Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

गैस संकट के बावजूद शहर की स्कूल पोषण आहार अभी सुचारू रूप से चल रहा है

SMSarfaraj Musa
Mar 13, 2026 07:50:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद व महापालिका शाळांमध्ये पुरवला जाणार शालेय पोषण आहार सध्याच्या घडीला सुरळीतपणे सुरू आहे. सांगली महापालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून शालेय पोषण आहार पुरवला जातो त्या ठिकाणी सध्याच्या घडीला गॅसची टंचाई नाहीये काही दिवस पुरेल इतका सिलेंडर उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शालेय पोषण आहाराच्या ठिकाणी देखील पुरेसा गॅस सिलेंडर साठा उपलब्ध असून पुढील काही दिवसांच्या साठी नियोजन देखील केले जात असल्याचा जिल्हा परिषदेकडुन सांगण्यात आला आहे. तर महापालिका शाळांमध्ये देखील सुरळीतपणे शालेय पोषण आहार सुरू असून पुढील काही दिवस त्यामध्ये व्यक्ती येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 13, 2026 08:38:32
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असताना देखील अनेक सेवाभावी संस्थांकडून अन्नदान करण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरूच स्व. विष्णुपंत कोठे सेवाभावी संस्थेच्या वतीने निराधार आणि वृद्धांना घरपोच मोफत देण्यात येते अन्नदानाची सेवा संस्थेकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक तर उद्यापासून चुलीवर स्वयंपाक बनवून निराधारांना पोहोचणार जेवणाचे डबे कोरोना सारख्या महाभयंकर काळात अन्नदानाची सेवा बंद केली नाही त्यामुळे अडचणींवर तोडगा काढून सेवा अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार दररोज 100 पेक्षा अधिक वृद्धांना आणि निराधारांना मोफत घरपोच जेवणाचे डबे देऊन बजावली जाते सेवा
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 13, 2026 08:37:27
Pimpri-Chinchwad, Maharashtra:एलपीजी टंचाईचा हिंजवडी आयटी पार्कला फटका, कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना... हिंजवडी आयटी पार्क मधल्या बड्या कंपन्यांनाही बसू लागलाय... गॅस पुरवठ्यात खंड पडल्यान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना चक्क घरून डबा आणण्याचा सल्ला दिला आहे. गॅसअभावी नियमित स्वयंपाक करणे कठीण झाल्याने फूड कोर्टमध्ये सध्या मर्यादित पदार्थ उपलब्ध आहेत. रिटर्न टू ऑफिसमुळे हजारो कर्मचारी ऑफिसला जाते आहेत... कॅफेटेरिया मध्ये जेवण उपलब्ध होत अविवाहित आणि परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोना प्रमाणे वर्क फ्रॉम होम चा पर्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे...याच संदर्भात आयटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 08:20:40
Navi Mumbai, Maharashtra:हॉटेल मधील गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय.पण पदार्थ च्या किंमती वाढल्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झालाय. याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यवसायिकांवर आले. यातून मार्ग काढत काही हॉटेल व्यवसायिकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय निवडलाय. इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसामुळे हॉटेल व्यवसायिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर येतंय. त्यामुळे पदार्थच्या किमती मद्ये 10 रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहक प्रतिसाद देत नाहीत यामुले हॉटेलच भाडे आणि कामगारांचा पगार कसा द्यायचा हा मोठा प्रश्न hॉटेल व्यवसायिकानपुढे उभा राहिलाय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 08:04:21
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 08:02:59
Kalyan, Maharashtra:इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम; डोंबिवली MIDC मधील 100 हून अधिक कंपन्या संकटात इस्राईल -इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका आता स्थानिक उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जवळपास १०० हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यवसायावर आधीच संकट आले आहे. तसाच औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतका गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.या परिस्थितीत कंपन्यांना पुन्हा एकदा पर्यायी इंधनाचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र ते इंधन देखील मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने उद्योजकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयात-निर्यात व्यवहारांवरही परिणाम झाला असून उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांकडून करण्यात येत आहे. बाईट.. देवेन सोनी उदयोजक
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 08:01:14
Shirdi, Maharashtra:शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याच्या नावाखाळ्या 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. याप्रकरणी अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. संगमनेर येथे चौघांनी मिळवून शेअर मार्केटची कंपनी तयार केली होती.. या कंपनीच्या नावाखाल्यावर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहिन्याला 10% परतावा अधिक मिळेल असे सांगुन 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली.. नंतर आरोपींनी ही कंपनी बंद करून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. हा सर्व प्रकार डिसेंबर 2024 पासून सुरु होता.. याप्रकामणि महेश विश्वास मोरे, वैभव विठ्ठल काकड, राहुल शिंदे, विजय तबाजी काळे या चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर.. या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, ज्यांची फसवणूक झाली आहे अशा नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 13, 2026 08:00:47
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील एसआरपीएफ गॅस एजन्सी बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावरून एस आर पी एफ जवान आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद रंगला. यावेळी हातापाई झाल्याचेही दिसून आले. एस आर पी एफ जवानास या वादामध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समीर आली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता सर्वसामान्यांना भोगाव लागत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील बहुतेक भागात गॅस एजन्सीचा बाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. गॅस एजन्सी बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त मध्ये आता गॅस एजन्सी मध्ये गॅसचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर साठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. त्यातच काही वेळा परिस्थितीत हाताबाहेर जातं आहे. प्रशासनाने आवाहन करूनही विशेष काही फरक पडल्याचे दुसून येत नाही. प्रशासन आवाहन करण्यापलीकडे काही करताना दिसून येत नाही.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 07:45:46
Vasai-Virar, Maharashtra:मंबई-अहमदाबाद महामार्गावरील खाणिवडे जवळ धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या मध्यभागी एका मद्यधुंद महिलेने गोंधळ घालत नाचत असल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. महामार्गाच्या पहिल्या लेन पासून तिसऱ्या लेंनर्यंत पर्यंत ही महिला भर महामार्गावर अधून मधून नाचत होती.. मात्र जवळच शिरसाड येथे विरार वाहतूक पोलिस चौकी असून देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर उतरली आणि रस्त्याच्या मधोमध नाचू लागली. त्यामुळे त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागले. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता, कारण वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता होती.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 13, 2026 07:31:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत आता एकाचा मृत्यू झाला. काल रात्री आगारातील एका एस.टी. बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला होता. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. डिझेल भरत असलेले एस.टी. महामंडळाचे ऑपरेटर बस्वराज मठपती हे या आगीत गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 13, 2026 07:06:31
Kolhapur, Maharashtra:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष और उपाध्यक्ष पदाची निवड आहे लवकरच आमच्या तीनही पक्षाची बैठक होईल आणि निर्णय होईल महानगरपालिकेत जो निर्णय झाला. ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर झाला तसा अध्यक्ष पदाबाबत निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. गोकुळ निकाल निकालाची कॉपी न बघता आपण पत्रकार परिषदा घेता हे बरोबर नाही मी या केस मध्ये एक पार्टी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच मध्ये झालेल्या सुनावणी मध्ये बिन तारखेच्या पत्राचा माझा उल्लेख झाला लंपी आजारामुळे राज्यातील दूध संस्था या 50 लिटरची अट पूर्ण करू शकणार नाहीत आणि त्या अवसयाला जातील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती तात्कालीन दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांना केली होती त्यांनी देखील तात्काळ स्थगिती दिली होती त्यांनी ऑर्डर देताना तारीख घातली नव्हती दोघांच्याही तारखा अनावधानाने राहिल्या होत्या जॉईंट रजिस्टरच्या पत्रावरती तारखा होत्या न्यायालयाच्या प्रक्रियेवरती मतप्रदर्शन करायचं नाही तरीदेखील मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे रोहित पवार स्टेटमेंट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि सर्व आमदार त्यांनी अजित दादा पवार यांच्या अपघाताचा तपास हा सीबीआय कडे सोपवावा अशी मागणी केली आहे. मला विश्वास आहे की आता CID चा तपास योग्य प्रकारे सुरू आहे... विमान प्राधिकरण संस्थेमार्फत चौकशी सुरू आहे आणि लवकरच हा तपास सीबीआय कडे जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि देशातील जनतेच्या मनात ज्या शंका आहे त्याचा निरसन होईल रोहित पवारांनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल तात्काळ घेतली जाईल मुख्यमंत्र्यांनीही त्या संदर्भातला सुतवाच केला आहे. जिल्ला राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी एक संघ आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार कार्यकर्ते माझ्या सोबत आहे. या सर्वांच्या जीवावरती राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा मला विश्वास आहे. गॅस तुटवडा कालच केंद्रीय मंत्र्यांनी गॅसचा तुटवडा होऊ देणार नाही असं सुचवाच केला आहे, तसेच इराण देखील भारताला सहकार्य करत असल्याचे माध्यमांमध्ये वाचला आहे त्यामुळे लवकरात लवकर धोका टळेल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top