Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में निर्माण मजदूरों का आयुक्त कार्यालय के सामने प्रदर्शन; मांगों की त्वरित मंजूरी

SMSarfaraj Musa
Mar 23, 2026 10:53:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Mar 23, 2026 11:53:21
Nanded, Maharashtra:दोन गावांन वाद झाल्याची घटना काही नवीन नाहीत. मात्र चक्क शाळा कोणत्या गावाच्या हद्दीत आहे या विषयावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आमनेसामने आले. हा वाद थेट पोलीसांच्या दारातही पोहोचला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द या दोन्ही गावात शाळेची वर्गखोली पाडण्यावरून वादाची ठिणगी पडली. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्दच्या सीमेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेपैकी जुनी झालेली खोली क्रमांक एक पाडण्यास काल सुरुवात झाली. पण वर्गखोली आमच्या हद्दीत असल्याचे सांगत खोली पाडण्यास लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थानी विरोध केला. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द दोन्ही गावातील ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगी नसताना वर्गखोली पाडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेने अर्धापूर पोलीसात दिली. खोली पाडण्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले. लोणी खुर्द शाळेत प्रयोगशाळा बांधण्यासाठी निधी आला. त्या ठिकाणी जुनी वर्गखोली पाडण्यात येत होती. तसे आदेश आमच्याकडे असल्याचे लोणी खुर्द च्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नमुना 8 मध्ये खाडाखोड करून दोन वर्गखोल्या लोणी बुद्रुकच्या ताब्यात असल्याचे दाखवण्यात येत असल्याचा दावा लोणी खुर्दच्या ग्रामस्थानी केला. याबाबत त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण लोणी बुद्रुक च्या हद्दीतील वर्गखोली पाडल्याचा आरोप लोणी बुद्रुक च्या ग्रामस्थानी केलाय. पाडकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून लोणी बुद्रुकचा रस्ताही अडवल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शाळेच्या विषयावरून दोन गावं एकमेकां विरोधात उभे टाकली आहेत.
427
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 11:16:35
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली; मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कडाडून विरोध केल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी शहरातील वाढत्या डासांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी सभेत केली. मात्र विषय वेळेवर उपस्थित केल्याचे कारण देत हा मुद्दा पुढील सभेत घेण्याची विनंती करण्यात आली. यामुळे विरोधी नगरसेवक संतप्त झाले आणि काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांनी आरोग्य अधिकाऱ्याला प्रतीकात्मक स्वरूपात मच्छर अगरबत्ती आणि दूषित पाण्याची बाटली भेट दिली. या प्रकारामुळे सभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
947
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 23, 2026 10:35:31
Ranbambuli, Maharashtra:बदलत्या हवामानाचा हापूस ला फटका; तळकोकणातील शेतकरी हवालदिल तळकोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीला राजू शेट्टी; चक्का जाम करत वेधले सरकारचे लक्ष पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेल्या तळकोकणातील बागायतदारांना मिळणार का न्याय? मागणी मान्य न झाल्यास देवाभाऊंच्या घरात मोर्चा काढण्याचा शेट्टींचा ईशारा फळांचा राजा म्हणजे देवगडचा हापूस आंबा.. खवय्याच्या तोंडाला नेहमीच पाणी आणणारा हापूस ह्यावर्षी मात्र बागायतदारांच्या तोंडच पाणी पळवीणारा ठरलाय.. त्याला कारणीभूत वातावरणातील बदल ह्यावर्षी आंबा पिकाचे तब्बल 90 टक्के नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी राजू शेट्टीनी थेट तळकोकणात जात रास्ता रोको केला. येत्या दोन दिवसात न्याय देण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आश्वासन दिलंय. मात्र दोन दिवसात आशिवेशनात घोषणा न झाल्यास थेट देवाभाऊंच्या घरावर मोर्चा नेण्याचा थेट इशाराच राजू शेट्टीनी दिला.. तळकोकणात वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम थेट हापूस आंब्यावर झालाय. अनियमित पडलेला पाऊस उशिरा पर्यंत असलेली थंडी आणि सकाळीच पडणारे दाट धुके यामुळे आंबा पिकाला आलेला मोहोर पूर्णतः जळून गेला त्यामुळे ह्यावर्षी चांगल पीक मिळेल हया आशेवर असलेल्या आंबा बागायतदारांना मोठा धक्का बसला शासनाची मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याने आता मदत कोणाकडे मागायची हया विचारात असलेल्या बागायतदारांना अखेर साथ मिळाली ती शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची.. एलगार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणाऱ्या शेट्टीनी सरकारला जाग आणण्यासाठी थेट चक्का जाम आंदोलन छेडले तब्बल तीन तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरतं शेट्टी यांनी रास्ता रोको केला आणि त्यांना साथ मिळाली ती ठाकरे गटाची ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तर सरकार शेतकऱ्यांच आंदोलन दडपण्याचा आरोप केला आंबा पीक कमी येणार असल्याने चिंता ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करावी लागेल अशी चिंता भेडसावू लागली बागायतदार शेतकरी राजू शेट्टी यांनी तळकोकणातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलनाची दाखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व येत्या दोन दिवसात आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याबाबत घोषणा करण्याचे आश्वासन दिले व तसें पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शेट्टी यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी आंदोलकांना आश्वस्त केले असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे सांगितले तळकोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या राजू शेट्टी यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिलीय येत्या दोन दिवसात अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही तर थेट देवाभाऊंच्या घराला म्हणजे वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देत आंदोलन स्थगित केलेय. कितीही संकट आली तरीही कधीच न डगमगलेला तळकोकणातील शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झालाय.. राजू शेट्टीच्या मदतीने आंबा बागायतदारांनी मोर्चाचे शस्त्र तर उचललेय पण येत्या दोन दिवसात राज्य कर्ते कोणता निर्णय देतात? किती नुकसान भरपाई मिळते? दिलेला शब्द सरकार पाळणार का? याकडे तळकोकणातील शेतकरी आता लक्ष देऊन आहे उमेश परब सिंधुदुर्ग
1037
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 10:30:23
Niphad, Maharashtra:नाशिक जिले के निफाड में २४ दिनों से लापता महिला का शव जुना देवपूर रोड के पास स्थित एक कुएं से मिलने से क्षेत्र में हलचल मच गई है. प्रारम्भिक जांच में माना गया है कि रिश्‍ते और पैसे के लेनदेन के विवाद के कारण यह हत्या होगी. रंभाबाई आनंदा काळे, उम्र ६०, मामलादार चौक, निफाड में स्थानीय अस्पताल में काम करती थीं और २४ फरवरी से लापता थीं. उनके भतीजे प्रवीण घायाळ ने निफाड थाना में शिकायत दर्ज कराई थी. शिकायत के बाद पुलिस ने तकनीकी विश्लेषण और मोबाइल सीडीआर के आधार पर संदिग्ध की गिरफ्तारी का प्रयास किया. जांच में अरुण बाजीराव ढेपले को संदेह के घेरे में लाया गया. पूछताछ के बाद उसने महिला की हत्या कर शव को कुएं में फेंकने का स्वीकार किया. रविवार शाम को पुराने देवपूर रोड के पास के कुएं से शव निकाल लिया गया. वहीं, संदिग्ध ने विष पी कर आत्महत्या करने का प्रयास भी किया, जिसे अभी निजी अस्पताल में उपचार चल रहा है. निफाड थाना के प्रभारी निरीक्षक गणेश गुरव आगे की जांच कर रहे हैं. इस घटना से निफाड क्षेत्र में भय का वातावरण है. आगे भी इस मामले में और धागे निकलने की संभावना पुलिस ने जताई है.
959
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 10:21:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑटोमोबाइल प्रमाणे संभाजी नगर कंडोम उत्पादनात ही अग्रेसर आहे, एकूण 6 कंपन्यांद्वारे उत्पादन होते, मात्र युद्धाचा परिणाम आयात निर्यातीवर झाला आणि या कंपन्यांना सुद्धा फटका बसलाय, कच्चा मालाचे भाव वाढल्याने याचा परिणाम कंडोम चे दर वाढण्यावर ही होऊ शकेल असे चित्र आहे... युद्धाचा फटका कंडोम उत्पादनाला, कच्चा मालाचे दरात 50 टक्क्यांची वाढ, कंडोमचे दर वाढणार, निर्यात ही मंदावणार. युद्धाचे परिणाम सर्वच स्तरावर होत आहेत, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज वसाहतीत कंडोम उत्पादन करणारे 6 उद्योग आहेत यांनाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, कंडोम साठी लागणारा कच्चा माल युरोप सह आखाती देशा पलीकडून येतो मात्र होमुर्ज समुद्रधुनी मूळ शिपिंग बंद आहे परिणामी माल अडकला, त्यामुळं उपलब्ध मालाचे दर गगनाला भिडले आहेत, Lubricants ( silicon oil 50 टक्के दर वाढले ), अल्युमिनीम फाइल 3 लेअर -- 35 टक्के दर वाढले, पॅकेजिंग मटेरियल 15 टक्के दर वाढले, तर लॅटेक्सचे दर 27 टक्क्यांनी वाढले आहे, बरं दर वाढूनही माल म्हणावा तसा मिळत नाहीय त्यामुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे शक्य होत नाहीय, त्यामुळे उद्योगच अडचणीत आल्याचं कंपनी कर्मचारी सांगताय, एकीकडे कच्चा माल आयात कमी होतोय त्यामुळं इथून 38 देशांना निर्यात होतेय त्यावर सुद्धा नियंत्रण आल्याचं कंपनी व्यवस्थापक सांगताय, तर याच कंपनीत देश अंतर्गत 50 वर ब्रँड साठी उत्पादन होतेय त्यावरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळं उद्योग प्रचंड अडचणीतून जातोय असे सांगण्यात येताय, एकीकडे कच्चा माल दर वाढले असल्याने किमतीवर परिणाम होणार, तर दुरीकडे माल मिळाला नाही तर थेट उपलब्धतेवर ही परिणाम होईल असे चित्र आहे त्यामुळं आता कंडोम उद्योग ही युद्धा मुळे धोक्यात आले आहे...
1042
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 10:17:34
Jalna, Maharashtra:जालना | जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद,एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, दोघे गंभीर जखमी (पॅकेज) अँकर : जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकाची धारदार Shस्त्राने वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडलीेये.तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान पोलिसांकडून आता या प्रकरणातील आरोपींची शोधाशोध पोलिसांनी आता सुरू केलीय. व्हिओ :१:जालन्यातील मोतीबाग परीसरात रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. मात्र टकरी लावताना दोन गटात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.28 वर्षीयरवी अशोक लाड असं मयत तरुणाचं नाव आहे.या मारहाणीच्या घटनेत ईतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात काल रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वाद मिटवण्याच्या उद्देशाने एका गटाने दुसऱ्या गटाला बोलावून घेतलं आणि दोन्हीही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यातील रवी लाड (वय  याच्या पोटात धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.आणि त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  मात्र उपचारादरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. बाईट- प्रेम अशोक लाड, जखमी व्हिओ :०२: या मारहाणीत  20 वर्षाचा प्रेम लाड आणि दुसरा 20 वर्षाचा तरुण नरेश अवघड  हे सुद्धा जखमी झाले.या तरुणांवर सध्या जालन्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाईट : डॉ उनगे मेडिकल ऑफिसर,जिल्हा शासकीय रुग्णालय,जालना निळा शर्ट व्हिओ :०३:दरम्यान रेड्यांच्या टकरीवरून झालेल्या या राड्या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.सध्या पोलीस आरोपींचा शोध घेतायत.जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून होणाऱ्या वाद सध्या चर्चेचा विषय बनलाय.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासीयांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
989
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 23, 2026 09:50:58
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाका पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठबळामुळे अनधिकृतपणे सुरु आहे, असा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने टोल नाक्यावर धडक देत टोल वसुली बंद पाडली. काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भांडेगाव-भुलाई जवळ असलेला हा टोलनाका अयोग्य आहे, या मार्गांवर प्रचंड खड्डे असून, कुठलीही सुविधा नाही त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. असे असतानाही टोल वसुली कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. हा टोलनाका बंद करा अशी मागणी करीत कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी हाती दगड घेत टोलनाक्यावर कुच keल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध केले. पालकमंत्री घाबरत असल्याने पोलिसांना समोर करीत असल्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
1083
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 09:32:40
Shirur, Maharashtra:पुणे लोणीकंद जवळ ट्रॅव्हलर बसला भीषण आग, प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला पुणे–अहिल्यानगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅवलर बसला लोणीकंद जवळ अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ही घटना चिंतेचा विषय ठरत आहे. लोणीकंद जवळ बस प्रवासात असताना समोरून इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही प्रवाशांनी परिस्थितीची तीव्रता पाहून काचा फोडून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी इंजिन, वायरिंग व इंधन यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
1070
comment0
Report
Advertisement
Back to top