Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

धनंजय मुंडे के बयान पर महायुति विरोध तेज, टाकळीमिया में पुतला जलाकर आक्रोश

KJKunal Jamdade
Nov 25, 2025 07:05:20
Shirdi, Maharashtra
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला धनंजय मुंडे यांचा निषेध... मुंडे यांच्या विधानानंतर महायुतीतील घटक पक्षाने केला निषेध.. शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या गावात आंदोलन.. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावात मुंडे यांची प्रतीकात्मक पुतळा जाळून केला निषेध... वाल्मीक कराड यांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध... भाजपासह मनसे व स्वाभिमानै शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचा मोरे यांचा दावा...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Nov 25, 2025 08:45:30
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: सावंतवाडी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाषण मुख्य मुद्दे: सवसंतवादी नगरपरिषद निवडणूक महत्वाची असून येथील मतदार ठरविणार की, मत कुठल्या पारड्यात टाकायचे! या सावंतवाडीत दोडामार्ग असेल किंवा अन्य भागातून जवळपास २ लाख लोक या शहरात येतात. याचा सर्व बोजा या शहरावर पडतो. श्रद्धाताई येथून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. येथील प्रत्येक महिलेला रोजगार संधी प्राप्त करून देणार असे श्रद्धाताई यांनी आश्वासन दिले आहे. काही लोकांना विसरण्याची सवय असते. आपल्यासाठी मागे कोणी काय केले, हे ते विसरतात. आपल्या पुढील पिढीचे भविष्य शाश्वत करायचे असल्यास भाजपच्या उमेदवाराला मतदान करा कमळ बटण दाबणे म्हणजे विकासाला मतदान होय. येथील सभांना मुख्यमंत्री येणार होते; पण पुरेसा वेळ नसल्याने शक्य झाले नाही. येथील चारही ठिकाणी भाजपला सत्ता द्या असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असून त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतील. येत्या २ तारखेला भाजपला मतदान करून सावंतवाडीच्या विकासाला साथ द्या ! केवळ आश्वासने न देता आम्ही शाश्वत विकास करणार २ तारखेला होणारे मतदान पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, खासदार नारायण राणे, नितेश राणे आणि श्रद्धाताई यांना करा!
52
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 25, 2025 08:45:15
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: सावंतवाडी भाजपा सभा: पालकमंत्री नितेश राणे भाषण मुख्य मुद्दे: आजचा ट्रेलर भारी आहे; मग ५ वर्षातील पिक्चर काय असेल! पुढे ५ वर्षात श्रद्धाताई काय काम करतील ते पहा! सावंतवाडीचा विकास करायचा असेल तर या पॅनलपेक्षा भारी कोणीही नाही. पुढील ५ वर्षे तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कोणाकडे शमता आहे, ते पाहणे महत्त्वाचे आहे. ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची आहे. सावंतवाडीत दर्जेदार शिक्षण संस्था उभी राहण्यासाठी या घराण्याने पहिले प्रयत्न केले. राजघराणे म्हणून आपण आपल्या जनतेसाठी काय करू शकतो, याचा विचार त्यावेळी राजघराण्याने केला. ज्या लोकांनी आपल्यासाठी केले, त्यांच्या पाठीशी म्हणून आम्ही उभे राहणार ! मात्र, येथील काहींच्या मनात ही भावना निर्माण झाली नाही? या घराण्याने आजवर सावंतवाडी शहराला भरपूर दिले. म्हणून त्यांना मतदान करणे योग्य राजघराणे संपले!, असा शब्द वापरतात. त्यावेळी हा शब्द वापरता? राजकारण ३ तारखेपर्यंत आहे. पण हे राजघराणे वर्षानुवर्षे राहील केवळ अपमान करण्यासाठी या निवडणूक लढवायच्या. मला वाटले केसरकर साहेब प्रथम राजघराण्याला पाठिंबा देतील. नेहमीच राजघराणे म्हणतात. मग आता काय झाले? केसरकर यांना श्रद्धाताई मुलीसारखे आहेत. मग केसरकर यांनी असे काय केले? केसरकर यांनी उमेदवार उभा केला तरी त्यांचा गुपचूप पाठिंबा श्रद्धाताईंना होय ये अंदर की बात है, दिपकभाई हमारे साथ है! ही निवडणूक राजकारण्यांची नाही, ती येथील नागरिकांची आहे. आता तुमचे कर्तव्य २ तारखेला, आता सातबारा, मोती तलाव विकणे नंतर बघू! २ तारखेला आशीर्वाद द्या आणि ३ तारखेला काम सुरू आज राज्यात आणि केंद्रात आम्ही आहोत. मुख्यमंत्री, चव्हाण साहेब, मी आहे! विशाल आहे! काल कणकवलीत उदय सामंत आले. काल ते म्हणाले की, आम्हाला निवडून द्या, आम्ही निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ! थेट या ना! डायरेक्ट पालकमंत्र्यांना मत टाका ना! सगळे तुम्ही निश्चिंत रहा! २ तारखेला आम्हाला संदेश द्या! कमळसमोर बटण दाबा! आम्ही तुमच्या सोबत आहोत. येथील उप रुग्णालयात चांगली आरोग्य सेवा देऊ! मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी प्रयत्न करणार जे आय लव सावंतवाडी बोलतात त्यांनी त्यांना सांगा की, सावंतवाडी राजघराण्याच्या बाबतीत आता बोलायचे नाही!
75
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 25, 2025 08:06:36
Kolhapur, Maharashtra:राज्यात नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल असं सर्वांनाच अपेक्षित होता. पण अनेक नगरपंचायतीमध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या पक्षांमध्येच थेट लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नगरपंचायतीमध्ये अशीच लढत पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी महायुती विरोधात महायुती यांच्यामध्ये प्रमुख लढत बहुतेक ठिकाणी महायुती मधील पक्षच एकमेकांच्या विरोधात. महायुती मधील घटक पक्षांमध्ये थेट लढत होत असल्याने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला फायदा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणून एकत्रित निवडणूक न लढवण्याचा निर्णय महायुतीच्याच पथ्यावर ?
167
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 25, 2025 08:05:46
Kolhapur, Maharashtra:राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे मुद्दे कोल्हापुरात 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुती कडून भाजप 4, जनसुराज्य 4, ताराराणी आघाडी 2, तर एक ठिकाणी भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवत आहे 13 पैकी 11 ठिकाणी हि निवडणूक लढवत आहोत नगरपालिका, नगरपंचायतच्या 263 पैकी 87 ठिकाणी भाजप, 41 ताराराणी, 42 जनसुराज्य, तर 12 ठिकाणी जनसंघर्ष आघाडी निवडणूक लढवत आहे *ऑन महायुती लढत* सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी माझा पाठपुरावा सुरु आहे बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत, जिथं आघाडी झाली तिथे आमचेच लोक कोल्हापुरात 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल महाविकास आघाडीचा प्रभाव कमी झालेला आहे *ऑन प्रभाग रचना* प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे, पक्षाची जबाबदारी म्हणून आम्ही देखील घेतली आहे *ऑन महायुती एकत्र* वरिष्ठच्या सूचनेनुसार आम्ही लढत आहोत, पण कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी नेत्यांना काही भूमिका घ्यावी लागते निवडणुकनंतर सर्वजण एकत्र्क फिरताना दिसतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील जे काही बोललेेत ते रास्त आहे अर्थमंत्री पवार असल्याने तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत, मुख्यमंत्री भाजपचे असल्याने दादा देखील बोलले असतील दोघेही त्यांच्याठिकाणी योग्य आहेत *ऑन कागल समरजित घाटगे* कागल चा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे भाजपचे एकही उमेदवार स्वतंत्र उभा राहता कामा नये याची खबरदारी घ्या अशा सूचना त्यांच्याकडून आल्या होत्या वरिष्ठांचा आदेश आम्हाला मानावा लागतो भविष्यातील काही गोष्टींचा विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा कदाचित समरजीत घाटगे हे भाजपमध्ये येणार असतील, यावेत यामुळे हा मोठा निर्णय घेतला असावा मात्र नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी देऊ *On सभा* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी चंदगड मध्ये सभा येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सभा घेणार आहेत मंत्री पंकजाताई मुंडे या देखील प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत
82
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 08:05:23
Solapur, Maharashtra:मोहोळ नगरपरिषदेच निवडणुकीचा प्रचार शिगेला, भाजपाचा डोअर टू डोअर प्रचारावर भर मोहोळ नगरपरिषद निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. आरोप-प्रत्यरोपमुळे मोहोळ नगरपरिषद निवडणूक गाजतेय. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलीय. भाजपने या ठिकाणी शीतल क्षीरसागर याना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केलीय. मोठ्या सभा आणि रॅलीपेक्षा भाजप या ठिकाणी डोअर टू डोअर प्रचारावर भर देतेय. प्रत्येक वाड्यावास्त्यावर जाऊन उमेदवार केंद्र-राज्य शासनाने केलेल्या कामबद्दल माहिती सांगतायत. मोहोळमध्ये भाजपचा प्रचार कसा सुरूय? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी...
129
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 25, 2025 07:49:36
Pune, Maharashtra:Headline -मावळमध्ये बिबट्यांचा वाढता वावर; शेतकरी भयभीत -साळुंब्रेतील शेतकऱ्याला समोरच दिसला बिबट्या Anchor: मावळ तालुक्यात बिबट्यांची हालचाल दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. साळुंब्रे गावातील दिलीप राक्षे यांच्या शेताच्या बांधावर दबा धरून बसलेला बिबट्या अचानक नजरेस पडला. मात्र चार चाकी वाहनात असल्याने त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले आणि अनर्थ टळला. पवन मावळ पट्ट्यात साळुंब्रे, दारूब्रे, सांगावडे, जांभे, नेरे आणि आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. त्यामुळे त्यांचा वावर वाढत आहे. शेतात पाणी सोडायला गेलो आणि बिबट्याने हल्ला केला, तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बिबट्यांचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे.
137
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 25, 2025 07:47:51
Parbhani, Maharashtra:हिंगोली नगर परिषद निवडणुकीत प्रचारात रंगत वाढली आहे. प्रचार आता वाढत्या गुन्हेगारीवर होऊ लागला आहे. विरोधातील शिवसेना असो की मग सत्ताधारी भाजप मटका गुटखा आणि गुन्हेगारी विरोधात प्रचार करू लागले आहेत. मटका गुटक्याला लीड तर हिंगोलीच परळी बीड अस स्लोगन गाजू लागलंय. महायुतीतील तिन्ही पक्ष हिंगोली नगर पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीने मात्र शिवसेना युबीटीचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय. युबीटीचे संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी अर्चना भिसे याांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलय, तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार संतोष बांगर यांच्या भावजई रेखा बांगर यांना उमेदवारी देण्यात आलीय. शिवसेना वर्षेस शिवसेना अशी थेट लढत हिंगोलीत होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवितायेत. पण सर्वच पक्षानी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून हिंगोलीतील वाढती गुन्हेगारी, गुटखा मटक्यावरूनच जोरदार प्रचार रंगलाय. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार बेकायदेशिर कामे करीत असतात, त्यांच्या माणसांकडे वाळू अवैध रितीने उत्खनन करण्यासाठी 15 पंधरा टिप्पर आहेत, शिवाय मटक्याचे अड्डे ही त्यांचेच आहेत, निलेश घायवळ सारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार हिंगोलीत येऊन कुणाला भेटून गेला, कुठे राहिला याचा तपास सुरू असल्याच म्हणत आमदार मुटकुळे यांनी आमदार बांगर यांना टार्गेट केलं. बाईट- तानाजी मुटकुळे- आमदार भाजपा, हिंगोली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगर परिषद जिंकण्यासाठी रात्रणदिवस एक केला असून जमेल त्याला पक्ष प्रवेश दिला आहे, भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला एक अधिकृत उमेदवार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. आमदार बांगर यांनी ही भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आपल्याकडे सगळेच अवैध आहेत, अशा कबुली देत आपण कधी कुठल्या अड्यावर तर सापडलो नाही म्हणत, आमदार मुटकुळे आणि त्यांच्या मुलावर टीका केली. बाईट- संतोष बांगर- आमदार,शिंदे गट,कळमनुरी. व्हीओ- उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आमदार मुडकुळे यांनी आमच्या लोकांना अमिश देऊन फोडल्याचा आमदार बांगर यांच्यावर आरोप केलाय, तर महाविकास आघाडीने गुटखा मटक्याला जर द्याल लीड तर हिंगोलीचं होईल परळी बीड म्हणत आमदार बांगर यांच्या विरोधात प्रचाराची मोहीम उघडलीय, जेव्हा नेत्याने खोके घेऊन 40 आमदार फोडलेत तसाच यांचा चेला आता उमेदवार फोडत असल्याचा घणाघात शिवसेना युबीटीचे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांनी आमदार बांगर यांच्यावर केलाय. व्हीओ- हिंगोली नगर पालिका निवडणुकीच्या निमित्तान विकासाचे मुद्दे कोसो दूर राहीले असून मटका गुटखा, अवैध व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारीच्या विरोधात प्रचार तापू लागलाय खरा, पण मतदारराजा नेमका कोणाच्या झोळीत मतरुपी दान टाकतो, त्यावरच हिंगोली नगर पालिकेचे भवितव्य ठरणार आहे.
126
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 25, 2025 07:32:01
195
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 25, 2025 07:30:37
127
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 25, 2025 06:49:42
Satara, Maharashtra:अँकर - उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरी चावी माझ्याकडे आहे असे सांगतात. तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे असे सांगत आहेत याबाबत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले हा निवडणूक आचारसंहिता भंग आहे. त्यामुळे याबाबत कायदेशीर सल्ला आजच घेणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असल्याचे सांगत मत दिले नाही तर निधी मिळणार नाही असे सांगतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका माझ्याकडे आहे असे सांगितले आहे, मी त्याचा मंत्री असून पैसे वाटपाचा अधिकार मला आहे. तिसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचा प्रमुख देवेंद्र फडणवीस हे आमच्याकडे आहेत असे सांगत आहेत. त्यामुळे संभ्रमात पडले आहेत कोणाला मत द्यायचे. मतदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार असून निवडणूक आयोग यावर गप्प बसतो हे संतापजनक आहे. निवडणूक आयोग ही बाहुले झालं आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे दुर्दैव आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्यावर खुलासा मागवणे आवश्यक होते. जे सुरू आहे ते सरळ सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच याबाबत एकविरांशी चर्चा करणार असून कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे
184
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 25, 2025 06:21:04
Ratnagiri, Maharashtra:राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कारण या ठिकाणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे या महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर महायुतीच्या श्रुती ताम्हणकर यांचं आव्हान आहे. ताम्हणकर या शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राजापूरमधील घराणेशाही आम्हाला मोडून काढायची आहे, एवढी वर्ष झाली राजापूरचा विकास काही झाला नाही, त्यामुळे राजापूरचा विकास हेच आमचं व्हिजन श्रुती ताम्हणकर यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असल्यामुळे आम्हाला इथे निधी चांगला मिळेल. त्यामुळे राजापूरचा विकास मी नक्की करेन.. प्रचारा दरम्यान आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना नवा चेहरा हवा आहे, त्यामुळे आपण नक्की जिंकू असा विश्वास श्रुती ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे.. दरम्यान आमदार किरण सामंत हे देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं ताम्हणकर यांनी यावेळी सांगितलं..
158
comment0
Report
Advertisement
Back to top