Back
हिवरखेड नगर परिषद चुनाव में राजनीतिक घमासान: पहली बार महिला अध्यक्ष के साथ मुकाबला
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 05:49:03
Akola, Maharashtra
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषद विशेष ठरत आहे. दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला यंदा यश मिळाले असून, ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेपर्यंतचा प्रवास करणारी सध्याच्या राज्यातील निवडणुकीतील ही एक मात्र नगरपरिषद आहे आणि पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा महिलेकडे सोपवण्यात आली आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी येथे मोर्चेबांधणी गतीने सुरू केली आहे. भाजपने अनुभवी राजकारणी आणि जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे यांच्या नावावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन भाजपने मतदारांना दिले आहे. हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात सुमारे २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी तब्बल ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी अल्प मतांच्या फरकाने कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी बूथ पातळीवर शक्तीझोत लावण्यास सुरुवात केली आहे. या नगरपरिषद निवडणुकीत आणखी एक राजकीय घडामोड चर्चेत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक पातळीवर दिलेला पाठिंबा ही अभूतपूर्व युती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यात दोन्ही पक्षांमध्ये कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्यांदा नगरपरिषदेचा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली ही निवडणूक त्यामुळे राजकीय दृष्ट्या अधिक रंगतदार बनली असून, अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.
125
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:00:25Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर उरण मार्गांवर वाहतूक कोंडी. दोन ते तीन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा. डांबर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी. सध्या टँकर बाजूला करुन वाहतूक कोंडी पूर्वरत करण्याचं काम वाहतूक पोलीस करीत आहेत
0
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:46:1337
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 21, 2025 06:35:4929
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 06:19:09155
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:15:51158
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 06:02:5391
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 06:00:36128
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 05:33:31171
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:47163
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:23177
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 05:16:37172
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 21, 2025 05:01:07230
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 05:00:45194
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 04:49:05115
Report