Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

बारामती में 21 वर्षीय नगरसेविका की ऐतिहासिक जीत

JMJAVED MULANI
Dec 22, 2025 11:44:10
Baramati, Maharashtra
बारामती में बहुजन समाज पार्टीच्या वतीने 21 वर्षाच्या मुलीने घवघवीत यश प्राप्त केले आहे... हे यश संघर्षातून प्राप्त झाले आहे. हा विजय संघर्षाचा आहे असं वक्तव्य ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बारामती मध्ये बहुजन समाज पार्टीची नगरसेविका कु. संघमित्रा काळुराम चौधरी या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Dec 22, 2025 13:08:28
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचणी सुरू केलीली आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया खुद्द खासदार डॉक्टर शोभा बच्छाव घेत आहेत. निवडणूक प्रभारी म्हणून डॉक्टर दीपक बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या मुलाखतींसाठी पहिल्याच दिवशी 40 पेक्षा अधिक उमेदवारांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने शहरात नवीन जोडलेला ग्रामीण भाग, अल्पसंख्यांक समाज आणि जुने धुळे परिसरातील इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. विकासाच्या अजेंडा वर आपण ही निवडणूक लढणार असून, भाजपाच्या भ्रष्ट शासनाला जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे विजय निश्चितच महाविकास आघाडीचा होईल असा विश्वास डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलेला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 12:15:26
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 22, 2025 12:03:39
Pune, Maharashtra:नगरपरिषद निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरल्या, त्यातच अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडे या नगराध्यक्ष झाल्यात...विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरूण मुंडे यांच्या त्या पत्नी आहेत...भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी करत विजय मिळवला.. नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचे पहिलं काम करणार असल्याचं माया मुंडे यांनी म्हटलं आहे तर आपण पक्षश्रेष्ठीवर नाराज नसून स्थानिक लोकप्रतिनिधीने आपल्याला उमेदवारी मिळू दिली नाही असं अरुण मुंडे यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी 121- माया मुंडे, अरूण मुंडे
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 22, 2025 11:55:27
Baramati, Maharashtra:जेजुरीत भंडाऱ्यामुळे उडाला भडका.. जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर....भंडाऱ्यातील भेसळ दूर करण्याचे होतेय मागणी. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत काल रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला भंडाऱ्याचा भडका उडाला. या घटनेत तब्बल नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह 16 जण भाजले आहेत. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरी मध्ये ऐरणीवर आलाय. जेजुरी नगर परिषदेची मतमोजणी पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जेजुरी परिषदेवरून निर्विवाद सत्ता मिळवली. यानंतर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना अचानक आगीचा भला मोठा भडका उडाला. यात एक-दोन नव्हे तर तब्बल 16 जण भाजले गेले. या आधीच नेमकं कारण हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या आठ महिन्या खाली मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी यासंदर्भातील आवाज उठवला होता. जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करीत या भेसळ रोखावी अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिल होत. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जेजुरीचा खंडेराया अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी तेच असतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या ठिकाणी भंडार खोबऱ्याची उधळण केली जाते. जेजुरीत येणाऱ्या भंडाऱ्यात भंडारा निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून भेसळ केली जात असावी अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावरी बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर अन्न व औषध प्रशासन विभागाने याची तपासणी करावी शासन या भेसळयुक्त भंडाऱ्यावर जी कारवाई करेल त्याला श्री मार्तंड देवस्थान पाठबळ देईल असेही मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी म्हटल आहे. याच घटनेवरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स हँडल वरती पोस्ट करत म्हटलं आहे की जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजलेाची घटना घडली. यात विजयी उमेदवारांचाही समावेश आहे. घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. दरम्यान,जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापुर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. परंतु दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे. शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करुन या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 22, 2025 11:03:52
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 10:53:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नुकताच उद्धव ठाकरेच्या उपस्थितीत संभाजीनगरचे माजी महापौर राजी मोचुद्दीन राहि? यांची उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश झालाय, त्याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध दर्शवलाय. आज राजी मामू आणि चंद्रकांत खैरे यांची शिवसेना भवन जवळ सामोरे आले यावेळेस खैरे यांनी राजी मामुला माझा तुझ्या प्रवेशाला विरोध आहे असं सांगितलं. यावेळेस राजी मामू आणि खैरे मध्ये शाब्दिक भांडण सुद्धा झाले. माझा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला असल्यास राजी मामू यांनी सांगितलं. दरम्यान अंबादास दानवे यांनी राजी मामू यांच्या प्रवेशाचे जोरदार समर्थन केले. शिंदे सेनेत किती लोकांवर आरोप आहे, सत्तााऱ्यावर कुठं कुठले आरोप आहेत असा सवाल त्यांनी केला. सोबतच अजित पवार यांच्या सोबत असलेले मुंब्र्याचा मुल्ला नवाब मलिक यांचेही पाहावे असे दानवे म्हणाले.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 22, 2025 10:52:26
0
comment0
Report
Advertisement
Back to top