Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

खेड तालुक्‍य में अनियोजित बारिश ने किसान लाचार, फसलें खतरे में

HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 10:06:41
Khed, Maharashtra
पुणे जिले के खेड तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली असून शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. उन्हाचा तीव्र ुकडाका सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम सुरू असताना या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आपला माल वाचवण्यासाठी शेतात धाव घेत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 12:07:30
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ, महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना सहन करावा लागला त्रास अँकर:--चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ बघायला मिळाला. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. महाविद्यालयात सोयीचं नसल्याने परीक्षा दीड तास उशिरा घेतली गेली मात्र ती पूर्ण झाली नसल्याने वर्ष वाया जाण्याची भीती परीक्षार्थींनी व्यक्त केली. परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. बाईट १) पीडित परीक्षार्थी
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 12:04:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शिराळा तालुक्यातल्या वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये तलाव कोरडे पडत असल्याने नागरिकांच्या कडून पिण्याच्या पाण्याची मागणी होऊ लागलेली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कोरड्या तलावांची पाहणी केली, यावेळी सिंचन योजनेच्या रखडलेली काम आणि कोरड्या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येत नसल्यास वरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंचं धारेवर धरले. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही, त्याठिकाणी योजनेचे पाणी दिल जात आहे, मात्र ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी पाणी दिलं जात, नसल्याचा आरोपदेखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 11:35:57
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग आंबेगाव प्रांत कार्यालयात खळबळ: प्रांत अधिकारी लाच प्रकरणात अटक प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. VO -आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, थेट प्रांत अधिकारीच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
1070
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 27, 2026 11:18:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा छडा लावून यातील प्रमुख आरोपी डॉक्टर युवराज पाटील याला यापूर्वी जेरबंद केलं. डॉक्टर युवराज पाटील हा बिद्री मधील श्रद्धा हॉस्पिटल मध्ये राजरोस गर्भलिंग निदान करत होता, त्याच बरोबर हजारो रुपये घेऊन याच हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीच्या हत्या करत गर्भपात करत होता. इस्पुर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपासला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपीची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉक्टर युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून लाखो रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सहा जणांचा सहभाग दुष्कृत्यात आढळून आला आहे. पोलिसांनी डॉक्टर युवराज पाटील यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील सुखदेव पाटील, सुनील सदाशिव गुरव यांना अटक केली आहे.
1086
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 27, 2026 11:02:18
Malegaon, Maharashtra:मालेगांव में चार वाहनों में अचानक आग लग गई। शालिमार होटल के पास गैरेज लाइन में आग ने आतंक मचा दिया। मालेगांव शहर के शालिमार के पास गैरेज लाइन में खड़ी चार चाकी वाहनों में अचानक आग फैल गई। आग पहले एक कार तक सीमित थी, लेकिन बाद में उसने आगे की तीन गाड़ियों को भी चपेट में ले लिया। शुक्रवार होने के कारण उस समय वहाँ कोई मौजूद नहीं था। सड़क पर शिवसेना जिल्हाध्यक्ष विनोद वाघ ने घटना देखी और उन्होंने फौरन फायर ब्रिगेड को बुलाया। फायर ब्रिगेड के चार टैंकर और अधिकारी-जनशक्ति ने आग पर काबू पाया। सौभाग्य से किसी के जीवन की हानि नहीं हुई, लेकिन चार गाड़ियाँ जलकर खाक हो गईं, जिससे लाखों रुपए के नुकसान की खबर है।
1015
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 10:17:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधन भरण्यावरील मर्यादा अखेर उठवली. ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने दुचाकीसाठी 200 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 2 हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची घालण्यात आलेली मर्यादा अखेर उठवण्यात आली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, राज्यातील सुमारे 10 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर घालण्यात आलेली बंधने देखील आजपासून पूर्णपणे मागे घेण्यात आली आहेत. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील पूर्वीचे आदेश रद्द करत नागरिकांना दिलासा दिला आहे. आता इंधन भरण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाईट : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
975
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 27, 2026 09:34:42
Pandharpur, Maharashtra:पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत केली माढा लोकसभा मतदारसंघातील मजबूत बांधणी जिल्हा परिषदेच्या तीन सभापती पदे माढा लोकसभा मतदारसंघात माढा लोकसभा मतदारसंघात जीवलग मित्र रणजीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. यानंतर आगामी लोकसभा निवडणूक साठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार बांधणी केली आहे. आज झालेल्या जिल्हा परिषद सभापती निवडीत माढा लोकसभा मतदारसंघात तीन सभापती पदे दिले आहेत l. माळशिरस मध्ये संस्कृती सातपुते यांना समाज कल्याण, माढा मधील अमृता वाघे यांना महिला बालकलाण, सांगोला मधील भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांना अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती पद दिले आहे.
1091
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 27, 2026 09:21:20
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड (नाशिक) - नाशिक जिल्ह्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलचे दर महागले. खाजगी पेट्रोल कंपन्यांना फटका, इंधनाच्या दरात केली वाढ. Anc: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती मुळे खाजगी पेट्रोल कंपन्यांना काही प्रमाणात फटका बसल्याचे पहावयास मिळत असून नायरा पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल व डिझेल च्या दरात रात्रीतून वाढ झाली आहे, पूर्वी 104 रुपये लिटर या दराने पेट्रोल मिळत असताना त्यात 5 रुपयाने तर डिझेल मध्ये 3 रुपयाने वाढ होऊन ते 93 रुपये झाले आहे, इंधनाच्या दरात वाढ झाली असली तरी त्याचा परिणाम ग्राहकांना जाणवत नसताना, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचे पेट्रोल पंप मालकाचे म्हणणे आहे
1100
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 08:46:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - बापाच्या सैतानी कृत्याने जिल्हा हादरला..! चोरीच्या संशयाने मुलींना उलटे टांगून ठेवले,एका चिमुरडीचा मृत्यू तर एक अत्यावस्थेत.. अँकर - मुलींच्यावर शेजारच्यांनी चोरीचा संशय घेतल्याने,एका बापाने आपल्या पोटच्या दोन्ही मुलींचा अमानुष छळ करून एका मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. घरातल्या खुंटीला चिमूरड्या मुलींना उलट टांगुन ठेवल्याने हा प्रकार घडला आहे. ग्राफिक्स in आटपाडीच्या बनपुरी मध्ये एका बापाचा राक्षसी आवतार पोटच्या दोन चिमुकल्या मुलींवर बापाकडून अमानुष छळ दोरीने हातपाय बांधून घरातल्या खुंटीला रात्रभर उलट टांगून ठेवलं पाण्याविना तडफडून व उलटे टांगून राहिल्याने 9 वर्षीय चिमुरडी ऋतुजा दादू यमगरचा मृत्यू 11 वर्षीय बहीण अनुजा सरगरची प्रकृती चिंताजनक निर्दयी दादू यमगरला आटपाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या ग्राफिक्स आऊट व्ही वो - आटपाडीच्या बनपुरी मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हा धरून गेला आहे.पोटच्या मुलींवर निर्दयी आणि निष्ठूर बापाने अमानुष अत्याचार केल्याने नववर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. ऋतुजा उर्फ सानिका दादू सरगर,असं या निष्पाप मुलीचे नाव आहे. तर बापाच्या या अमानुष्यमुळे अनुजा सरगर हे अत्यावस्थेत आहे. बाईट - विनय बहिर - पोलीस निरीक्षक - आटपाडी,सांगली. व्ही वो - बनपुरी मधील राहणाऱ्या यमगर दादू यमगर यांनी आपल्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय.शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन्ही मुलींवर चोरीचा आळ घातला,या रागातुन दादू यमगर यांनी आपल्या दोन्ही मुलांचे हातपाय दोरीने बांधून रात्रभर घरात उलट टांगून ठेवले. व्ही वो - रात्रभर दोन्ही मुली उलट्या टांगून होत्या,दोन्ही मुलींना पाणी देखील देण्यात आलं नाही,त्यामुळेच पाण्याविना आणि उलट टांगून ठेवल्याने ऋतुजा सानिका हिने आपले प्राण सोडले,सकाळी ही सर्व गंभीर बाब समोर आल्यानंतर घरच्यांनी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या अनुजाला आटपाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. व्ही वो - दुसरीकडे निर्दयी बापाकडून आपलं कृत्य लपवण्यासाठी ऋतुजावर अंत्यसंस्काराचा घाट घालण्यात आला, गुपचूपपणे अंत्यसंस्कार करण्यात येणार होता.मात्र तिकडे रुग्णालयात उपचार घेणारी अनुजा शुद्धीत आली,मग तिने बापाकडून करण्यात आलेल्या अमानुष छळचा पाढा वाचताच,डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली, पोलिसांनाही घटनेची माहिती दिली, मग पोलिसांनी थेट बनपुरीत जाऊन अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या अनुजाचा मृतदेह ताब्यात घेत,मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला,याप्रकरणी निष्ठूर बापास अटक देखील करण्यात आली आहे. व्ही वो - आटपाडी पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती कारणातून दादू यमगर यांच्याकडून निर्दयी कृत्य केल्याचं सांगण्यात आलंय,या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे देखील आटपाडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. व्ही वो - मात्र लहान मुलींच्यावर शेजारच्यांनी केवळ चोरीचा संशय घेतल्याचा,रागापोटी बापाने केलेला अमानुष कृत्य,थरकाप उडवणारच तर आहेत शिवाय संतापजनक देखील आहे..
981
comment0
Report
Advertisement
Back to top