Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

अलमट्टी डैम की ऊँचाई बढ़ाने के विरोध में सांगली-कोल्हापुर में बड़ा आंदोलन

SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 01:16:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली और कोल्हापूर जिल्ह्यांना वाढणाऱ्या उंचीमुळे आणखी फटका बसणार असून राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत दबाव गट तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचं निर्णय देखील,यावेळी करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:32:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदार यादी विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखावा नोटीसा बजावल्या आहेत. दिलेली कामे सात दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा, अन्यथा तात्काळ निलंबन आणि विभागीय चौकशी केली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सध्या मतदार यादीच्या पूर्वतयारीत मतदारांचे मॅपिंग, अस्पष्ट फोटो अपडेट करणे आणि डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या नोटीसा बजावल्या आहेत...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:31:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येचा कट जानेवारी महिन्यातच रचला होता, अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी विशाल राठोडने लोंढे यांना अहिल्यानगरहून परतताना दारू पाजून त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या दिवशी लोंढे यांना दारू चढली नाही म्हणून ते वाचले. नाही तर तेव्हाच घटना घडली असती. या खुनाच्या नियोजनासाठी आरोपीने आधीच वकिलांच्या भेटीगाठी घेऊन कायदेशीर पळवाटा शोधण्यास सुरुवात केली होती असेही तपासात पुढं आले आहे, 50 लाखाच्या वादातून लोंढे यांचा खून झाला आहे आरोपीने लोंढे यांचा गोळी मारून खून केला आणि त्यानंतर मृतदेह पुरून ठेवला होता तब्बल 40 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:30:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:16:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला आहे. MIDC अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, हे सर्व सिलेंडर एका कंपनीचे नसून वेगवेगळ्या कंपन्यांचे असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. बंद कंपनीच्या आडून हा साठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता? काळाबाजाराचा हा भाग आहे का? की फक्त गोडाऊन म्हणून या जागेचा वापर होत होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा साठा नेमका कशासाठी ही सध्या सांगता येणार नाही मात्र आम्ही कारवाई पूर्ण करू अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच यामागचं नेमकं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
654
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:16:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीची आज निवडणूक आहे आणि यासाठी महायु़तीतील दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि भाजप इरेला पेटलेले आहे.. दोघांनाही अध्यक्ष पद हवा आहे आणि त्यासाठी त्यांची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे, भाजपच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 35 संख्या बळ आहे त्यामुळे अध्यक्ष त्यांचा होईल असे सांगताय, तर शिंदे गटाच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 36 संख्या बळ आहे त्यामुळे अध्यक्ष त्यांचा होईल असा त्यांचा दावा आहे ..महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष पदासाठी 32 हा बहुमताचा आकडा आहे शिवसेना-भाजप दोघांकडेही बहुमताचा आकडा नाही त्यामुळे दोन्ही पक्षांना उद्धव ठाकरे गटाशिवाय पर्याय नाही कारण उद्धव ठाकरे गटाकडे नऊ सदस्य आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट भाजपाला मदत करणार की शिवसेनाला यावरच अध्यक्षपदाच गणित अवलंबून आहे महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणाऱ्या चर्चा सुरू आहे अंबादास दानवे यांनीही या चर्चा फेटाळल्या नाही उलट एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यात गैर काय आहे असा सवाल त्यांनी केलाय त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येईल अशी ही शक्यता आहे तर अगर असे झाले तर भाजप सत्ते बाहेर जाऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे गेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष असूनही शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली होती आणि भाजपाला सत्ते बाहेर ठेवलं होतं, त्यामुळं भाजप यावेळी मात्र कमालीची अलर्ट आहे... काय होऊ शकते शक्यता 1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या बाबत बैठक झाली असे सूत्रांची माहिती आहे त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष महायुतीचा होईल फक्त कुठल्या पक्षातला सुरुवातीचा अध्यक्ष याबाबतची अंतिम घोषणा दुपारी होऊ शकते त्यामुळे महायुतीत कुठेही फाटा फूट होणार नाही सहजपणे शिवसेना भाजपाची सत्ता येईल शक्यता 2.. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे शिंदे सेने कडे 23 संख्याबळ आहे त्यांना उद्धव ठाकरे गटांनी जर साथ दिली तर मॅजिक फिगर 32 पर्यंत ते जाऊ शकतात त्यात एक अपक्षने साथ दिली तर बहुमताचा आकडा ते करतील आणि भाजपाला सत्ते बाहेर ठेवू शकतात.. शक्यता 3.. गेल्यावेळी मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेतून दूर होता त्यामुळे भाजप यंदा अलर्ट वर आहे, भाजपकडे 24 संख्याबळ दोन पक्षांची त्यांना साथ आहे राष्ट्रवादीचे चार जण त्यांच्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे सोबतच इतर पक्षांना दोन ते तीन जण भाजपसोबत असल्याचा भाजप दावा करते, त्यामुळं ही फाटाफुट झाली तर अध्यक्ष भाजपचाच होईल... पक्षीय बलाबल, बहुमत 32 जागा... भाजप 23 + 1 अपक्ष शिंदेसेना 21 + 1 अपक्ष उद्धवसेना 09 राष्ट्रवादी (अजीत पवार) 04 काँग्रेस 01 राष्ट्रवादी (शरद पवार) 01 इतर 04
561
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 18, 2026 02:01:15
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील कला केंद्रांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर डीजे और आधुनिक साउंड सिस्टिमविरोधात लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले... शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन सुरु असलेल्या प्रकारामुळे पारंपरिक गायन, वादन आणि लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे... संघटनेचे अध्यक्ष नारायण जावळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला कला केंद्रांमध्ये केवळ पारंपरिक पद्धतीनेच सादरीकरण व्हावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांचे परवाने रद्द करण्यात यावे यांसह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले... यावेळी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला..
1018
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 01:46:17
Akola, Maharashtra:अgoला महापालिका चुनाव के بعد Utthata group से शिवसेना में बड़ा धक्का, चार नगरसेवक शामिल अकोल्यात सध्या निवडणुकांचे वारे शांत झाले असले तरी पक्षांतराचे राजकारण तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकोला महापालिका निवडणुकीनंतर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अकोल्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उबाठा गटात मोठी फूट पडली आहे. महापालिका निवडणुकीत उबाठाच्या तिकिटावर विजयी झालेले 6 नगरसेवकांपैकी मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात पार पार पडला. विशेष म्हणजे, या घडामोडीत उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने हा धक्का आणखी मोठा मानला जात आहे. मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती.या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली असून स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्यसंख्या आता 53 वर पोहोचली आहे. शहर और प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उबाठा गटात आता केवळ 2 नगरसेवक उरले आहेत.
948
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 01:17:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - खानापूरात वणवा पेटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान.. अँकर - सांगली खानापूर मधील शेडगेवाडी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतांमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे,या ठिकाणी आगीचा वणवा पेटल्यााने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र जळून खाक झाले आहे,यामध्ये शेतकऱ्यांचे पिके,पाईपलाईन व इतर साहित्य जळाले आहे,शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारया शेडगेवाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला अचानक ही आग लागली, सायंकाळी जोराचे वारे सुरू असल्यामुळे आगिने रौद्ररूप धारण केले होते.चहू बाजूने आग पसरली होती,या घटनेनंतर आटपाडी व विटा येथील अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत,आगीवर नियंत्रण मिळवले.दरम्यान या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके,पाईपलाईन, केबल जळाली आहेत..
1014
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 01:16:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आज होणार फैसला.. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची आज निवड होणार आहे.महायुती की महाविकास आघाडी की"सांगली पॅटर्न"याची उत्सुकता लागून राहिले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याचं पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही,त्यामुळे सत्तेचा पेच कायम आहे,भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाने एकत्रित येण्याचा रणनीती आखली आहे.तर दुसऱ्या बाजूला भाजपाने मित्र पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेचा दावा केला आहे,काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचे असे एकूण 36 सदस्य एकत्रित गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातस्थळी आहेत,तर भाजपा व मित्र पक्षासह शिवसेना शिंदे गटाचे 4 सदस्य असे 25 सदस्य देखील सहलीवर गेले आहेत,हे सर्वच सदस्य आज थेट अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी हजर राहणार आहेत, त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा अध्यक्ष कोणाचा होणार ? सत्ता कोणाची येणार याकडे,ऐनवेळी काय नाट्यमय घडामोडी घडणार,याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून राहिले आहे. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर.. भाजपा - 16 राष्ट्रवादी अजित पवार - 06 शिवसेना शिंदे पक्ष - 07 रयत क्रांती संघटना - 01 जनसुराज्य शक्ती पक्ष - 01 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 18 शिवसेना ठाकरे पक्ष -01
1038
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 17:03:32
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... पुण्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी मध्ये तेरा वर्षीय मुलाचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळल्याने उडाली एकाच खळबळ....साईराज मांजरे असं मृत मुलाचं नाव...धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी याच शेतात याच जागेवर वर्षभरापूर्वी एका दहा वर्षीय यश गायकवाड या मुलाचा मृतदेह सेम अशाच अवस्थेत आढळला होता , त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, यशच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलं नसून आता पुन्हा नव्याने त्याच ठिकाणी तेरा वर्षीय साईराज चा मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थ आक्रमक झालेत, धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही मुलांची हत्या झाली असून हत्या ही एकाच प्रकारे सेम पद्धतीने केल्याचं ग्रामस्थांनी म्हटलीय त्यामुळे जोपर्यंत या घटनेचा उलगडा करत नाही आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून उचलणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय...
967
comment0
Report
Advertisement
Back to top