Back
स्कूल को लेकर दो गावों में टकराव, पुलिस ने स्थिति पर काबू पाया
SMSATISH MOHITE
Mar 23, 2026 11:53:21
Nanded, Maharashtra
दोन गावांन वाद झाल्याची घटना काही नवीन नाहीत. मात्र चक्क शाळा कोणत्या गावाच्या हद्दीत आहे या विषयावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आमनेसामने आले. हा वाद थेट पोलीसांच्या दारातही पोहोचला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द या दोन्ही गावात शाळेची वर्गखोली पाडण्यावरून वादाची ठिणगी पडली. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्दच्या सीमेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेपैकी जुनी झालेली खोली क्रमांक एक पाडण्यास काल सुरुवात झाली. पण वर्गखोली आमच्या हद्दीत असल्याचे सांगत खोली पाडण्यास लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थानी विरोध केला. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द दोन्ही गावातील ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगी नसताना वर्गखोली पाडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेने अर्धापूर पोलीसात दिली. खोली पाडण्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले. लोणी खुर्द शाळेत प्रयोगशाळा बांधण्यासाठी निधी आला. त्या ठिकाणी जुनी वर्गखोली पाडण्यात येत होती. तसे आदेश आमच्याकडे असल्याचे लोणी खुर्द च्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नमुना 8 मध्ये खाडाखोड करून दोन वर्गखोल्या लोणी बुद्रुकच्या ताब्यात असल्याचे दाखवण्यात येत असल्याचा दावा लोणी खुर्दच्या ग्रामस्थानी केला. याबाबत त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण लोणी बुद्रुक च्या हद्दीतील वर्गखोली पाडल्याचा आरोप लोणी बुद्रुक च्या ग्रामस्थानी केलाय. पाडकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून लोणी बुद्रुकचा रस्ताही अडवल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शाळेच्या विषयावरून दोन गावं एकमेकां विरोधात उभे टाकली आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 12:05:511094
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 11:46:211087
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:351063
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:471068
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
1019
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:311037
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23959
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131042
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 10:17:34989
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 23, 2026 09:50:581083
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:401070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:371042
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:021074
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071098
Report