Back
जेजुरी खंडेराय मंदिर परिसरातील भंडाऱ्यात भेसळ, 16 जखमी
JMJAVED MULANI
Dec 22, 2025 11:55:27
Baramati, Maharashtra
जेजुरीत भंडाऱ्यामुळे उडाला भडका.. जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर....भंडाऱ्यातील भेसळ दूर करण्याचे होतेय मागणी. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत काल रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला भंडाऱ्याचा भडका उडाला. या घटनेत तब्बल नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह 16 जण भाजले आहेत. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरी मध्ये ऐरणीवर आलाय. जेजुरी नगर परिषदेची मतमोजणी पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जेजुरी परिषदेवरून निर्विवाद सत्ता मिळवली. यानंतर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना अचानक आगीचा भला मोठा भडका उडाला. यात एक-दोन नव्हे तर तब्बल 16 जण भाजले गेले. या आधीच नेमकं कारण हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या आठ महिन्या खाली मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी यासंदर्भातील आवाज उठवला होता. जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करीत या भेसळ रोखावी अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिल होत. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जेजुरीचा खंडेराया अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी तेच असतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या ठिकाणी भंडार खोबऱ्याची उधळण केली जाते. जेजुरीत येणाऱ्या भंडाऱ्यात भंडारा निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून भेसळ केली जात असावी अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावरी बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर अन्न व औषध प्रशासन विभागाने याची तपासणी करावी शासन या भेसळयुक्त भंडाऱ्यावर जी कारवाई करेल त्याला श्री मार्तंड देवस्थान पाठबळ देईल असेही मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी म्हटल आहे. याच घटनेवरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स हँडल वरती पोस्ट करत म्हटलं आहे की जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजलेाची घटना घडली. यात विजयी उमेदवारांचाही समावेश आहे. घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. दरम्यान,जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापुर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. परंतु दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे. शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करुन या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 13:39:450
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 22, 2025 13:24:310
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:24:050
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 13:16:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:08:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 12:53:040
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 12:36:170
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 12:15:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 22, 2025 12:03:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 11:45:420
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:44:100
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 22, 2025 11:43:190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 22, 2025 11:37:43Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली के भाळवणी में फटाके कारखाने में भीषण विस्फोट हुआ. विस्फोट की झटके पाँच किलोमीटर तक महसूस किए गए. आसपास के वाहन और घरों की शीशे टूट गए. इस हादसे में अफताब मंसूर मुल्ला और अमीन मुल्ला गंभीर रूप से घायल हो गए और अस्पताल में भर्ती कराए गए. दो दमकल टीमों के सहयोग से आग पर नियंत्रण पाया गया.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 11:25:020
Report