Back
अकोला महापालिका चुनाव के बाद उबाठा गट से शिवसेना में बड़ा धक्का, चार नगरसेवक शामिल
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 01:46:17
Akola, Maharashtra
अgoला महापालिका चुनाव के بعد Utthata group से शिवसेना में बड़ा धक्का, चार नगरसेवक शामिल
अकोल्यात सध्या निवडणुकांचे वारे शांत झाले असले तरी पक्षांतराचे राजकारण तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकोला महापालिका निवडणुकीनंतर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अकोल्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उबाठा गटात मोठी फूट पडली आहे. महापालिका निवडणुकीत उबाठाच्या तिकिटावर विजयी झालेले 6 नगरसेवकांपैकी मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात पार पार पडला.
विशेष म्हणजे, या घडामोडीत उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने हा धक्का आणखी मोठा मानला जात आहे. मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती.या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली असून स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्यसंख्या आता 53 वर पोहोचली आहे. शहर और प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उबाठा गटात आता केवळ 2 नगरसेवक उरले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:31:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:30:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:16:44654
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:16:17561
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 18, 2026 02:01:151018
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 02:00:11945
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 01:45:471017
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 18, 2026 01:30:231049
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 01:17:57994
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 01:17:111014
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 01:16:58Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली और कोल्हापूर जिल्ह्यांना वाढणाऱ्या उंचीमुळे आणखी फटका बसणार असून राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत दबाव गट तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचं निर्णय देखील,यावेळी करण्यात आला आहे.
1093
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 01:16:401038
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 17:03:32967
Report