Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

युद्ध ने वाइनरी उद्योग पर असर डाला, आयात-आपूर्ति और बिक्री प्रभावित

HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 02:45:17
Junnar, Pune, Maharashtra
आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम वाईनरी उद्योगावर झाला असून वाईन बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा मोठ्या प्रमाणात भारताबाहेरून येतो मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याच्या आयातीवर मोठा परिणाम झालाय तर दुसरीकडे गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद असल्याने त्याचा परिणाम वाईन च्या विक्री वरती झालाय या सर्व परिस्थिती चा वाईनरी कंपनीतून आढावा घेत तेथील व्यवस्थापकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 23, 2026 04:05:43
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 04:01:39
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.लहान मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषण आहार देणे अपेक्षित असताना,अनेक ठिकाणी मुलभूत सुविधाचाच अभाव आहे.शहरातील दहा अंगणवाड्यांपैकी पाच अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नाहीत.त्या भाड्याच्या जागेत सुरू असल्या तरी तेथेही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येते.याशिवाय, मुलांसाठीचा पोषण आहार अद्यापही जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये साठवून ठेवला जात आहे.अनेक ठिकाणी फरशी उखडलेली असून स्वच्छतेचा अभाव आहे.त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 03:47:20
886
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:37:39
Kolhapur, Maharashtra:इराण इजराइल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुतगारात भरमसाठ वाढ झाल्याचं दिसून येत आहे. युद्धाचे निमित्त करून सूतगिरण्यांसह व्यापारी वर्ग कृत्रिम वाढ करत असल्याचा आरोप इचलकरंजी मधील यंत्रमानधारकांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या युद्धामुळे इराण आणि अमेरिकेतून येणाऱ्या कापसाची आयात थांबली आहे, देशातून अन्य देशात कापसाची निर्यात सुरू आहे. त्यामुळे कापूस दरात अंशतः वाढ झाली आहे, असं असताना त्याचा गैरफायदा सूतगिरण्या आणि व्यापारी वर्ग घेत असल्याचा आरोप केला जात आहे. कापूस दरवाढीच्या तुलनेत प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात सूतदरात 17 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळेच इचलकरंजी मधील यंत्रमाग धारकानी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे。
927
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:31:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गात शासकीय योजनांचे प्रचार करणारा एक ट्रक रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपासून ८ वाजेपर्यंत देवळाई चौकातील लोखंडी कमानीत अडकला होता. यामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी झाली. ट्रक निघत नसल्याने भुयारी मार्गातील अडकलेली वाहतूक रिव्हर्स घेऊन शिवाजीनगर येथून देवळाईकडे संग्रामनगर उड्डाणपूलावरून सोडण्यात आली. गारखेडा परिसरातील कार्यालयापासून मॅप लोकेशनद्वारे दिलेल्या ठिकाणी जाण्यास ट्रक निघाला. शिवाजीनगरकडून भुयारी मार्गाला लोखंडी कमान नाही. त्यामुळे ट्रक भुयारी मार्गात जाऊन देवळाई चौककडे बाहेर निघतांना लोखंडी चौकटीत फसला. नागरिकांनी ट्रॅकची हवा सोडून गाडीच्या वरील बाजूचे लोखंडी रॉड तोडण्याचे प्रयत्न केले. शेवटी जेसीबी बोलून ट्रक खेचून काढण्यात आला.
1068
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:18:36
909
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 23, 2026 03:15:54
Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानीला ‘वारा घालण्याच्या’ पारंपरिक सेवेची सुरुवात ANC-श्री तुळजाभवानी मंदिर येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’ पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून, अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे。
1013
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:15:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाच्या तपासात आता आर्थिक - उलाढाल समोर येत आहे. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढेंकडून हडपलेल्या ६५ लाखांपैकी १२ लाख खर्च करून जग्वार कार घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली असली तरी, उर्वरित ४३ लाखांहून अधिक रकमेचा गुंत्ता अद्याप सुटलेला नाही. या पैशांचा वापर नेमका कुठे झाला हा उलगडा पोलिस अद्याप करू - शकले नाहीत. आरोपीने घेतलेली ही कार अपघातात निकामी झाली होती. आरोपीने ती दुरुस्तीसाठी कोकणवाडी येथील एका गॅरेजमध्ये ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार ताब्यात घेतली. मात्र, पैशांच्या हिशेवात आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असून समाधानकारक उत्तरे देत नाही. आरोपीने गुन्ह्यात वापरलाेला मोबाइल पुण्यात लपवून ठेवला आहे. तो हस्तगत करण्यासाठी एक पथक पुण्याला रवाना होणार आहे.
989
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:15:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, एप्रिल ते जून या कालावधीत सोयगाव तालुका वगळता वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, पैठणसह इतर तालुक्यांतील ५९३ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांची आखणी केली आहे. जिल्ह्यातील ५९३ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि इतर पूरक उपाययोजना राबविण्यासाठी तब्बल ३५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
908
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:00:57
Kolhapur, Maharashtra:शस्त्र तस्करी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मध्यप्रदेशात छापा टाकून चार पिस्तुले जप्त केली आहेत. याप्रकरणी गावठी पिस्तूल बनवणाऱ्या कारागिराला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सरnaam नहारसिंह बरनाल अस मध्यप्रदेश मधील सिंगनूर इथून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसापूर्वी इचलकरंजी मधील शस्त्र तस्कर मनीष नागोरी याला पोलिसांनी अटक केली होती, या तपासात नागोरी मध्यप्रदेश मधून गावठी पिस्तूल आणायचा अशी माहिती समोर आली, त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यप्रदेशात कारवाई करत चार गावठी पिस्तुले जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला सरनाम आणि त्याच्या कुटुंबातील इतर तरुण चाव्या बनवण्याची कामे करतात. यातूनच त्यांनी गावठी पिस्तुले बनवण्याचा उद्योग सुरू केल्याच समोर आल्या आहे. सरनाम बरनाल या आरोपीच्या मूळ गावी पिस्तूल बनवण्याचा कारखाना असल्याचा संशय देखील पोलिसांनी आल्याचा संशय.
1016
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 03:00:30
1039
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:00:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांसह गॅसपुरवठ्यावर संकट आहे. दररोज जेवढे घरगुती गॅस सिलिंडर वितरण केले जायचे, त्याच्या पाचपट बुकिंग दरोज होत असल्याने गॅस वितरक एजन्सीसमोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात दररोज २० हजार १३० तर शहरात सरासरी १० हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरीत होणे शक्य आहे. असे असताना रोज ६० हजार सिलिंडरची रोज मागणी होत आहे. हा सगळा प्रकार पाहून एजन्सीधारकांसह पुरवठा विभागही चक्रावून गेले आहे. ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा सुरू असली तरी गॅस सिलिंडर केव्हा मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे कुणालाही निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. इंडियन ऑइलकडे २ लाख ८३ हजार, इण्डेनकडे ४ लाख १० हजार तर बीपीसीएलकडे ४ लाख ८३ हजार सिलिंडर ग्राहक आहेत.
1062
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 02:50:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आर्थिक कोंडीमुळे कायमच तिजोरी रिती राहणाऱ्या छत्रपती संभाजी नगर 4 जिल्हा परिषदेला यंदा मात्र 'लक्ष्मी' पावल्याचे चित्र आहे. अलीकडेच मुद्रांक शुल्काच्या थकबाकीसह बँकेत जमा निधीवरील व्याजातून तब्बल ४० कोटी ४३ लाख रुपये, तर १५व्या वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ मधील 'अबंधित' निधीची सुमारे ६.५ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने जि. प.ची आर्थिक घडी सावरू लागली आहे. जिल्हा परिषदेची बहुतांश विकासकामे शासनाच्या अनुदानांवरच अवलंबून असतात. परिणामी, निधीअभावी अनेक योजना रखडत होत्या, तर काही कामे अपुरीच राहत होती. अशा परिस्थितीत प्रलंबित मुद्रांक शुल्काची थकबाकी आणि जमा निधीवरील व्याजाची मोठी रक्कम मिळाल्याने तिजोरीला एकदम बळ मिळाल्याची भावना आहे...
1018
comment0
Report
Advertisement
Back to top