Back
बनपुरी में पिता ने दोनो बच्चियों पर अमानवीय अत्याचार से एक की मौत, दूसरा गंभीर
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 08:46:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - बापाच्या सैतानी कृत्याने जिल्हा हादरला..! चोरीच्या संशयाने मुलींना उलटे टांगून ठेवले,एका चिमुरडीचा मृत्यू तर एक अत्यावस्थेत..
अँकर - मुलींच्यावर शेजारच्यांनी चोरीचा संशय घेतल्याने,एका बापाने आपल्या पोटच्या दोन्ही मुलींचा अमानुष छळ करून एका मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. घरातल्या खुंटीला चिमूरड्या मुलींना उलट टांगुन ठेवल्याने हा प्रकार घडला आहे.
ग्राफिक्स in
आटपाडीच्या बनपुरी मध्ये एका बापाचा राक्षसी आवतार
पोटच्या दोन चिमुकल्या मुलींवर बापाकडून अमानुष छळ
दोरीने हातपाय बांधून घरातल्या खुंटीला रात्रभर उलट टांगून ठेवलं
पाण्याविना तडफडून व उलटे टांगून राहिल्याने 9 वर्षीय चिमुरडी ऋतुजा दादू यमगरचा मृत्यू
11 वर्षीय बहीण अनुजा सरगरची प्रकृती चिंताजनक
निर्दयी दादू यमगरला आटपाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ग्राफिक्स आऊट
व्ही वो - आटपाडीच्या बनपुरी मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हा धरून गेला आहे.पोटच्या मुलींवर निर्दयी आणि निष्ठूर बापाने अमानुष अत्याचार केल्याने नववर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. ऋतुजा उर्फ सानिका दादू सरगर,असं या निष्पाप मुलीचे नाव आहे. तर बापाच्या या अमानुष्यमुळे अनुजा सरगर हे अत्यावस्थेत आहे.
बाईट - विनय बहिर - पोलीस निरीक्षक - आटपाडी,सांगली.
व्ही वो - बनपुरी मधील राहणाऱ्या यमगर दादू यमगर यांनी आपल्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय.शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन्ही मुलींवर चोरीचा आळ घातला,या रागातुन दादू यमगर यांनी आपल्या दोन्ही मुलांचे हातपाय दोरीने बांधून रात्रभर घरात उलट टांगून ठेवले.
व्ही वो - रात्रभर दोन्ही मुली उलट्या टांगून होत्या,दोन्ही मुलींना पाणी देखील देण्यात आलं नाही,त्यामुळेच पाण्याविना आणि उलट टांगून ठेवल्याने ऋतुजा सानिका हिने आपले प्राण सोडले,सकाळी ही सर्व गंभीर बाब समोर आल्यानंतर घरच्यांनी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या अनुजाला आटपाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
व्ही वो - दुसरीकडे निर्दयी बापाकडून आपलं कृत्य लपवण्यासाठी ऋतुजावर अंत्यसंस्काराचा घाट घालण्यात आला, गुपचूपपणे अंत्यसंस्कार करण्यात येणार होता.मात्र तिकडे रुग्णालयात उपचार घेणारी अनुजा शुद्धीत आली,मग तिने बापाकडून करण्यात आलेल्या अमानुष छळचा पाढा वाचताच,डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली, पोलिसांनाही घटनेची माहिती दिली, मग पोलिसांनी थेट बनपुरीत जाऊन अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या अनुजाचा मृतदेह ताब्यात घेत,मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला,याप्रकरणी निष्ठूर बापास अटक देखील करण्यात आली आहे.
व्ही वो - आटपाडी पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती कारणातून दादू यमगर यांच्याकडून निर्दयी कृत्य केल्याचं सांगण्यात आलंय,या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे देखील आटपाडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
व्ही वो - मात्र लहान मुलींच्यावर शेजारच्यांनी केवळ चोरीचा संशय घेतल्याचा,रागापोटी बापाने केलेला अमानुष कृत्य,थरकाप उडवणारच तर आहेत शिवाय संतापजनक देखील आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowMar 27, 2026 10:48:210
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 27, 2026 10:47:340
Report
ABATISH BHOIR
FollowMar 27, 2026 10:37:47873
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 10:17:28933
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 27, 2026 10:15:331048
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 10:06:41904
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 27, 2026 09:34:421091
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 27, 2026 09:21:201089
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 08:34:11985
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 27, 2026 08:20:321016
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 08:19:38988
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 27, 2026 08:16:261064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 07:46:02999
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 07:31:10975
Report