Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410509

बेल्हे-जेजुरी हाईवे पर बिबट्या हमले के विरोध में रोडरोको, 15 पर मुकदमा

HCHEMANT CHAPUDE
Nov 08, 2025 09:33:30
Ambegaon, Maharashtra
बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ बेल्हे जेजुरी महामार्गावरील Roadेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणे ग्रामस्थांना भोवलं असून आंदोलकांवर पारगाव पोलीस ठाण्यामध्ये, देवदत्त निकम, दामू घोडे, डॉक्टर सुभाष पोकळे, अरुण गिरे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आंदोलकांनी बेल्हे जेजुरी महामार्ग तब्बल पाच तास रोखून धरला होता.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Nov 08, 2025 11:52:51
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 08, 2025 11:50:23
Nanded, Maharashtra:एका सहा वर्षीय मुलीवर युवकाने आत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्हयातील मुखेडमध्ये घडली. या मुलीवर 20 वर्षीय युवकाने अत्याचार केले. आरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केली. पीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून बांधकाम सूरू असलेल्या घरी नेले. तिथे या चिमुकलीवर अत्याचार केले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. आमदार तुषार राठोड हे सुद्धा मोर्चात सामील झाले होते. यावेळी ठाण्यात नागरिकानी ठिय्या केला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकानी केली. दरम्यान तीन दिवसात प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार असल्याचे पोलीस अधिकऱ्याने सांगितले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 08, 2025 11:28:41
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 08, 2025 11:21:22
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिका बाबत मनोमिलन होणार का विचारले असता त्यांनी मनोमिलन होणार असल्याचं यावेळी सांगितलं. यादरम्यान त्यांनी मला नगराध्यक्ष व्हायचंय असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली बाईट- खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र सातारा नगरपालिकाेच्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया देत भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन मनोमिलनाबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला पाहायला मिळत आहे. बाईट: मंत्री शिवेंद्रराजे भोसले
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 08, 2025 11:11:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आला असून कोट्यावधींची बक्षीस या बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आली आहेत. 400 ते 500 एकर क्षेत्रावर बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आलं असून अडीच हजार बैलगाडी आणि पाच हजार बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत, त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत या बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार असून या शर्यतीच्या ठिकाणांचा आढावा घेत, चंद्रहार पाटलांशी संवाद साधलाय, आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 08, 2025 11:07:09
Oros, Maharashtra:मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद मुद्दे ऑन नारायण राणे युती --- राणे साहेबांसोबत कुडाळ मध्ये भेट घेतली. आमची भूमिका कायम आहे. युतीने पुढे जावं हे राणे साहेबांच मत आहे. आमची सविस्तर चर्चा झालीय प्रत्येक जिल्ह्यात युती व्हावी ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. युती जर झाली नाही तर शिवसेना म्हणून आम्ही लढणार पण आमची भूमिका समन्वयाची आहे राणे साहेबांची भूमिका आम्हाला मान्य आहे ऑन पालकमंत्री --- राणे साहेबांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे. काल आमची रत्नागिरीत बैठक झाली आम्ही रत्नागिरीत युती म्हणून पुढे गेलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मी युती साठी बोलायला तयार आहे. मला भेटायचं नसेल शिंदे साहेबांना भेटा ऑन नारायण राणे ( संबंध सोडू ) --- त्यांनी शहर विकास आघाडीसोबत आमचा संबंध नाही आणि उबाठा सोबत आम्ही युती करणार नाही ऑन युती साठी कोण बसायला तयार नाही ---- तुमच्या मनातलं उत्तर मी दिल तर सद्या परवडणार नाही ऑन नितेश राणे --- राणे साहेबांनी प्रेस घेतली त्याला महत्व आहे. ऑन भाजपा स्वबळावर --- कार्यकर्त्यांना भावना लक्षात घेऊन रवींद्र चव्हानींनी ते भाष्य केले असेल युती मध्ये मिठाचा खडा टाकणार वक्तव्य मी करणार नाही राजन तेली महायुतीच्या प्रोसेस मध्ये आडकाठी करणार नाही उबाठा आणि आम्ही एकत्र येणार नाही. राजन तेली कणकवली बाबत बोलले तिकडे आमची ताकत कमी आहे सिंधुदुर्ग वासियांची इच्छा आहे कि भगवा फडकला पाहिजे महायुती झाली कि महायुतीचा भगवा फडकेल आम्ही भाजपा सोबत बसायला तयार आहोत. दोन्ही जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आमच्या इकडे खेळीमेळीने झालंय राणे साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत ऑन midc --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 नवीन कारखाने आलेत आडाळी midc मध्ये कोणत्याही उद्योजकला जागा दिलेली नाही आडाळी midc मध्ये 34 हेक्टर जमीन सापडत नाही ऑन विजय वाडेट्टीवर --- निवडणुका आल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हया सगळ्या केवळ अफ़वा आहेत प्रताप सरनाईक असं काय करतील असं वाटतं नाही midc मध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या असतील तर त्या काढून घेण्यात येतील. Midc मध्ये मैदानासाठी जागा देण्याचे आज निश्चित केले आहे. ऑन उद्धव ठाकरे ( वोट बंदी ) -- लोक ऐकतील का ?? विधान सभेला हे सगळे पराक्रम करुन झालेले आहेत. ज्यांनी आयुष्यभरात मतदार यादी बघितली नाही.. ते यमक चांगले जुळवतात महायुतीची सत्ता येईल ऑन आदित्य ठाकरे महापौर -- त्यांना शुभेच्छा त्याच्या संकल्पनेला दाद देतो feed live link
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 08, 2025 10:59:32
Shirdi, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर्स - एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा ইয়ाच आश्चर्य वाटतं... ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात... निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो , मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही... कर्ज घ्यायच , पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची.. अस मी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोललो... आज तीच अवस्था , विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला... अनेक वर्ष मी सामाजिक जिवनात काम करतोय , मी बेताल वक्तव्य कधी करत नाही... माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही , कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुढे आला... संपूर्ण वृंत्तात जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता.. ऑन प्रताप सरनाईक जमीन - विरोधकांनी आरोप केला की त्यात काही तथ्य असेल असे नाही , चौकशी होईल.. ऑन पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण - हे खरेदीच प्रकरण माझ्याकडेही आले होते... शेवटी ज्या महार वतनाच्या जमिनी , सरकारी जमिनी आहेत त्याबाबत आपण निर्णय करूच शकत नाही.. त्या त्या मंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलेच होते.. हा पूर्ण व्यव्हारच नियमबाह्य आहे .. ज्या वादाच्या जमीनी , वतनाच्या जमीनी याबाबत जिल्हापातळीवर काही झालय याची मला माहीत नाही.. वर्ग 2 मधून वर्ग एक करून जिल्हाधिका-यांवर दबाव आणुन व्यव्हार झाल्याचे काही प्रकरण समोर आले आहेत... एकदा ‌चौकशी होवून जाऊ द्या... तो व्यवहार रद्द झालाय मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीची घोषणा केली , अजीत पवारांनी देखील चौकशीच स्वागत केलय.. हा विषय माझ्या दृष्टीने संपलाय... स्टँम्प डयूटी बाबत जी कार्यवाही व्हायची ती होईल .. तो प्रकियेचा भाग .. अजीत पवार राजीनामा मागणी - राजीनामा मागण्याची फॅशन सुरू झालीय , विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिला नाही... कोणी बांदावर जातं , कोणी शेतावर जातं...कोणी वोट चोरीचे प्रकरण काढतय , जे पराभुत झालेत किंवा जे शे - दोनशे - पाचशे मतांनी निवडून आले त्यांनी हि चिंता... लोकांनी तुम्हाला घरी बसवलय , आता थोडी शांतता घ्या ...विश्रांती घ्या.. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्धव ठाकरेंसह विरोधकांना अप्रत्यक्ष टोला...
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 10:56:47
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे आज भव्य शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचे सन्मान करण्यात आले तर शेतकऱ्यांनी वाढत्या उत्पादन खर्च आणि हमीभावातील तफावत याबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेला न्याय देत केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर थेट टीका केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्यावरील ओझे कमी करणे हे उत्तम उपाय असल्याच ते म्हणाले. पवार यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजारपेठांशी जोडणी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिंचन प्रणाली यांचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. या मेळाव्यात अकोला व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध प्रश्नोत्तर सत्रांदरम्यान शेतकऱ्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोर आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या.
2
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 08, 2025 10:47:12
Amravati, Maharashtra:वडेट्टीवार पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले वडेट्टीवार हर्षवधन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहून गांधी यांचं तोंड पाहत नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे – चंद्रशेखर बावनकुळे यावेळी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करतांना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक लोक आमच्या पक्षात येत आहे काँग्रेसची हालत खराब आहे त्यामुळे नागपुरात वडेट्टीवार हे पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले हे वडेट्टीवार यांचं तोंड पाहत नाही आणि हे दोघेही हर्षवर्धन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहुल गांधी यांचे तोंड पाहत नाही असे बावनकुळे असे बावनकुळे म्हणाले आहे त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे म्हणून वडेट्टीवार पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साऊंड बाईट :- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
1
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 08, 2025 10:46:40
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असताना पालिकेनं अद्याप सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर केलेली नाही. यासाठी महाविकास आघाडीने अंबरनाथ पालिकेबाहेर आंदोलन करत सदोष मतदार यादीची होळी केली. निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. अंबरनाथ नगरपालिका च्या अंतिम मतदार यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती, मात्र तांत्रिक चुकीमुळे अनेक नावं दुसऱ्या प्रभागात गेली होती. सुमारे ३२ हजार मतदार इतर प्रभागात गेल्याचा आरोप झाला होता. ही चूक विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच पालिकेने यादीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. परंतु आता सोमवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असला, तरी अजून सुधारीत अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन करत मतदार याद्यांची होळी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजित काळे, संदीप पगारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, काँग्रेस शहर कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 08, 2025 10:46:20
Beed, Maharashtra:बीड : मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दाखवला पत्रकार परिषदेत थेट मतदान करतानाचा व्हिडिओ काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता गंगाधर काळकुटे माझे चांगले मित्र आहेत.. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. ओबीसी मेळाव्यात मला गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता असा आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून केला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांचे खांदे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना चांगलंच उत्तर दिलं या त्यांनी चक्क लोकसभेला मी बजरंग सोनवणे यांना मतदान केलं मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फिरलो. लोकशाहीत मला देखील निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.. मी माझ्या समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही.. मी प्रामाणिक आहे असे म्हणत चक्क लोकसभेला मतदान केल्याचा व्हिडिओस त्यांनी माध्यमांना दाखवला. त्यामुळे गंगाधर काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता निवडणूक आयोग गंगाधर काळकुटेनी दाखवलेल्या व्हिडिओद्वारे त्यांच्यावर काय भूमिका घेऊन काय कारवाई करत ते पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे....
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 10:30:47
Washim, Maharashtra:नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतराणार असल्याची घोषणा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी केली आहे.वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात आज वाशिम येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली.खासदार देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना (उबाठा) ज्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची क्षमता अधिक आहे, त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.जनतेचे प्रश्न सोडविण्यास सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख व्यक्तीलाच आम्ही उमेदवारी देणार आहोत.महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.सर्व सेक्युलर आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपाला पराभूत करण्याचा आमचा निर्धार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 08, 2025 10:06:17
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात ठाकरे सेनेला गळती थांबण्याचं नाव न्हय. श्रीवर्धन मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय. श्रीवर्धन मधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसेच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सर्वजण शिवसेनेत दाखल झाले. यामुळे आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांच्या मतदार संघात मंत्री भरत गोगावले यांच्या फेऱ्या वाढल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top