Back
हिंगोली नगर परिषद चुनाव: गुटखा-गुन्हेगारी के आरोपों के बीच सियासी जंग तेज
GDGAJANAN DESHMUKH
Nov 25, 2025 07:47:51
Parbhani, Maharashtra
हिंगोली नगर परिषद निवडणुकीत प्रचारात रंगत वाढली आहे. प्रचार आता वाढत्या गुन्हेगारीवर होऊ लागला आहे. विरोधातील शिवसेना असो की मग सत्ताधारी भाजप मटका गुटखा आणि गुन्हेगारी विरोधात प्रचार करू लागले आहेत. मटका गुटक्याला लीड तर हिंगोलीच परळी बीड अस स्लोगन गाजू लागलंय. महायुतीतील तिन्ही पक्ष हिंगोली नगर पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीने मात्र शिवसेना युबीटीचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय. युबीटीचे संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी अर्चना भिसे याांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलय, तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार संतोष बांगर यांच्या भावजई रेखा बांगर यांना उमेदवारी देण्यात आलीय. शिवसेना वर्षेस शिवसेना अशी थेट लढत हिंगोलीत होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवितायेत. पण सर्वच पक्षानी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून हिंगोलीतील वाढती गुन्हेगारी, गुटखा मटक्यावरूनच जोरदार प्रचार रंगलाय. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार बेकायदेशिर कामे करीत असतात, त्यांच्या माणसांकडे वाळू अवैध रितीने उत्खनन करण्यासाठी 15 पंधरा टिप्पर आहेत, शिवाय मटक्याचे अड्डे ही त्यांचेच आहेत, निलेश घायवळ सारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार हिंगोलीत येऊन कुणाला भेटून गेला, कुठे राहिला याचा तपास सुरू असल्याच म्हणत आमदार मुटकुळे यांनी आमदार बांगर यांना टार्गेट केलं. बाईट- तानाजी मुटकुळे- आमदार भाजपा, हिंगोली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगर परिषद जिंकण्यासाठी रात्रणदिवस एक केला असून जमेल त्याला पक्ष प्रवेश दिला आहे, भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला एक अधिकृत उमेदवार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. आमदार बांगर यांनी ही भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आपल्याकडे सगळेच अवैध आहेत, अशा कबुली देत आपण कधी कुठल्या अड्यावर तर सापडलो नाही म्हणत, आमदार मुटकुळे आणि त्यांच्या मुलावर टीका केली. बाईट- संतोष बांगर- आमदार,शिंदे गट,कळमनुरी. व्हीओ- उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आमदार मुडकुळे यांनी आमच्या लोकांना अमिश देऊन फोडल्याचा आमदार बांगर यांच्यावर आरोप केलाय, तर महाविकास आघाडीने गुटखा मटक्याला जर द्याल लीड तर हिंगोलीचं होईल परळी बीड म्हणत आमदार बांगर यांच्या विरोधात प्रचाराची मोहीम उघडलीय, जेव्हा नेत्याने खोके घेऊन 40 आमदार फोडलेत तसाच यांचा चेला आता उमेदवार फोडत असल्याचा घणाघात शिवसेना युबीटीचे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांनी आमदार बांगर यांच्यावर केलाय. व्हीओ- हिंगोली नगर पालिका निवडणुकीच्या निमित्तान विकासाचे मुद्दे कोसो दूर राहीले असून मटका गुटखा, अवैध व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारीच्या विरोधात प्रचार तापू लागलाय खरा, पण मतदारराजा नेमका कोणाच्या झोळीत मतरुपी दान टाकतो, त्यावरच हिंगोली नगर पालिकेचे भवितव्य ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowNov 25, 2025 09:36:030
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 09:35:370
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:3066
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:15160
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:06154
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:05:4682
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 08:05:23170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 25, 2025 07:49:36137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 25, 2025 07:46:40Chandrapur, Maharashtra:टायटल:-- सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू, चंद्रपूर -मूल महामार्गावर मामला लाकूड डेपो जवळची घटना, हिरव्यागार मुल महामार्गावर सतत अपघाताने वन्यजीवाना मोठा धोका\n\nआशीष अम्बाडे\nझी मीडिया\nचंद्रपूर
103
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 25, 2025 07:32:01195
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 07:30:37127
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 07:05:20164
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 25, 2025 06:49:42184
Report