Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली बाजार में बेदाणा के भाव 401 रुपए प्रति किलो

SMSarfaraj Musa
Feb 19, 2026 01:16:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_bedana_saude स्लग - सांगलीत चाल हंगामातील बेदाणा सौद्यांचा शुभारंभ,पहिल्यााच चौद्यात मिळाला 401 रुपये प्रति किलो उच्चांकी दर.. अँकर - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू हंगामातील बेदाणांचा शुभारंभ झाला आहे,पहिल्याचं शुभारंभ सौद्यात बेदाण्याला 401 रुपये प्रति किलो इतका उच्चांक दर मिळाला आहे.बेदाणा सौद्यांसाठी शंभर टन नविन बेदाण्याची आवक झाली होती,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणा सौद्याचा शुभारंभ करण्यात आला.राजकुमार सदाशिव शिंगण्णा (वड्डी) या शेतकऱ्याच्या 26 बॉक्सला 401 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला,तरी चांगल्या प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास 331 ते 401तर मध्यम हिरवा बेदाणा 250 ते 320 तर काळा बेदाणा 120 ते 180 रुपये प्रति किलो भाव मिळाला.यंदाच्या हंगामामध्ये घटलेल्या द्राक्षांच्या उत्पादनामुळे बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 19, 2026 03:15:30
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 19, 2026 02:31:45
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेञ मढी कानिफनाथ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी येथे पंधरा दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातोय. तर स्थानिक बोली भाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. तर ही शेकडो वर्षाची परंपरा असून हुताशनी पोर्णीमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातोय. मढी येथे फाल्गुन शु. पोर्णिमा ते गुढीपाडव्या पर्यंत भव्य याञोत्सव असतो. मढी ग्रामस्थ होळीचा सणानिमित्त घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गावकऱ्यांनी घरी थापलेल्या गौऱ्या सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ गडावर आणल्या जातात. तर जवळपास एक टण गौऱ्या एकञ करुण गोलाकार पद्धतीत ती भव्य होळी रचली जाते. राञी नाथांच्या शेजारतीनंतर भव्य होळी पेटवण्यात येते. नाथांचा जयजयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात. मोठ्या संख्येने भाविक या होळी सणात सहभागी होतात.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 02:30:19
Nashik, Maharashtra:सायबर गुन्हेगारांनी पाचजणांना घातला दोन कोटी १६ लाखांचा गंडा.... ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये दामदुप्पट नफ्याचे आमिष.... अँकर शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यावर दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून पाच जणांना दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात राहणारे तीन नोकरदार, एक व्यावसायिक आणि एका गृहिणीला व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधून मेसेजेस पाठवून शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले. ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाने ४० हजारांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली. गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारचा परतावा संबंधितांकडून दिला गेला नाही. बैंक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. २ कोटी १६ लाख ४ हजार ७५० रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बँक खातेधारकांसह व्हॉट्सअप वर ज्या सीम कार्ड क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला ते सीम कार्डधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 17:03:21
Nagpur, Maharashtra:नागपुर के अंबाझरी हिलटॉप में नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोदावरी अपार्टमेंटजवळ एक नागरिक दुपारी कचरा टाकण्यासाठी त्या परिसरात गेला होता. कचराच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या आवरणातून दोन हात बाहेर पडलेले त्यांना दिसले. जवळून पाहिल्यावर त्यांनी एका नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्यांनी अंबाझरी पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठवला. मृतदेहाजवळ शस्त्रक्रियेची उपकरणेही आढळली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 15:15:26
Akola, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. संध्याकाळी ७ वाजता या रॅलीला सुरुवात झाली.शहरातील महाराणा प्रताप बगिचा येथून मशाल रॅलीला प्रारंभ झाला. टिळक रोड, अकोट स्टँड चौक मार्गे ही रॅली शिवाजी पार्क येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.या मशाल रॅलीत शहराच्या महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे सह भाजप पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य, विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.शिवजयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 14:45:54
Thane, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटीच्या नावाने सेना कार्यकर्त्याचा महिला कार्यकर्त्यावर जबरी अत्याचार... पीडित महिलेचा आरोप.. पीडितेच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.... अँकर.... भिवंडीत शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानेच अत्याचार केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. राकेश मोरे असे नराधमाचे नाव असून फिर्यादी महिलेने सांगितले की राकेश मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो असे पीडितेला सांगून शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याने 35 वर्षीय शिंदे सेनेच्या कार्यकर्ता महिलेला गाडीने घेवून जाऊन तिच्यावर भिवंडी ग्रामीण भागातील एका लॉजवर नेवून जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कार्यकर्त्याच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पडघा पोलिस करीत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 14:23:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद देखील करेक्ट कार्यक्रम करा,म्हणजे करेक्ट कार्यक्रमांचा आदर्श उभा राहील - रोहित पाटलांचे,जयंत पाटलांकडे मागणी... अँकर - करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटील हुशार आहात,त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये करेक्ट कार्यक्रम कराल,त्यामुळे करेक्ट कार्यक्रमचा आदर्श आमच्या समोर उभा राहील,असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी जयंत पाटलांना उद्देशून केलंय.सांगली जिल्हा परिषदे निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा सांगलीमध्ये पार पडला,यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात आमदार रोहित पाटलांनी जयंत पाटलांचा कौतुक करात,जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आपलीच येईल,हे भविष्य सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसल्याचे सांगत,जयंत पाटलांच्या बाबतीत असणाऱ्या करेक्ट कार्यक्रमाची प्रचिती वेळोवेळी आली आहे,ती पुन्हा सांगली जिल्हा परिषदच्या सत्ता स्थापनावरून यावी, अशी भावना देखील रोहित पाटलांनी,जयंत पाटलांसमोर व्यक्त केली. साऊंड बाईट - रोहित पाटील - आमदार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 14:04:55
Beed, Maharashtra:महादेव मुंडे खून प्रकरणाचा एसआयटी तपास, दोघांची नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला दोन वर्ष उलटून देखील आरोपींचा शोध लागत नाही.. याप्रकरणी तपास वेगवान पद्धतीने व्हावा यासाठी सात महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. मात्र अद्यापही हा तपास अंतिम टप्प्यावर पोहोचला नाही. दरम्यान या प्रकरणाशी संशयित असलेल्या तेजस मोरे आणि सोमनाथ जाधव यांची नार्को टेस्ट तर महेश शिंदे याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे काही दिवसात अहवाल येण्याची शक्यता आहे.. त्यानंतर एसआयटी कडून महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 13:49:58
Beed, Maharashtra:महादेव मुंडे खून प्रकरणाचा एसआयटी तपास, दोघांची नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 28 उलटून देखील आरोपींचा शोध लागत नाही.. याप्रकरणी तपास वेगवान पद्धतीने व्हावा यासाठी सात महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. मात्र अद्यापही हा तपास अंतिम टप्प्यावर पोहोचला नाही. दरम्यान या प्रकरणाशी संशयित असलेल्या तेजस मोरे आणि सोमनाथ जाधव यांची नार्को टेस्ट तर महेश शिंदे याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे काही दिवसात अहवाल येण्याची शक्यता आहे.. त्यानंतर एसआयटी कडून महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 13:49:46
Gadchiroli, Maharashtra:नक्सलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 नक्सल शहीद स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच वेळी उध्वस्त अँकर: दुरगम-अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षल्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी नक्षलविरोधी अभियानांमूळे जिल्ह्रातील नक्षल चळवळ जवळजवळ संपूष्टात आली असून, सामान्य नागरीकांच्या मनात नक्सलवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षल्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 नक्षल स्मारके आज नष्ट करण्यात आली. आज 16 बाँब शोधक पथके, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध ठाण्याचे कर्मचारी यांनी विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान एकूण 44 स्मारके आढळून आली. या स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर जवानांनी सदर स्मारके उध्वस्त केली. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 05, जिमलगट्टा उपविभागातील 02, धानोरा उपविभागातील 01 व पेंढरी उपविभागातील 01 अशा एकूण 44 स्मारकांचा समावेश आहे. नक्सल्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावांतील स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये नक्सलवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top