Back
पिंपरी-चिंचवड़ में शराबी कंटेनर चालक ने सात-आठ वाहनों को टक्कर मारी
KPKAILAS PURI
Feb 21, 2026 05:01:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी उशिरा रात्री मद्यधुंद कंटेनर चालकाने सात ते आठ वाहनांना उडवल्याची घटना घडलीय. या अपघातात चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री सुमारे साडेअकराच्या दरम्यान मोशी मधल्या बोऱ्हाडेवाडी, राजमाता जिजाऊ चौक, हॉटेल सिल्वर ब्लू परिसरात घडली. एक कंटेनर चाकण-हवे रोडवरून मोशी भाजी मंडई चौक मार्गे टाटा मोटर्सच्या दिशेने जात होता. संबंधित चालक मद्याच्या नशेत वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनर बोऱ्हाडेवाडी परिसरात पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर सुसाट वेगाने धावणाऱ्या कंटेनरने समोरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांना लागोपाठ धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांनाही कंटेनरची जोरदार धडक बसली. त्यामुळे अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत मदतकार्य सुरू केले. या अपघाताची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 06:48:290
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:30:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 06:19:040
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 21, 2026 06:15:380
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 06:15:210
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 06:02:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 21, 2026 05:50:000
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 05:48:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 05:47:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 05:46:340
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 21, 2026 05:45:160
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 21, 2026 05:32:090
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 05:31:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 21, 2026 05:20:490
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 05:20:180
Report