Back
परभणी सोसायटी के करोड़ों के फर्जी फसल कर्ज: किसानों के नाम पर उधारी खेल
GDGAJANAN DESHMUKH
Dec 11, 2025 10:04:27
Parbhani, Maharashtra
अँकर- कधी न कधी शेतकर्यांना कर्जमाफी मिळते म्हणून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे हे कर्ज उचलल्याचे शेतकऱ्यांना माहितीच पडू नये याची बँका सुद्धा खबरदारी घेतांना दिसून येत आहे, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पीक कर्ज कधीतरी कर्ज माफीत बसवून आपले उखळ पांढर करण्याचा प्रकार एका तरुणामुळे समोर आलाय. बघुयात हा खास रिपोर्ट.
व्हीओ- निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत कोलमडली असल्याने शासन कर्ते शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देतात,महायुती सरकारने सुद्धा कर्ज माफी देण्याचं आश्वासन दिलं होतं, सोसायटीच्या संचालकांनी केलेल्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांना शासन पीक कर्ज वाटप करीत असते. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव विविध कार्यकारी सोसायटीने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 117 कर्जदारांच्या नावाने 1 कोटी 6 लाख 24 हजार 410 रुपयांचे पीककर्ज 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी वाटप केले असल्याचे गुंजेगाव सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आले. विशेष बाब म्हणजे या यादीत नाव असलेल्या अनेक शेतकर्यांना असे काही कर्ज आपण काढल्याचे त्यांना माहीतच नाही,कारण हे कर्ज ना शेतकऱ्यांच्या पासबुक मध्ये होत ना,सातबाऱ्यांवर,शिवाय राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक बीबीशन सुर्यवंशी मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना बँक स्टेटमेंट देत नाहीये, गावात लावलेल्या यादीत ज्ञानोबा पांडलवाड यांच्या केवळ 80 आर जमिनीवर 2 लाख 96 हजार 900 रुपयांचे तर त्यांचे बंधू विक्रम पांडलंवाड यांच्या नावे 1 लाख 27 हजार 980 रुपयांचे कर्ज त्यांच्या परस्पर उचलण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी,जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लेखी तक्रार करीत बँक व्यवस्थापन आणि सोसायटीच्या पदाधिकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
बाईट- ज्ञानोबा पांडलवाड- कर्जबाजारी शेतकरी
व्हीओ- काही महिन्यांपूर्वी गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती,ही निवडणूक लढविण्यासाठी गुंजेगाव येथील अमोल मोटे यांनी बँकेकडे नो ड्युज मागवले असता गावातील अनेकांच्या नावे नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आलं,13 पैकी 12 सोसायटी संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर नियमापेक्षा अधिक कर्ज दिसून आले, हेक्टरी 25 हजार रुपयांचे कर्ज वाटप करायचे असतांना काही शेतकऱ्यांना हेक्टरी लाखो रुपयांच्या खैरात वाटण्यात आली. सदर यादी गावात बोर्डवर लावल्यावर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलच नाही,अश्या ही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...
बाईट- अमोल मोटे- तक्रारदार तरुण
व्हीओ- गुंजेगाव सोसायटीच्या 13 पैकी 12 चेअरमनच्या 56 नातेवाईकांच्या नावे 77 लाख 17 हजार 416 रुपयांचे कर्ज काढले असून हे नियमबाह्य असल्याचा दावा केला जातोय,चेअरमेन तुकाराम इमडे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने चक्क 10 लाख 17 हजार 860 रुवयांचे कर्ज नियम डावलून दिले,संचालक अभय बालासाहेब कुंडगिर यांच्या जवळच्या 8 खात्यावर 24 लाख 60 हजार 560 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. आता या प्रकाराची चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक संदीप भालेराव यांनी दिले असून या चौकशीसाठी त्रि- सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
बाईट- संदीप भालेराव- जिल्हा उपनिबंधक, परभणी
व्हीओ-याबाबत झी 24 तासने राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक बीबीशन सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या गैरकरभारावर काहीही बोलण्यास नकार दिला. शेतकऱयांना दिलेले पीक कर्ज जर शेतकऱ्यांना कळू दिलं जात नसेल तर याप्रकरणात केवळ विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारीच नव्हे तर बँकेच्या अधिकाऱ्यांचे ही या घोटाळ्यात उखळ पांढरे झालेच असलं पाहिजेत,ज्या तरूणांने गौर गरीब शेतकर्यांसमोर बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आणलाय, त्या तरुणाला धमकीवजा फोन येत आहेत,म्हटल्यावर हे प्रकरण पारदर्शीपणे हाताळले गेले तर यातून मोठा अपहार बाहेर येणार आहे,गुंजेगाव कार्यकारी सोसायटीचे हे केवळ एक उदाहरण असलं तरी जिल्ह्यात असलेल्या कार्यकारी सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल असल्याचा प्रकार नाकारता येत नाही,त्यामुळे कर्जमाफीपूर्वी बोगस कर्जदार शोधून काढण्याची आता गरज निर्माण झालीय....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 12:25:250
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 11, 2025 12:16:590
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:480
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 11, 2025 11:23:150
Report
KJKunal Jamdade
FollowDec 11, 2025 11:22:220
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 11, 2025 11:22:010
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 11, 2025 11:05:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 11, 2025 10:22:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 11, 2025 10:02:540
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:37:430
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:24:010
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 11, 2025 09:20:120
Report
PNPratap Naik1
FollowDec 11, 2025 09:18:460
Report