Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

तासगांव में रोहित पाटील का एक दिवसीय उपवास, कृषक व बाढ़ पीड़ितों की मांगें

SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 08:35:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
रोहित पाटील यांचं तासगावमध्ये शेतकरी व पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांना भरीव मदत जाहीर करावी, हेक्टरी 50 हजार मदत सरकारने द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी ही आंदोलन करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 11:31:57
Satara, Maharashtra:सातारा - महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची पहिल्यापासूनच पद्धत आहे ही गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी बैठक होत असते.या बैठकीत नैसर्गिक आपत्ती,पूर , दुष्काळ आला की प्रतिटना मागे साखर कारखाने पैसे देत असतात शेतकऱ्याचे पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही कारखान्याने स्वतःच्या उत्पन्नातील पैसे द्यायचे आहेत असा त्याचा अर्थ आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.हे संकट मोठं आहे की 60 लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान आहे. त्यामुळे मदत करावीच लागणार आहे त्यामुळे साखर उद्योगाची थोडी मदत व्हावी हा त्या मागचा उद्देश असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले आहे.विरोधकांकडून हा जिजिया कर असल्याच्या टिकेला उत्तर देताना हा कर शेतकऱ्यांकडून घेतला जाणार नाही तर कारखाने देणार असल्याचं सांगत शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये कर दिलाच होता मग तो जिजिया कर होता का असा सवाल देसाई यांनी केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 01, 2025 11:31:20
Chandrapur, Maharashtra:अतिवृष्टीत उध्वस्त झालेले सोयाबीन स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांना पाठवले, चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा अनोखा विरोध चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आसाळा गावातील शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन पीक त्यांनी थेट स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांकडे पाठवले आहे. गावातील बहुतांश शेतकरी सोयाबीन उत्पादक असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच निषेध म्हणून शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन स्पीड पोस्टमधून पाठवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्पीड पोस्टसोबत पाठवलेल्या चिठ्ठीत, पालकमंत्र्यांनी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची दयनीय अवस्था पाहावी आणि नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 01, 2025 11:01:00
Pune, Maharashtra:उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून जलद गतीने तयारी केली जात आहे. उत्साह, शक्ती प्रदर्शन आणि राजकीय संदेश देण्याच्या उद्देशाने पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जोम आणि मेळाव्याकडे जाणाऱ्या जनतेला आवाहन करण्याची ही धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर सध्या एक वेगळंच चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर, पोस्टर्स आणि फ्लेक्सद्वारे दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्याचा धडाका लावला आहे. प्रवाशांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मेसेज, घोषवाक्यं आणि ठाकरेंचे फोटो यांना मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं आहे. कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची ही मोठी संधी मानली जाते. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील बॅनरबाजी केवळ सजावट नाही तर राजकीय संदेश देखील पोहचवत आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी नेमकी निवडणुकीच्या रणशिंगाची चाहूल तर नाही? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या मेळाव्यातून ठाकरेंचा सूर किती तीव्र असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. याच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 01, 2025 10:54:33
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात सराईत गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्याना वाचवले. मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 01, 2025 10:51:30
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 01, 2025 10:45:28
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 01, 2025 10:40:45
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 01, 2025 10:37:59
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 01, 2025 10:03:08
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 10:02:49
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत रोष व्यक्त केला.राज्य सरकारने अद्यापही ओला दुष्काळ जाहीर केलेला नसून हे सरकार चोर सरकार असल्याची टीका आंबेडकरांनी केलीय. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते, पण टेंडरच्या माध्यमातून पैसेांचा गैरव्यवहार थांबेल म्हणूनच सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही असाेही तेांनी यावेळी केला.दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे सरकार सांगत आहे मात्र नुकसान भरपाई फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते असे ही ते म्हणाले.कर्जमाफीबाबतही त्यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला , जर कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागते, त्यामुळे मलिदा कमी होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा ७/१२ अद्याप कोरे केलेले नसल्याचं आंबेडकर म्हणाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 09:49:05
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 01, 2025 09:33:17
Khed, Maharashtra:Khed School World Number One Slug: Khed School World Number One File' 15 Rep: Hemant Chapude(Khed) T4 Education संस्थेच्या World's Best School स्पर्धेत जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवडली गेलीय पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवडली गेलीय, इंग्लंड येथील T4 Education संस्थेने जागतिक पातळीवर घेतलेल्या World's Best School स्पर्धेत जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगात पहिला नंबर पटकावलाय. शाळेचं हे यश गावकऱ्यांनी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची वाजत गाजत व फटाक्यांची आतिशबाजी करत मिरवणूक काढून साजरं केलंय. या यशामागे लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा, डिजिटल शिक्षणाचा दर्जा, पर्यावरणपूरक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी आणि मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजींंठक कार्य हे घटक ठळकपणे अधोरेखित झालेत. या स्पर्धेत शाळेला मतदान करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेतून आवाहन केलं होतं. महाराष्ट्रासह देशभरातून मिळालेल्या जबरदस्त पाठिंब्यामुळे जालिंदरनगर शाळेनं आता अभूतपूर्व यश संपादन केलंय. जगातील पहिलं स्थान पटकावत या शाळेनं खेड तालुक्याचं, पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचं नाव थेट जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरलंय असं म्हणाव लागतं. याचाच जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेतून आढावा घेत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. Chopal : प्रतिनिधी हेमंत चापुडे To शिक्षक विद्यार्थी पालक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 01, 2025 09:32:03
Nagpur, Maharashtra:नागपूर - \n\nबाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री - \n\nOn पीक पाहणी - \n\n- राज्यात पीक पाहणी आवश्यक होती, आतापर्यंत 60 टक्के पीक पाहणी झाली आहे त्यामुळे पिक पाहणीचं ऑनलाईन एप आहे त्यात कमी पीक पाहणी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालं असतं \n\n- मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, शेतकऱ्यांच्या शंभर टक्के पीक पाहणी झाले पाहिजे, ऑनलाइन शक्य नसल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन शंभर टक्के पिक पाहणी करणार आहेत जेणेकरून कोणाचीही नुकसान झालं ते सुटणार नाही \n\n- केंद्र आणि राज्य सरकारकडून जी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी हे महत्त्वाचा आहे, शासन निर्णय जारी केला \n\nOn अनिल देशमुख - \n\n- अनिल देशमुख यांच्याबाबत जी घटना घडली त्यात पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आता फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल\n\n- प्रथम दृष्ट्या जी चौकशी झाली आहे त्यात हे दिसत आहे की पोलिसांनी ज्या नोंदी घेतल्या अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला होता, हा स्टंट होता, याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल \n\n- निवडणूक जिंकणे हरणे हा एखाद्यावेळी खेळाडू वृत्तीने जय पराजय स्वीकारला पाहिजे, मात्र एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्या करिता स्वतःच्या हातात गोठा घेऊन स्वतःलाच मारणे \n\n- आणि मला भाजपने दगड मारला असे दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता, आता पोलीस चौकशीत उघड झालं आहे \n\n- कुठल्याही नेत्याने जनतेची अशी सहानुभूती घेऊ नये लोकसेवक म्हणून काम करावे\n\n- दहा किलोचा दगड एखाद्या व्यक्तीला लागतो तेव्हा त्याचे काय हाल होतात हे लहान मुलांनाही समजते,दहा किलोचा दगड मारला तर काय हाल होईल \n\n- एक खोटं बोलण्याकरिता दहा वेळा खोटं बोलावं लागतं मला ते झालं मात्र हा एक स्टंट होता आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट होता असं मला वाटतं \n\nOn ऊस गाळप हंगाम - \n\n- हा निर्णय का घेतला आहे हे तपासून बघावं लागेल शेतकऱ्यांची शेवटी मदत झाली पाहिजे घेऊन येणे झाला याबद्दल मी तपासून बघतो त्याची माहिती आज नाही \n\nOn पंचनामे - \n\n- पंचनामे पाच सहा तारखेपर्यंत अपेक्षित आहे, पंचनामावरून मदत मिळणार आहे, पण ई पीक पाहणी ही कंपल्सरी करावी लागते \n\n- ही पीक पाहणी मध्ये आम्ही 60% पर्यंत पोहोचलो, प्रत्येक सातबारा नोंदणी होते शेतकऱ्यांची, ऑनलाइन पद्धतीने शंभर टक्के पीक पाहणी करावी लागते मात्र यावर्षी ऑनलाइनचा प्रॉब्लेम झाल्याने ग्राम महसूल अधिकारी 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करणार आहेत \n\nOn पडळकर - \n\n- मागच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली आहे, मीही त्यांच्याशी चर्चा केली, आज जो उल्लेख केला त्यात काही संदर्भ आहेत \n\n- त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर ज्या व्यक्तिगत टीका झाल्या\n- मात्र गेल्यावेळी ते बोलले होते ते आई-वडिलांवर नाव घेऊन बोलू नये \n\nOn बाबा आढाव - \n\n- ओला दुष्काळ हेच आहे की शेतकऱ्यांना एनडीआरएफ किंवा जे नियम आहेत त्यापेक्षा जास्त मदत देणे, याकरिता ओला दुष्काळाचा विचार आपण करतो \n- मला वाटतं मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि दिवाळीपूर्वी सर्व बाबींचा निर्णय घेतील \n\nOn अबू आझमी - \n\n- अबू आझमी माझ्याशी भेटल्यावर मराठीत बोलतात, मला वाटतं त्यांनी मीडिया करता असं म्हटलं असेल त्यामुळे त्यांनी मराठी बोलणं जास्त चांगल्या त्यांना चांगले मराठी बोलता येते \n\nOn निधी - \n\n- लाडक्या बहिणीची याचा काही संबंध नाही लाडक्या बहिणीचा बजेट वेगळा ठेवलाय मागच्या काळात महाराष्ट्रात असे काम सुरू केले आहे जे यावर्षी पूर्ण होतील यावर्षी बजेट काही कमी आहे लाडक्या बहिणी योजनेचा कुठल्याही विषयाशी संबंध नाही \n\nOn ऊर्जा विभाग बैठक - \n\n- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी- खापरखेडा च्या अनेक विषयावर बैठक घेतली होती, महावितरण ला 317 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत 217 कोटी अमरावतीला दिले आहेत \n\n-पुढच्या पन्नास वर्षांचा इंन्फ्रा स्ट्रक्चर नागपूरला देण्याकरिता ही बैठक आहे काही महसूल च्या जागा या महावितरण ला द्यायचे आहेत \n\n- मुख्यमंत्री यांच्याकडे ऊर्जा खात आहे त्यांनी त्या सूचना दिल्या आहेत त्या पाटील आजची बैठक घेत आहे \n\nOn कुर्ला मोहम्मद पोस्टर - \n\n- कारवाई केलीच पाहिजे, ऑटोच्या मागे धावणे जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर पोस्टर लावणे, कवथ्यामध्ये कामठी मध्ये बॅनर होते, पण सार्वजनिक ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे कडक कारवाई झाली पाहिजे कोणालाच सोडलं नाही पाहिजे \n\n- व्यक्तिगत जे मत आहे ते प्रदर्शित करा मात्र सार्वजनिक ठिकाणी हिंदू सभा मुस्लिम कोणीही समाजातील निर्माण करण्याचा प्रदर्शन करत असेल तर ते योग्य नाही \n\nOn निवडणूक युती - \n\n- महायुती ही मनपा, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार आहे, काही ठिकाणी आम्ही चर्चा करू या ठिकाणी अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू \n\n- महायुतीत मतभेद होतील मात्र मनभेद होणार नाही मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसची लाथाडी होणार आहे \n\n- तीनही पक्ष एकमेकांना लाथा मारत राहतील आणि निवडणूक संपून जाईल \n\nOn हेडगेवार भारतरत्न - \n\n- जमाल सिद्दिकी यांच्या भावना आहेत, त्यांच्या भावना आहेत केंद्र सरकार त्यावर निर्णय घेईल \n\nOn बजरंग सोनवणे कपडे - \n\n- कपडे खराब होणारच आहेत मी गेलो कपडे खराब झाले कपडे बदलून टाकायचे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे \n\nOn हेडगेवार भारतरत्न - \n\n- सर्व देशाची भावना राहणार आहे, कारण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना निर्माण करणे, राष्ट्राचेतना तयार करणे आणि हिंदू राष्ट्र तयार करणे, भारत माता फार मोठी चेतना व्हावी यासाठी डॉक्टर हेडगेवार यांचे योगदान आहे त्यामुळे सर्व जनतेची भावना राहणार आहे की भारतरत्न देण्यात यावे
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top