Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

चंद्रशेखर बावनकुळे के बयान से कांग्रेस में नया घमासान, तीन नेताओं पर सवाल

ADANIRUDHA DAWALE
Nov 08, 2025 10:47:12
Amravati, Maharashtra
वडेट्टीवार पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले वडेट्टीवार हर्षवधन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहून गांधी यांचं तोंड पाहत नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे – चंद्रशेखर बावनकुळे यावेळी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करतांना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक लोक आमच्या पक्षात येत आहे काँग्रेसची हालत खराब आहे त्यामुळे नागपुरात वडेट्टीवार हे पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले हे वडेट्टीवार यांचं तोंड पाहत नाही आणि हे दोघेही हर्षवर्धन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहुल गांधी यांचे तोंड पाहत नाही असे बावनकुळे असे बावनकुळे म्हणाले आहे त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे म्हणून वडेट्टीवार पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साऊंड बाईट :- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 12:36:50
Akola, Maharashtra:शरद पवार और प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे नेते परस्परविरोधी भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र, अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगू लागली आहे. हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी, या दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबत कयास बांधले जात आहेत. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फूट उंच पुतळा, तसेच 24 तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकत्र मंचावर दिसले, आणि त्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. मात्र, माध्यमांशी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपाचा होता. यात कोणतेही राजकीय समीकरण किंवा राजकीय संदेश शोधण्याचे काही कारण नाही.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 08, 2025 12:35:38
Baramati, Maharashtra:इंदापूर पोलिसांची मोठी कामगिरी — दोन मोटरसायकल चोरटे अटकेत दोन चोरीच्या दुचाकींसह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक करत दोन चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. इंदापूर परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान बाबा चौक येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली. सलीम महबूब शेख आणि नितीन सखाराम हरिहर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 08, 2025 12:30:59
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 08, 2025 12:21:26
1
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 08, 2025 12:21:14
Kolhapur, Maharashtra:Kop TET Teacher Morcha Anc- शिक्षक म्हणून 25 ते 30 वर्ष ज्यांनी काम केलं आहे त्यांना परत टीईटी परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शिक्षकांवर अन्याय करण्यासारखा आहे. तसंच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय हा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार आहे. त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील तीसहून अधिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. सरसकट टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा या मागणीसाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी ही मागणी या मोर्चेदरम्यान करण्यात आली आहे. या मोर्चात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये शिक्षकांच्या हातातील फलक हे राज्य सरकारचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणारे होते
1
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 08, 2025 12:17:16
Baramati, Maharashtra:अमली पदार्थ गांजाची विक्री करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद.... इंदापूरच्या वालचंदनगर पोलिसांची कारवाई....29 लाख 98 हजार 500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत.... सहा जणांवर गुन्हा दाखल, चौघांना ठокल्या बेड्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीसांनी बीकेबियन रोडवर कळंब गावामध्ये गांजा तस्करी वरती मोठी कारवाई केली आहे.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या पोलीस पथकाने थेट कारवाई करत 100 किलो वजनाचा 24 लाख 98 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तब्बल सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. *वालचंदनगर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून दोघेजण फरार झालेत.फिरोज अजीज बागवान,मंगेश ज्ञानदेव राऊत,अश्रम अजित सय्यद आणि प्रदीप बाळासो गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे चौघेही बारामती तालुक्यातील आहेत.यामधून गांजा तस्करीच आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता वालचंदनगर पोलिसांनी वर्तविली आहे.
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 08, 2025 12:13:27
Baramati, Maharashtra:भिगवणमध्ये सावकारीचा फास... व्याजाची रक्कम भरूनही धमक्या... दोन आरोपीना अटक... पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी सावकारी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम लांडगे यांनी भिगवन पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपींकडून 85 हजार रुपये घेतले होते. मात्र, फिर्यादीने आतापर्यंत तब्बल 6 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात दिल्यानंतरही आरोपी रेश्मा रविंद्र जगताप आणि प्रेम बाळासाहेब जगताप हे अधिक व्याजाची मागणी करत धमक्या देत होते. याच्या तक्रारीनंतर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 08, 2025 12:10:24
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर - शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिराच आयोजन *दादा भुसे बाईट पॉईंट्स* - शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर - योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण, लाभ मिळवून देण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं - या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊ - शासन आपल्या दारीच्या माध्यमातून देखील याआधी तळागाळापर्यंत योजना पोहचवल्या आहेत *ऑन महायुती* - शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंचे आदेश, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं आहे - कुणाला कुठली जागा मिळेल, अजून निश्चित नाही मात्र शिवसेना पक्ष निवडणुकीची तयारी करतोय - येणाऱ्या काळात ज्या परिस्थिती निर्माण होईल, त्याप्रमाणे पुढे जाऊ - युती धरण्या सोडण्याचा विषय नाही, आपल्या जागा वाढल्या पाहिजे ही प्रत्येक पक्षाची इच्छा *ऑन पार्थ पवार प्रकरण* - या संदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समोर ठेवलीय - मुख्यमंत्री निर्णय घेतील *ऑन कोकण युती राणे इशारा* - मला या संदर्भातील माहिती नाही - स्थानिक पातळीवरील ज्या भूमिका होतील, त्या पद्धतीने आहे त्या परिस्थितीला सामोर जावं लागेल *ऑन कुंभ बैठक* - मंत्रालय पातळीवरील बैठकांना नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून त्या बैठकांना उपस्थित होतो *ऑन उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा* - उद्धव ठाकरेंनी उशीर केला, ज्या काळात अतिवृष्टीने शेतकरी बांधवांच नुकसान झाल - तेव्हा आम्ही सगळे बांधावर जाऊन पाहणी केली - त्याचा अहवाल तयार करणं, निधी जिल्ह्याला वर्ग करणं - लवकरात लवकर निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याचं सरकारचा प्रयत्न - नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक संकटात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्याची अपेक्षा - सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा *ऑन विखे पाटील* - प्रत्येकाने जबाबदारीने बोलल पाहिजे *ऑन वंदे मातरम्/ मालेगावात उर्दू शाळा बंद* - वंदे मातरम् राष्ट्रगीत, भारताच्या स्वातंत्र्यात या गीताची मोलाची भूमिका - प्रत्येक भारतीयाने ते गायला पाहिजे - जाणीवपूर्वक कुणी याला वेगळं वळण देत असेल तर योग्य नाही - अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते - कोणत्या उर्दू शाळा बंद होत्या, त्याची मी तत्काळ माहिती घेतो *ऑन बोगस शिक्षक भरती* - या संदर्भात गुन्हे दाखल झालेत, खोलवर चौकशी सुरू आहे - चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल - ज्यांचा ज्यांचा दोष असेल त्या सर्वांवर कारवाई *ऑन बी. डी. भालेकर शाळा* - बी डी भालेकर शाळे संदर्भात पदाधिकारी, स्थानिक नागरिकांकडून सूचना आल्या होत्या - पालिका आयुक्तांनी माहिती दिलीय की ४ वर्षांपासून शाळा बंद होती, शाळेची इमारत जीर्ण झालीय - अशी वस्तुस्थिती असेल तर नाशिककरांची भावना लक्षात इमारत पाडून नवीन शाळा बांधूया, असा प्रयत्न करू - नाशिककरांची भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू
4
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 08, 2025 11:52:51
2
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 08, 2025 11:50:23
Nanded, Maharashtra:एका सहा वर्षीय मुलीवर युवकाने आत्याचार केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्हयातील मुखेडमध्ये घडली. या मुलीवर 20 वर्षीय युवकाने अत्याचार केले. आरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केली. पीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून बांधकाम सूरू असलेल्या घरी नेले. तिथे या चिमुकलीवर अत्याचार केले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. आमदार तुषार राठोड हे सुद्धा मोर्चात सामील झाले होते. यावेळी ठाण्यात नागरिकानी ठिय्या केला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकानी केली. दरम्यान तीन दिवसात प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार असल्याचे पोलीस अधिकऱ्याने सांगितले.
2
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 08, 2025 11:28:41
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 08, 2025 11:21:22
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिका बाबत मनोमिलन होणार का विचारले असता त्यांनी मनोमिलन होणार असल्याचं यावेळी सांगितलं. यादरम्यान त्यांनी मला नगराध्यक्ष व्हायचंय असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली बाईट- खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र सातारा नगरपालिकाेच्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया देत भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन मनोमिलनाबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला पाहायला मिळत आहे. बाईट: मंत्री शिवेंद्रराजे भोसले
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 08, 2025 11:11:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आला असून कोट्यावधींची बक्षीस या बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आली आहेत. 400 ते 500 एकर क्षेत्रावर बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आलं असून अडीच हजार बैलगाडी आणि पाच हजार बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत, त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत या बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार असून या शर्यतीच्या ठिकाणांचा आढावा घेत, चंद्रहार पाटलांशी संवाद साधलाय, आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
4
comment0
Report
Advertisement
Back to top