सव २४ तासांपेक्ष जास्त वेळ चालतो. यादरम्यान जिल्ह्याभरातील नागरिक रथ ओढण्यासाठी धुळ्यात दाखल होतात. यावेळी केळीचा प्रसाद ठिकठिकाणी वाटला जातो. भगवान बालाजीच्या औक्षणासाठी आणि एका मुख दर्शनासाठी भाविक तासंतास प्रतीक्षेत राहतात.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 03, 2025 09:13:39
Pune, Maharashtra:शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यातून भाजपवर निशाणा साधला. त्यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांना दुसरं काही काम नसून कोणत्या वळणावर काय राजकारण करावे याचं भान जर नसेल तर त्यावर काय बोलावं अशी खोचक टीका विखे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यापेक्षा ते राजकारण करणार असतील तर त्यांची बौद्धिक दिवाळखोरी म्हटलं पाहिजे, अशा लोकांची मला कीव येते असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे. काल झालेल्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत ते एकत्र राहण्यासाठी असा उल्लेख करत ठेकरेंच्या युतीचे संकेत दिले असल्याचं बरोबर होते. कोणी एकत्र आल तर काहीही परिणाम होत नाही, महायुतीचे सरकार पूर्ण ताकतीने उभे आहे. ज्यांच्या सोबत जनता नाही ते एकत्र येऊन काय उपयोग असा टोला त्यांनी लगावला आहे. आरक्षणाबाबत सरकारने आम्हाला जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण केले नाही तर दिवाळीनंतर आम्ही एकाही मंत्राला बाहेर फिरू देणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या भावनेचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. बऱ्याच वर्षांपासूनचे मराठा आरक्षणाची मागणी होती त्याबाबत पहिला टप्प्यात आम्ही कारवाई केली आहे बाकीच्या त्यांच्या मागण्या आहेत त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली असून आपण पुढे चाललो आहोत, आश्वासन स्पष्ट झाले तर दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय शिक्षण गुणवत्तेच्या सर्वेक्षणात अहिल्यानगर जिल्हा टॉप 50 मध्ये नसल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह आहेत. त्यांनी केंद्राचा अहवाल जर असेल तर उपाययोजना करावी असे म्हटले. नंतर अतिवृष्टीच्या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल याबद्दल विचारले असता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळेत मुलभूतपणे मदत मिळेल अशी अपेक्षा आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. अमित शहा महाराष्ट्रात येत असल्यामुळे त्यांनी दिलेल्या भेटींची चर्चा झाली असून दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही देखील अमित शहा यांच्याशी बोलू असे त्यांनी म्हटले.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 03, 2025 09:13:20
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 03, 2025 09:12:53
Chandrapur, Maharashtra:ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेजच्या मागणीसाठी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे चक्का जाम आंदोलन. सुमारे 120 टक्के पर्जन्यमान सोसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेजच्या मागणीसाठी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात आंदोलनात सहभाग घेतला. चंद्रपूर- नागपूर महामार्गावर या आंदोलनाने दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेज द्या , शेतकऱ्यांनाहेक्टरी 50 हजार मदत द्या, संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा मागण्या याप्रसंगी पुढे रेटण्यात आल्या.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 03, 2025 08:20:02
Mumbai, Maharashtra:अँकर --चुनाभट्टी पोलीसांनी ३० लाख ४८ हजार १०/- रू. किमतीचे एकूण १८३ मोबाईल हस्तगत करून आंतरराष्ट्रीय टोळीस जेरबंद करण्यात आलं आहे. गेल्या ३० सप्टेंबर रोजी चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी यांनी त्यांचा बस स्टॉपवरून ३५,०००/- रू. किमतीचा आय फोन चोरी झाल्याची तक्रार दिली होती त्यावरून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. सदर पथकाने नमुद गुन्हयाचा कसोशिने तपास करीत तांत्रिक मदत व गुप्त बातमीदार यांचा कौशल्यपूर्ण वापर करून व विचारपूस तंत्राच्या आधारे सदर गुन्हयात आरोपी सचिन लक्ष्मण गायकवाड, तौसिफ आयुब सिध्दीकी, अमर गौरीलाल शंकर, निसार असिक हुसेन आलम, सादिक अली मैनुद्दिन शेख, मुर्शीद मन्सूर सिध्दिकी यांना मुंबई नवी मुंबई परिसरातून तर प्रदिप विश्वनाथ गुप्ता, अझिझुर अनिसुर रेहमान यांस कोलकत्ता येथून अशा ०८ आरोपीतांस अटक करून ३०लाख ४८ हजार ०१०/- रू. किमतीचे १८३ विविध कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयात आणखी ०६ आरोपीत निष्पन्न झाले असून त्यामध्ये काही बांगलादेशी आरोपीतांचा समावेश आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 08:17:03
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस नेते। ओबीसीची उद्या बैठक - मुख्यमंत्री ने निमंत्रण दिया है। 10 अक्तूबर को हम मोर्चा निकालेंगे, इसकी चर्चा के लिये संदेश आया है। हमारी 2 सप्टेंबर चा जीआर रद्द करने ही मांग होगी। यह मांग महाराष्ट्र के सभी ओबीसी संगठनांची है। उदयाच्या ओबीसी बैठकीत सकारात्मक निर्णय हुआ तो मोर्चा आगे बढ़ेगा; सरकार के प्रतिनिधि से आपसी समाधान की भाषा 10 अक्टूबर नागपूर में होने वाले मोर्चे को लेकर होनी चाहिए। 2 सप्टेंबर का जीआर ओबीसी के हिस्से को नुकसान पहुँचाने वाला है. मोर्चा निकलने की भावना ठंडी नहीं है; गाडियाँ बुक की गई हैं और विदर्भ व महाराष्ट्र से 40 प्रतिनिधि बैठक में उपस्थित रहेंगे। 40 ओबीसी नेताओं की सूची मुख्यमंत्री कार्यालय को दी गई है। उन्हें बुलाकर समाधानकारक तोडगा निकालना है। उद्या ओबीसी बैठकी में सकारात्मक निर्णय हो तो भी हमारा मोर्चा निकलने की योजना जारी रहेगी; मोर्चे के आगे सरकार के प्रतिनिधि क्या कर रहे हैं यह बताना होगा, ताकि ओबीसी समाज का ग़ुस्सा शांत हो सके। ठाकरे बन्धु एकत्र - दो भाई एक साथ आना किसी के खिलाफ नहीं है; सकारात्मक दृष्टि से देखते हैं। राज ठाकरे के उद्धव ठाकरे के साथ मिलकर Metro region में फायदा होगा। स्थानीय भूमिका के अनुसार आघाडियाँ बनेंगी। शिंदे टीका- पाकिस्तान मेळावा - उद्धव ठाकरे का मेळावा दिशादर्शक रहा; कांग्रेस के साथ आने पर पाकिस्तान मेळावा की बात कही गई। महाराष्ट्र में अब व्यक्तिगत टीका कर जनता के प्रश्न पीछे धकेले जा रहे हैं; विकासात्मक मुद्दों को छोड़ दिया जा रहा है। KYC मुले लाडकी बहिण पैसे दिवाळीत - केवायसी आदि के कारण लाडकी बहन को भुगतान के रूप में फायदा मिल रहा है; जिल्हा परिषद व महानगर पालिका चुनाव के कारण यह प्रथा है। स्थिति राज्य के कर्ज से चिंतित है; दिवाळी के समय लाडकी बहन योजना को समाप्त करने की सरकार की योजना दिखती है। इलेक्ट्रिक बॉण्ड - इतिहास में बड़ा टेक्नॉलॉजी का उपयोग; ऑनलाइन स्टाम्प ड्यूटी के समय से यह व्यवस्था है; इलेक्ट्रिक बॉण्ड की आवश्यकता है। जरांगे- मुंडे टीका - राज्य की सरकार ने गलत राह ली; भाषा नीचे स्तर की हो रही है; मराठा, वंजारी, धनगर, बंजारा के बीच संघर्ष कराने का प्रयास हो रहा है। जरांगे पाटिल की भाषा निंदनिय है; सरकार को ठोस भूमिका लेनी चाहिये। मनोज जरांगे अल्पयुषी - ईश्वर से दीर्घायु की प्रार्थना; समाज में सौहार्द बना रहे। यादव ठाकरे (हिंदी) - भाजप का हिन्दुत्व ढोंगी है; देश की स्थिति बनानी के लिये हिन्दुत्व के नाम पर भटकाने का प्रयास जारी है; उद्धव ठाकरे सही बोलते हैं। महाराष्ट्र बदनामी - प्रधानमंत्री विदेश यात्रा पर भारत में जन्म लेने पर टिप्पणी; राहुल गांधी ने कहा कि देश कर्जदार है; हिन्दू-मुस्लिम मंदिर-मस्ज़िद के मुद्दे जारी रहते हैं और सत्ता में बने रहने के लिए दांव-पेंच चलते हैं।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 07:21:18
Nagpur, Maharashtra:Bawankule Byte On उद्धव ठाकरे दसरा मेळावा - - उद्धव ठाकरे यांची मानसिकता विकृत झाली आहे, निवडणूक हरल्यानंतर ते मानसिक दबावात आहेत.. - कालचा उद्धव ठाकरेंचं भाषण विकृती दर्शविणारा होता असं मला वाटतं, त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता त्यांना सिरीयस घेत नाही.. - महाराष्ट्राला कळल आहे की कोण खरं कोण खोटा.. On उद्धव ठाकरे यांच्या टारगेटवर आता भाजप - आता भाजपाला टार्गेट यासाठी आहे की 51 टक्के मत घेण्याची क्षमता भाजपमध्ये महायुती मध्ये आहे.. - उद्धव ठाकरे यांना माहित आहे की भाजप वर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही, भाजप आता खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेत आहेत On ई बॉन्ड - - महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग इलेक्ट्रॉनिक बॉन्ड लाँच करतोय.. आता ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला स्टॅम्प पेपरची गरज नाही.. - राज्यातील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.. आमच्या सरकारचा, ई-बॉन्ड वर आला आहे त्यामुळे सुविधा मिळतील...
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top