Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

साइबर अपराधियों ने पांच लोगों को दो करोड़ से अधिक ठगा: शेयर ट्रेडिंग में छलावा

SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 02:30:19
Nashik, Maharashtra
सायबर गुन्हेगारांनी पाचजणांना घातला दोन कोटी १६ लाखांचा गंडा.... ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये दामदुप्पट नफ्याचे आमिष.... अँकर शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यावर दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून पाच जणांना दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात राहणारे तीन नोकरदार, एक व्यावसायिक आणि एका गृहिणीला व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधून मेसेजेस पाठवून शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले. ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाने ४० हजारांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली. गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारचा परतावा संबंधितांकडून दिला गेला नाही. बैंक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. २ कोटी १६ लाख ४ हजार ७५० रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बँक खातेधारकांसह व्हॉट्सअप वर ज्या सीम कार्ड क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला ते सीम कार्डधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 04:00:31
Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वाशीम शहरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक ‘शिवसृष्टी’ उभारण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सकाळी दीपोत्सव साजरा करत नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. जिजाऊ वंदना आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शहरात मोटार सायकल रॅली, व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा आणि नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 19, 2026 03:45:52
Chandwad, Maharashtra:चांदवड येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम चांदवड नगरपालिकेने सुरू केली आहे आठवडे बाजारातील राखीव असलेल्या या जागेवर वारंवार सूचना व सहकार्य करूनही अतिक्रमणे हटवली जात नसल्याने नगरपालिका प्रशासन अखेर ॲक्शन मोडमध्ये येत ही कारवाई हाती घेतली आहे चांदवड शहरात उभारण्यात येणारी भव्य शिवसृष्टी ही शहराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना मानली जात असून, या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर या शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर तसेच स्थानिक मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून आणि कुदळ मारून या कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 19, 2026 03:18:58
Virar, Maharashtra:विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या कामाची पालिकेचे महापौर अजिव पाटील यांनी केली पाहणी उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेत काम जलदगतीने करण्याचे दिले निर्देश PWD इंजिनियर रेल्वेचे अधिकारी तसेच शासनाकडे पैसे नसल्यामुळे टेकेदारांची बिल रखडलेली आहेत त्या सगळ्यांची एकत्रित मीटिंग घेऊन त्यांना पुन्हा काम करण्यासाठी सांगीतले आहे. उड्डाणपुलावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी लिफ्ट बसवण्यात येणार आहे येत्या मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत नारंगी बायपास उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे महापौर अजिव पाटील यांनी सांगितले
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 19, 2026 03:15:30
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 19, 2026 02:31:45
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेञ मढी कानिफनाथ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी येथे पंधरा दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातोय. तर स्थानिक बोली भाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. तर ही शेकडो वर्षाची परंपरा असून हुताशनी पोर्णीमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातोय. मढी येथे फाल्गुन शु. पोर्णिमा ते गुढीपाडव्या पर्यंत भव्य याञोत्सव असतो. मढी ग्रामस्थ होळीचा सणानिमित्त घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गावकऱ्यांनी घरी थापलेल्या गौऱ्या सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ गडावर आणल्या जातात. तर जवळपास एक टण गौऱ्या एकञ करुण गोलाकार पद्धतीत ती भव्य होळी रचली जाते. राञी नाथांच्या शेजारतीनंतर भव्य होळी पेटवण्यात येते. नाथांचा जयजयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात. मोठ्या संख्येने भाविक या होळी सणात सहभागी होतात.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 19, 2026 01:16:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_bedana_saude स्लग - सांगलीत चाल हंगामातील बेदाणा सौद्यांचा शुभारंभ,पहिल्यााच चौद्यात मिळाला 401 रुपये प्रति किलो उच्चांकी दर.. अँकर - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू हंगामातील बेदाणांचा शुभारंभ झाला आहे,पहिल्याचं शुभारंभ सौद्यात बेदाण्याला 401 रुपये प्रति किलो इतका उच्चांक दर मिळाला आहे.बेदाणा सौद्यांसाठी शंभर टन नविन बेदाण्याची आवक झाली होती,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणा सौद्याचा शुभारंभ करण्यात आला.राजकुमार सदाशिव शिंगण्णा (वड्डी) या शेतकऱ्याच्या 26 बॉक्सला 401 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला,तरी चांगल्या प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास 331 ते 401तर मध्यम हिरवा बेदाणा 250 ते 320 तर काळा बेदाणा 120 ते 180 रुपये प्रति किलो भाव मिळाला.यंदाच्या हंगामामध्ये घटलेल्या द्राक्षांच्या उत्पादनामुळे बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 17:03:21
Nagpur, Maharashtra:नागपुर के अंबाझरी हिलटॉप में नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोदावरी अपार्टमेंटजवळ एक नागरिक दुपारी कचरा टाकण्यासाठी त्या परिसरात गेला होता. कचराच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या आवरणातून दोन हात बाहेर पडलेले त्यांना दिसले. जवळून पाहिल्यावर त्यांनी एका नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्यांनी अंबाझरी पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठवला. मृतदेहाजवळ शस्त्रक्रियेची उपकरणेही आढळली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 15:15:26
Akola, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. संध्याकाळी ७ वाजता या रॅलीला सुरुवात झाली.शहरातील महाराणा प्रताप बगिचा येथून मशाल रॅलीला प्रारंभ झाला. टिळक रोड, अकोट स्टँड चौक मार्गे ही रॅली शिवाजी पार्क येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.या मशाल रॅलीत शहराच्या महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे सह भाजप पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य, विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.शिवजयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 14:45:54
Thane, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटीच्या नावाने सेना कार्यकर्त्याचा महिला कार्यकर्त्यावर जबरी अत्याचार... पीडित महिलेचा आरोप.. पीडितेच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.... अँकर.... भिवंडीत शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानेच अत्याचार केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. राकेश मोरे असे नराधमाचे नाव असून फिर्यादी महिलेने सांगितले की राकेश मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो असे पीडितेला सांगून शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याने 35 वर्षीय शिंदे सेनेच्या कार्यकर्ता महिलेला गाडीने घेवून जाऊन तिच्यावर भिवंडी ग्रामीण भागातील एका लॉजवर नेवून जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कार्यकर्त्याच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पडघा पोलिस करीत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 14:23:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद देखील करेक्ट कार्यक्रम करा,म्हणजे करेक्ट कार्यक्रमांचा आदर्श उभा राहील - रोहित पाटलांचे,जयंत पाटलांकडे मागणी... अँकर - करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटील हुशार आहात,त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये करेक्ट कार्यक्रम कराल,त्यामुळे करेक्ट कार्यक्रमचा आदर्श आमच्या समोर उभा राहील,असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी जयंत पाटलांना उद्देशून केलंय.सांगली जिल्हा परिषदे निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा सांगलीमध्ये पार पडला,यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात आमदार रोहित पाटलांनी जयंत पाटलांचा कौतुक करात,जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आपलीच येईल,हे भविष्य सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसल्याचे सांगत,जयंत पाटलांच्या बाबतीत असणाऱ्या करेक्ट कार्यक्रमाची प्रचिती वेळोवेळी आली आहे,ती पुन्हा सांगली जिल्हा परिषदच्या सत्ता स्थापनावरून यावी, अशी भावना देखील रोहित पाटलांनी,जयंत पाटलांसमोर व्यक्त केली. साऊंड बाईट - रोहित पाटील - आमदार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
0
comment0
Report
Advertisement
Back to top