icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
400601
UJUmesh Jadhav1 Oct 2025, 10:40 am

कल्याण ग्रामीण इलाके में मुसळधार बारिश से धान फसल बुरी तरह प्रभावित

Thane, Maharashtra:कल्याण तालुक्यात गेली दोन-चार दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कल्याण ग्रामीण भागातील भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असून शेकडो हेक्टर भात शेती यात बाधीत झाली आहे. यावर्षी अतिशय समाधानकारक पाऊस झाला असून भाताचं दाणे भरणी सुरू आहे. भात पिक उत्तम प्रकारे आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पाऊस पडल्याने भातशेती पाणीपाणी होत चालली असून पिक कुजून नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शासनाने पंचनामे करून जाहीर दुष्काळ करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाना पटोले बोले: सरकार ने उद्योगपतियों का कर्ज माफ किया, किसानों के नाम पर धोखा

Bhandara, Maharashtra:लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेांचा सरकारवर हल्ला Anchor राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च केल्याची तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात केली जाते. मात्र, सरकारने कथितरित्या दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याची जाहिरात सरकारने कधी केली का? असा सवाल उपस्थित करतानाच ‘लाडक्या बहिणिंना बेईमान भावांनी फसविले’ असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे हनुमान चालीसा पठण व श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना पतोले म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगते, तसेच लाडक्या बहिणीना १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांतून केली जाते. मात्र, दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याचे सांगितले जाते. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जासाठी दहा-बारा वर्षे वापरता आली असती, असे त्यांनी म्हटले.‘त्या दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याची जाहिरात टीव्हीवर दाखवली का? तुम्ही पाहिली का?’ असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. ‘लाडकी बहीण’ योजनेवरही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडून बहिणींना मिळणाऱ्या विविध योजनांपैकी अनेक योजना एक-एक करून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत, ‘हे बेईमान भाऊ आहेत, बहिणीचे सख्खे भाऊ नाहीत. लाडक्या बहिणींच्या नावाने या बहिणींना फसविले,’ अशी टीका नाना पटोले यांनी सरकार वर केली.
0
0
Report

नेवाशा में हिंदू जनआक्रोश मोर्चे पर पुलिस ने अनुमति नहीं दी, तनाव बना

Shirdi, Maharashtra:नेवाश्यात हिंदू जनआक्रोश मोर्च्यादरम्यान गोंधळ. जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी. शहरातून पोलिस प्रशासनाने मोर्चा काढू न दिल्याने आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. हिंदुत्ववादी आ. गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारे यांना पोलिस प्रशासनाची मोर्चा न काढण्याची विनंती. शहरात तेढ निर्माण होऊ नये यामुळे शहरातून मोर्चा काढू नका - पोलिस प्रशासनाची भूमिका. अर्धा तास आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जाहीर सभा सुरु. काही वेळ नेवाश्यात तणावाचे वातावरण. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. नवीन मार्गाच्या मागणीसाठी मागितलेली परवानगी नाकारली. पूर्वी दुसऱ्या मार्गाने परवानगी दिली होती पोलिसांनी परवानगी
0
0
Report

नेवासा में अतिक्रमण विरोधी मोर्चा, हिंदू आक्रोश के साथ दोषियों पर कार्रवाई की मांग

Shirdi, Maharashtra:Anc - अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज नेवासा येथे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मारहाणीच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे.या मोर्चाला हिंदुत्ववादी नेते आ.संग्राम जगताप, आ.गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नेवासा शहरातून निघणाऱ्या या मोर्चाचा नगरपंचायत चौकात समारोप होणार आहे.विशेष म्हणजे, या मोर्चाच्या समारोपावेळी प्रमुख नेते नेमकी काय भूमिका मांडतात..? मोर्चा सुरू होण्य अगोदर हिंदुत्वादी संघटनांनी मोठी गर्दी या मोर्चासाठी केल्याचं बघायला मिळत आहे... हिंदूजनआक्रोश मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

लातूर में पुलिस प्रताड़ना से महिला ने आत्महत्या, परिवार ने आरोपीयों से कार्रवाई की मांग

Latur, Maharashtra:लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा गावात धक्कादायक घटना घडली आहे... पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे... महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून, दोषी पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे... याच मागणीसाठी नातेवाईकांनी औसा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे... सध्या हे आंदोलन सुरू असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. रात्रीपासूनच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
0
0
Report

क्लस्टर मुद्दे पर शिंदे बनाम गणेश नाइक का संघर्ष तेज, बड़े घर का वादा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत दहीहंडी निमित्त क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणसोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देत तेथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्लस्टर वर भाष्य केलेय. तुम्हाला हक्काची मोठी घरे दिल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. मोठं घर देण्याचं पुंण्याचं काम केलं पाहिजे. मोठं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार करेल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे क्लस्टर वरून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
0
0
Report

No hospital access on tough roads, now another woman’s death

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?
0
0
Report
Advertisement
Advertisement

दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी

Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....
0
0
Report
Advertisement

हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए

Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.
0
0
Report

हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top