Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904
सिहोरा पुलिस ने तत्परता से पाँच सरायित अपराधियों को धनेगांव से गिरफ्तार किया
PTPRAVIN TANDEKAR
Feb 19, 2026 03:01:19
Bhandara, Maharashtra
सिहोरा पुलिस ने तत्परता से पाँच सरायित अपराधियों को धनेगांव से गिरफ्तार किया.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 19, 2026 04:47:05
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत गाडीला कट लागल्याने राडा,दोन जखमी.. कल्याण पूर्वेतील शंभर फूट रोड परिसरात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावरून जात असतांना दोन वाहनचालकांमध्ये कट लागल्यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी समर्थक जमा झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. भर रस्त्यात झालेल्या झटापटीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि शंभर फूट रोडवरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. या झटापटीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळाच्या दाखल झाल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली परिस्थिती नियंत्रणात आणताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही लोकांनावर गुन्हा दाखल केला आहे。
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 19, 2026 04:36:48
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 19, 2026 04:33:14
Latur, Maharashtra:लातूर शहरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मध्यरात्री बारा वाजताच तुताऱ्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे संपूर्ण लातूर शहर दुमदुमून गेले. शिवभक्तांनी एकच जल्लोष करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. भगव्या पताकांनी सजलेले चौक आणि रोषणाई पाहण्यासाठी शिवभक्तांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी केली होती. ZEE 24 TAAS च्या प्रेक्षकांसाठी खास, लातूरच्या लकी गहिरवार यांनी टिपलेली ही Exclusive भव्य ड्रोन दृश्ये या उत्साहाची साक्ष देत आहेत. लातूरकरांचा हा मध्यरात्राचा उत्साह ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून, आकाशातून टिपलेली ही भव्य दृश्ये अक्षरशः थक्क करणारी आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 04:17:59
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 19, 2026 04:16:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असून भाजप मधल्या सर्वच गटांकडून आपला नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सध्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, अभिषेक बारणे, उत्तम केंदळे, स्नेहा कलाटे, शीतल वर्णेकर, शीतल उर्फ विजय शिंदे यांची नावे चर्चेत आहेत...! आता चर्चेतल्या या नावांच्या पैकी कोणी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो की पक्ष वेगळ्याच कुणाला संधी देते हे येत्या 20 तारखेच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 04:00:31
Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वाशीम शहरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक ‘शिवसृष्टी’ उभारण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सकाळी दीपोत्सव साजरा करत नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. जिजाऊ वंदना आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शहरात मोटार सायकल रॅली, व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा आणि नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 19, 2026 03:45:52
Chandwad, Maharashtra:चांदवड येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम चांदवड नगरपालिकेने सुरू केली आहे आठवडे बाजारातील राखीव असलेल्या या जागेवर वारंवार सूचना व सहकार्य करूनही अतिक्रमणे हटवली जात नसल्याने नगरपालिका प्रशासन अखेर ॲक्शन मोडमध्ये येत ही कारवाई हाती घेतली आहे चांदवड शहरात उभारण्यात येणारी भव्य शिवसृष्टी ही शहराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना मानली जात असून, या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर या शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर तसेच स्थानिक मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून आणि कुदळ मारून या कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 19, 2026 03:18:58
Virar, Maharashtra:विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या कामाची पालिकेचे महापौर अजिव पाटील यांनी केली पाहणी उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेत काम जलदगतीने करण्याचे दिले निर्देश PWD इंजिनियर रेल्वेचे अधिकारी तसेच शासनाकडे पैसे नसल्यामुळे टेकेदारांची बिल रखडलेली आहेत त्या सगळ्यांची एकत्रित मीटिंग घेऊन त्यांना पुन्हा काम करण्यासाठी सांगीतले आहे. उड्डाणपुलावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी लिफ्ट बसवण्यात येणार आहे येत्या मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत नारंगी बायपास उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे महापौर अजिव पाटील यांनी सांगितले
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 19, 2026 03:15:30
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 19, 2026 02:31:45
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेञ मढी कानिफनाथ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी येथे पंधरा दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातोय. तर स्थानिक बोली भाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. तर ही शेकडो वर्षाची परंपरा असून हुताशनी पोर्णीमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातोय. मढी येथे फाल्गुन शु. पोर्णिमा ते गुढीपाडव्या पर्यंत भव्य याञोत्सव असतो. मढी ग्रामस्थ होळीचा सणानिमित्त घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गावकऱ्यांनी घरी थापलेल्या गौऱ्या सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ गडावर आणल्या जातात. तर जवळपास एक टण गौऱ्या एकञ करुण गोलाकार पद्धतीत ती भव्य होळी रचली जाते. राञी नाथांच्या शेजारतीनंतर भव्य होळी पेटवण्यात येते. नाथांचा जयजयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात. मोठ्या संख्येने भाविक या होळी सणात सहभागी होतात.
0
comment0
Report
Advertisement
Back to top