Back
खंडवा के कांग्रेस नेता के बेटे की गिरफ्तारी: महाराष्ट्र पुलिस ने बड़ी कार्रवाई
PPPRASHANT PARDESHI
Dec 22, 2025 13:24:05
Dhule, Maharashtra
मध्यप्रदेशच्या खंडवा येथील कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्रीच्या मुलाला महाराष्ट्र पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खंडवा येथून ताब्यात घेतले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीतील जंगलात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दीड लाख दिल्यानंतर पाऊस न पडल्याने वाद झाल्यामुळे गोळीबाराची घटना घडली होती. त्या प्रकरणात माजी मंत्री स्वर्गीय हिरालाल सिलावट यांचा मुलगा कॉंग्रेस पक्षाचे माजी युथ काँग्रेस प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला अटक करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा दुर्गम भागात मांत्रिक पैशाचा पाऊस पाडतो, असे कर्णोपकर्णी ऐकून गणेश रामदास चौरे (वय ३० रा. बऱ्हाणपूर) व त्याच्या सहकाऱ्यांनी कथित मांत्रिक गुलजारसिंग पारसिंग पावरा (वय ५७) याच्याशी संपर्क साधला होता. शिवाय पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार विधी करून घेणारा गणेश चौरे व सोबत इतरांनी गुलाजारसिंग याला पैसे दिले. ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री जंगलात विधी करण्याचे ठरले. त्यासाठी गुलजारसिंग व त्याचा सहकारी शिवा सीताराम पावरा (वय ३०) हे पळासनेर येथील सातपुडा पर्वत रांगेतील जंगलात आले. त्यांच्यासोबत गणेश चौरे व इतर काही जण होते. विधी पूर्ण झाल्यावर पैशांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे वाद. शिवाय विधीसाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. या वेळी गुलाजरसिंगने केवळ ५० हजार रुपये परत करण्याचे सांगितले. त्यातून वाद विकोपाला गेला. गुलजारसिंग व इतरांना मारहाण करत गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर जंगलात पसार झाले. गुलजारसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गोळीबारात गुलजारसिंग पावरा व शिवा पावरा हे जखमी झाले. खासगी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल केले. संशयितांच्या शोधासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या पथकाने ब्रहाणपूर व खंडवा येथून गणेश चौरे, रतीलाल गणपत तायडे (वय ५०), अंकित अनिल तिवारी (वय २५), विशाल करणसिंग कश्यप (वय ३९) यांना अटक केली होती तर गुलजारसिंग व त्याला मदत करणारा शिवा पावरा यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्याबद्दल दोघांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखलण्यात आला होता.
खंडवा येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेश येथील खंडवा येथे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात यशवंत सिलावट सहभागी झाले होते. सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानच कोतवाली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे काही काळ चौकशी केल्यानंतर महाराष्ट्राती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) या गंभीर गुन्ह्यात केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 15:02:470
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:50:340
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 14:09:500
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:08:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:04:050
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 13:39:450
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 22, 2025 13:24:310
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 13:16:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:08:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 12:53:040
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 12:36:170
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 12:15:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 22, 2025 12:03:390
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:55:270
Report