Back
महायुति बनाम शिवसेना-भाजप: अध्यक्ष पद के लिए महायुती की चेष्टा
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:16:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीची आज निवडणूक आहे आणि यासाठी महायु़तीतील दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि भाजप इरेला पेटलेले आहे.. दोघांनाही अध्यक्ष पद हवा आहे आणि त्यासाठी त्यांची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे, भाजपच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 35 संख्या बळ आहे त्यामुळे अध्यक्ष त्यांचा होईल असे सांगताय, तर शिंदे गटाच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 36 संख्या बळ आहे त्यामुळे अध्यक्ष त्यांचा होईल असा त्यांचा दावा आहे ..महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष पदासाठी 32 हा बहुमताचा आकडा आहे शिवसेना-भाजप दोघांकडेही बहुमताचा आकडा नाही त्यामुळे दोन्ही पक्षांना उद्धव ठाकरे गटाशिवाय पर्याय नाही कारण उद्धव ठाकरे गटाकडे नऊ सदस्य आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट भाजपाला मदत करणार की शिवसेनाला यावरच अध्यक्षपदाच गणित अवलंबून आहे महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणाऱ्या चर्चा सुरू आहे अंबादास दानवे यांनीही या चर्चा फेटाळल्या नाही उलट एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यात गैर काय आहे असा सवाल त्यांनी केलाय त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येईल अशी ही शक्यता आहे तर अगर असे झाले तर भाजप सत्ते बाहेर जाऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे गेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष असूनही शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली होती आणि भाजपाला सत्ते बाहेर ठेवलं होतं, त्यामुळं भाजप यावेळी मात्र कमालीची अलर्ट आहे...
काय होऊ शकते शक्यता 1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या बाबत बैठक झाली असे सूत्रांची माहिती आहे त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष महायुतीचा होईल फक्त कुठल्या पक्षातला सुरुवातीचा अध्यक्ष याबाबतची अंतिम घोषणा दुपारी होऊ शकते त्यामुळे महायुतीत कुठेही फाटा फूट होणार नाही सहजपणे शिवसेना भाजपाची सत्ता येईल
शक्यता 2..
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे शिंदे सेने कडे 23 संख्याबळ आहे त्यांना उद्धव ठाकरे गटांनी जर साथ दिली तर मॅजिक फिगर 32 पर्यंत ते जाऊ शकतात त्यात एक अपक्षने साथ दिली तर बहुमताचा आकडा ते करतील आणि भाजपाला सत्ते बाहेर ठेवू शकतात..
शक्यता 3..
गेल्यावेळी मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेतून दूर होता त्यामुळे भाजप यंदा अलर्ट वर आहे, भाजपकडे 24 संख्याबळ दोन पक्षांची त्यांना साथ आहे राष्ट्रवादीचे चार जण त्यांच्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे सोबतच इतर पक्षांना दोन ते तीन जण भाजपसोबत असल्याचा भाजप दावा करते, त्यामुळं ही फाटाफुट झाली तर अध्यक्ष भाजपचाच होईल...
पक्षीय बलाबल, बहुमत 32 जागा...
भाजप 23 + 1 अपक्ष
शिंदेसेना 21 + 1 अपक्ष
उद्धवसेना 09
राष्ट्रवादी (अजीत पवार) 04
काँग्रेस 01
राष्ट्रवादी (शरद पवार) 01
इतर 04
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:20:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 18, 2026 03:17:500
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 03:16:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 03:16:210
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 03:16:000
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:01:07870
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 03:00:13928
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 02:49:06910
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 02:48:251011
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 02:48:121029
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 02:47:551062
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:32:07952
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:31:311069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:30:581067
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:16:441048
Report