Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी में बारिश से किसानों की चिंता बढ़ी; पकने वाला धान प्रभावित

PPPRANAV POLEKAR
Oct 03, 2025 03:16:44
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी तुरळत तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी चिपळूण ,संगमेश्वर , लांजा , राजापूर आदी भागात पावसाच्या सरी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली कापणी योग्य झालेलं भात पिक पावसामुळे अडचणीत येण्याची शक्यता
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 03, 2025 06:20:16
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा येथे दसऱ्याच्या दिवशी शतकानुशतके चालत आलेली पारंपरिक मिरवणुकीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ एरंडा यांच्या वतीने हा सोहळा पार पडला. दसऱ्याच्या निमित्ताने गावातील भवानी मातेला पालखीतून रानामध्ये सोनं-चांदी आणण्यासाठी नेण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. या पालखीच्या मिरवणुकीत संपूर्ण गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशाच्या गजरात, जय भवानी-जय दुर्गेच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. पालखी परत आल्यानंतर गावामध्ये जोत लावून भवानी मातेची मिरवणूक काढण्यात येते. विशेष म्हणजे, या जोतीतून प्रज्वलित करण्यात आलेल्या दोरीसह गावकरी पारंपरिक नृत्य करतात, ही प्रथा आजही कायम आहे. या सोहळ्यामुळे एरंडा गावात एकात्मतेचे, भक्तीचे आणि जल्लोषाचे अनोखे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 06:15:24
Nagpur, Maharashtra:नागपूर परिणय फुके ओबीसी नेते. On उद्या होणाऱ्या ओबीसी बैठक. राज्य सरकारने जीआर काढल्या त्यावर काहींना गैरसमज झाला.. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती त्यांनी चार तारखेला सकाळी साडेअकरा वाजता अतिथी गृहावर बैठक बोलावली आहे.. - अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे, अतुल सावे, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे, यासह ओबीसीचे प्रमुख नेते असतील. - यात चुकीचे समाज झाला ,यात जीआर मुळे, काय बदल असलेले पाहिजे, ओबीसीचे आरक्षण बहाल असले पाहिजे, यासह अनेक विषयांवर चर्चा होणार आहे... On उद्धव ठाकरे- फडाणीस - उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य नाही, कपोलकल्पित सर्व्हे आणि आकडे असतात, त्यांचे कंपाउंडर संजय राऊत यांचा सर्व्हे असते, ते त्या सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर असते. याला सिरीयस घेऊ नका.. On rss विषारी फळ - उद्धव ठाकरे यांची वैचारिक उंची एवढी नाही की त्यांनी RSS वर किंवा सरसंघचालक यांच्यावर टीका करावी. On पंतप्रधान बेशरम - उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहे, जनतेने त्यांना नाकारले असل्यानं, त्यांचा लोकांनाच नेतृत्वात आता शंका आहे, त्यामुळे यातून बोलले, On एकत्र संकेत - दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर फरक पडणार नाही, त्यांनी विश्वास हार्यता गमावली आहे.. मागील 25 वर्षांपासून त्यांच राज्य होत, मराठी माणसाला हद्द पार करण्याचे काम केले आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 06:15:13
Nagpur, Maharashtra:On जरांगे शेतकरी मदत मागणी * मराठा आणि ओबीसी समाजातील 90 टक्के लोक शेतीवर अवलंबून. * महाराष्ट्रातील सध्याच्या अतिवृष्टीमुळे हे सर्व लोक मोठ्या संकटात सापडले आहे. * म्हणून सरकारची जबाबदारी आहे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून आर्थिक मदत करावी. सरकारकडून मदतीचा पहिला हप्ता मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत.. On जरांगे शेतीला नोकरीचा दर्जा मागणी * शेतीला नोकरीचा दर्जा देणे, हा नवीनच मुद्दा आहे, आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. ते कोणत्या आधारावर असे बोलले मला माहित नाही.. On गावातील एकाच आडनावाच्या व्यक्तींना प्रमाणपत्र द्या * असे मुद्दे उपस्थित करून ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे.. *एका गावात सारख्या आडनावाचे मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात.. त्यामुळे सारखे आडनाव असताना चौकशीविना प्रमाणपत्र देणे योग्य ठरणार नाही.. सारख्या आडनावाच्या मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात.. अशाने तर खुल्या वर्गातील व्यक्ती सुद्धा कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेऊन जाईल..* On उद्याची ओबीसी बैठक * *आम्हालाही बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे.. आमच्या दहा जणांच्या शिष्टमंडळाला उद्या दुपारी एक वाजता सह्याद्री सभागृह मध्ये बोलावले आहे.. मात्र अजून विषय पत्रिका आलेली नाही.. त्यामुळे कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होईल हे अजून स्पष्ट नाही,* त्यामुळे जास्त वक्तव्य करू शकत नाही... On मराठा जीआर मुळे नुकसान शक्य * सरकार उद्याच्या बैठकीत काढलेल्या जीआर संदर्भात आपली भूमिका मांडेल.. त्यामुळे ज्या नेत्यांच्या मनामध्ये जीआर बद्दल शंका आहे, त्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.. त्यातून त्यांचे समाधान होतो की नाही हे स्पष्ट होईल. त्यांचे समाधान झालं नाही, तर काय भूमिका घ्यायची, हा त्यांचा प्रश्न आहे.. मात्र आमचा समाधान आधीच झाला होता.. On जरांगे हैदराबाद गॅझेट लागू करा मागणी * *ज्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं, तेव्हापासून आजपर्यंत ते सांगत होते की हैदराबाद गॅझेट लागू झाला.. संपूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलं आहे.. आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेट लागू करा असं म्हणणं किती अतिशयोक्ती चे आहे.. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हेच समजत नाही.* त्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहे...
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 03, 2025 06:03:44
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन उद्धव ठाकरे पाऊस सभा सगळं सुरू असताना पाऊस आणि त्या पावसात विचलित न होता नेत्याने भाषण करणं हे अनेकदा झाला आहे माननीय शरद पवार साहेबांचे भाषण फार गाजलं पण कालचा शिवतीर्थ आवडता शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक होता असा मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्र मध्ये तुफान पावसाचा वातावरण होतं आणि पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार आहे याचे पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी सगळ्यांशी चर्चा केली काय करायचे तेव्हा आम्ही सगळ्यांनी असा ठरवलं परंपरा जी आहे तीच ठेवायची अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात आहे अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो नाही तर ते चुकीचा आहे आणि आपण शिवतीर्थावर मेळावा घ्यावा आणि तुम्ही काल पाहिले असेल कालही पाऊस पडत होता या पावसात सभा झाली मेळावा झाला हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे महाराष्ट्र मधलं राजकीय चित्र आहे दर्शवणारा आहे लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीने काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाही ठामपणे उभे होते आणि त्या पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपला भाषण पूर्ण केलं किंबहुना उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थिती मध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून थांबू नका बोला अशा घोषणा केल्या येत होत्या हे भाग्य आणि पुण्य फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात हे फक्त त्यांच्यासाठी आणि ठाकरे कुटुंबारासाठी आहे बाकी कोणासाठी नाही ऑन राज ठाकरे युती संदर्भात घोषणा आमच्या भावना आहेतच राज ठाकरे यांच्या विषयी आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असतील तरी एकमेकांविषयी प्रेम असता मंत्री नातं हे कायम ठेवलं म्हणून आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकलो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही विषयी जाहीरपणे बोलू शकतात शिवतीर्थावर सभा होते हे शिवतेर्थ आपला आहे आणि या शिवतेर्थ पलीकडे शिवतीर्थ आहे तिथे सुद्धा आपल्या नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक जड करायचा आहे ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा जो प्रतिसाद होता तो ही आपण पाहिला असेल अर्थ तुम्ही विचारताय युतीची घोषणा कधी करणार आणि का केली नाही हा तुमचा पुढला काही दिवस सतत विचारला जाईल काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूने मालाची पूर्ण तयारी आहे एवढेच मी सांगू शकतो ऑन एकनाथ शिंदे विधान एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर नाहीत किंवा बॅरिस्टर नाथपई नाहीत एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या बेईनामी कंपनीचे इकडले ब्युरो चिफ मूळ कंपनी जी आहे अमित शहा यांची त्या बेनामी कंपनीचे शिवसेना नावाने कंपनी काढलेली ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल त्या बेईनामी आम्ही कंपनीचे तेव्हा ही सगळी चौकशी होईल मी काही त्यांचा पाहत नाही ऐकत नाही कोणाचा ऐकायचं महाराष्ट्राला महान वक्ते किंवा नेत्यांची भाषण ऐकायचे परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकरे यामुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारे एखाद्याने वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभे राहून पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे म्हणजे तुमच्या बरोबर जे आमदार आहेत पळून गेलेले त्यांची किंमत 50 50 100 कोटी झाली सुरतला कोण पळून गेला मुंबईतून गोहाटीला कोण पळून गेला हे पळ कुठे आहेत काहीही बोलायचं उचलली जीभ लावली टाळ्याला लिहून दिलेली भाषणे वाचायची मुंबईला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धाने निष्ठेने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा जो अमित शहा यांनी उचलला आहे आणि मुंबईत गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्या चंग अमित शहा आणि त्याच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहांच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडे पुसे आहेत शब्द मे खूप काळजीपूर्वक वापरत आहे जोडे पुसे अमित शहा यांनी ज्या प्रकारचा राजकारण मुंबईत सुरू केलं मराठी माणसाचा तोडायचा त्याचा निषेध करण्याची हिम्मत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे त्यांनी चालवले आहे तांच्या इतिहासात नोंद होईल काळाकुट्ट अक्षरात नोंद होईल मुंबई मराठी माणसापासून सोडण्याचा जे कारस्थान अमित शहा यांनी जे सुरू केलं अमित शहा यांच्या हातामध्ये कुराड देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं ऑन एकनाथ शिंदे विधान यांना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं केवळ आमच्या आग्रहाने केलं ह्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नेता केला नव्हता बाळासाहेब ठाकरे यांनी नेते केले जे मोजके लोक आहेत त्यातला मी आहे बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलाने दयावान बुद्धीने या सगळ्याांना नेता केलं तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगर विकास मंत्री केला राज्याचा मग कटप्रमुख कसले तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटीचा मालक झाला एका वेळेला एका वेळेला 50 50 कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर 100 कोटी उधळतो हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे शक्य आहे तुम्हाला तुम्ही कोण होता त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल आहे तिथे त्यांनी बसावं शांतपणे दिवसभर बसावं आत्मा चिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दान होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले हे दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला हाडवेद्य दोनदा सर्टिफिकेट बघा त्यांच्या मोदी मागे पडतील तर हे उद्धव ठाकरे यांचे किती जाणार आणि नियत याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहा यांच्या पालकांचा त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे ऑन रामदास कदम वक्तव्य मी तिकडे होतो हे नव्हते तुम्ही तेव्हा लहान होता तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातोश्री वरती होतो बाळासाहेब यांच्या पूर्ण आजारपणात शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे आता यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल भीती पोटी आणि त्याचा उगाळत असेल तर तुम्ही आता काय करणार शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक होत आहे शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणे हा ज्या शिवसेनेने तुम्हाला आम्हाला मोठे केलं ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याशी बेईमानी पद्धतीने अशा प्रकारचा वक्तव्य करतात ऑन चषक मला नियम काही माहित नाही आम्ही भारत पाकिस्तान सामना कधी विचार केला नाही मॅच पाहिली नाही तो सामना जिंकला की आला हे माहिती नाही मी इतकाच म्हणालो त्या सामनातून मिळालेल्या उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला किंवा भारतीय सैन्याला द्यावे अकराशे बाराशे कोटी मिळाले आहेत आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ है त्यांनी चषक घ्यायला नकार दिला इतका जर राष्ट्रवाद असे त्यांच्या मनात आणि पाकिस्तान द्वेष असेल शत्रू विषय असेल तर पाकिस्तानबरोबरच्या सर्व सामन्यात त्यांना जे मानधन मिळाला आहे ते त्यांनी 26 निरप्रात मारले गेले त्याच्या कुटुंबाला द्यावा मग आम्ही त्यांच्याविषयी सांगून त्यांनी चषक घ्यावा की नको
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 03, 2025 05:50:08
Pimpri-Chinchwad, Maharashtra:लिफ्टच्या दरवाजात अडकल्याने बारा वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी मधील दुर्देवी घटना राम स्मृती सोसायटी इथ काल संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मंजल्या दरम्यान लिफ्ट अडकून बसली होती. या लिफ्टमध्ये एका 12 वर्षाचा मुलगा अडकून फसला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळाकडे रवाना होऊन लिफ्ट मधून मुलाची सुटका करून त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 05:18:09
Bhandara, Maharashtra:ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थी शहरातील शाळा- महाविद्यालयांमध्ये एसटी महामंडळाच्या बसने नियमित ये-जा करत असतात. दरम्यान शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका शालेय विद्यार्थिनीला एसटीच्या एका महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संताप जनक प्रकाराचे चित्रीकरण काही ग्रामस्थांनी केले. त्यानंतर एसटी बस थांबवून संतप्त गावकऱ्यांनी महिला वाहकाला तिच्या वागण्याचा जाब विचारला.या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेते थेट पोलीस ठाणे गाठले आणि महिला वाहकावर कारवाईची मागणी केली आहे. मागील काही दिवसात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही महिला वाहक भलतेच धाडस करण्यास धजावत असून या महिला वाहकांना कुणाचाही धाक नसल्याचे दिसून येत आहे. असाच एक संताप जनक प्रकार काल एका महिला वाहकाकडून घडला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 03, 2025 05:03:35
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 04:48:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - तासगाव मध्ये पहाटेच्या सुमारास अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापणा. Anchor - मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या तासगाव मध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून तासगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे,पहाटेच्या सुमारास उपोषणकर्ते प्रशांत सदामते यांचे नेतृत्वाखाली शहरातल्या स्टॅन्ड चौक परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.तासगाव शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभा करावे,यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 03, 2025 04:32:30
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात गेल्या सत्तर, पंचेहात्तर वर्षात ज्या वाईट प्रवृत्ती फोफावल्यात त्यांना जबाबदार असणाऱ्यांचा नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे असे वक्तव्य विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केले. काल दसऱ्यानिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. नांदेड शहरात रस्त्यावरून नीट वाहने नेता येत नाहीत. ज्यांच्या हातात महापालिका होती त्यांनी नांदेडच्या सर्व सार्वजनिक वापराच्या जमिनी बिल्डरांच्या घष्यात घातल्या. त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल त्यात मी पण असेन असे वक्तव्य करत हेमंत पाटील यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 03, 2025 04:17:16
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 03, 2025 04:17:03
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 03, 2025 03:49:11
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top