Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणी के कोक गाँव में दूषित पानी से गैस्ट्रोएंटेराइटिस, 139 नागरिक प्रभावित

GDGAJANAN DESHMUKH
Oct 16, 2025 14:32:28
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाणी पुरवठा झाल्याने गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असून नागरिकांना उलटी जुलाबचा त्रास होऊ लागलाय, या मध्ये दोघे जण गंभीर असून सहा जण रुगणालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत गावातील १३९ नागरिकांना ही लक्षणे आढळलीत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरलय. १४ ऑक्टोबरपासून गावातील नागरिकांना उलटी जुलाबचा त्रास सुरू झालाय, बोरी येथील ग्रामीण रुग्णांलयात अनेकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून दोघा जणांवर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील शाळेत तात्पुरता आरोग्य कॅम्प उभारून उपचार व तपासणीची सुविधा सुरू करण्यात आलीय.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 16, 2025 18:04:08
Thane, Maharashtra:ब्रेकिंग भिवंडी... रंगाचा बेरंग परतीच्या पावसाची धूमधडक्यात हजेरी... विजेच्या गडगडाटसह जोरदार पाऊस वारा... अंकर... उद्यावर येऊन ठेपलेला दिवाळी सण त्यात बाजारपेठा विविध रंगाच्या रांगोळी, तोरणे, कंदीलानी सजल्या. लोकांची खरेदीसाठी लगबग सुरू असतानाच अचानकपणे जोरदार विजेच्या कडकडाटसह पाऊसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. त्यामुळे रोडवर दिवाळीचे सामान घेऊन बसलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. खरेदीला आलेल्यां लोकांची ही धावपळ उडाली. दसरा सणा नंतर पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी वर्गाने भात कापून झोडपणी साठी शेतातच ठेवलाय आणि त्यात जोरात पाऊस पडल्याने शेतकरी भीचं चिंतेत पडलायं.
2
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 16, 2025 17:15:14
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरात 24 तासांत दोन हत्येच्या घटना घडल्यात. इमामवाडा व नवीन कामठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. पहिली घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नीलेश ऊर्फ बाळा किरण अंबाडारे असे मृतकाचे नाव आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्याचा दोन अल्पवयीन मुलांशी वाद सुरू होता. यावेळी संतापलेल्या मुलांनी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी व मृतकामध्ये परत वाद झाला. आरोपीनी नीलेशच्या पोट व शरीरावर आरोपींनी चाकूने वार केले. त्यानंतर त्यांनी त्याच्या तोंडावर दगडाने प्रहार केले व त्याची हत्या केली. दुसरी घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवेक तांडेकर असे मृतकाचे नाव आहे. तो रेतीचा व्यवसाय करायचा. नेरीतील उपसरपंच देविदास उर्फ देवा बारसुजी वंजारी याने विवेकच्या काका-काकूला शिवीगाळ केली होती व त्यामुळे देविदास-विवेकमध्ये वाद झाला होता. यासंदर्भात नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली होती. बुधवारी रात्री विवेक शेतातील विटभट्टीवर गेला होता. तेथे अज्ञात आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत डोक्यावर पाना-पेचकस व इतर हत्यारांनी वार करत हत्या केली. अभिषेक तांडेकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी केली असता वंजारीसोबतच कामठीतील नेरीमधील केशव सुखलाल गिरी आणि साहिल प्रमोद रातोडे यांचा हात असल्याची बाब समोर आली.
8
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 16, 2025 16:52:46
Jalna, Maharashtra:जालना महानगरपालिकेत ऐन दिवाळीत अँटी करप्शन विभागाने अँटोम बॉम्ब फोडला आहे. जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर याला 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे; मात्र ही लाच कोणत्या कामासाठी मागितली याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून देण्यात आलेली नाही. संतोष खांडेकर हा जालना महानगरपालिकेचा आयुक्त असून त्याने एका कॉन्ट्रॅक्टरकडे 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र या तक्रारदार ही रक्कम देण्यास तयार नसल्यानं त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून आयुक्त संतोष खांडेकर याला ताब्यात घेतलं तसेच त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेण्याच काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 16, 2025 16:52:27
Pune, Maharashtra:राष्ट्रवादी उद्या करणार काळी दिवाळी साजरी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे, मात्र सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केली ती देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही... सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने उद्या राज्यात काळी दिवाळी साजरे करणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे...आता तरी सरकारला जाग येईल यावी यासाठी उद्या सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात असल्याचे लंके यांनी म्हटल आहे. निलेश लंके ऑन मनपा प्रभाग रचना अहिल्यानगर मनपाची प्रभाग रचना जाहीर करण्याची मुदत संपली तरी प्रभाग रचना जाहीर न झाल्याने खा.निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली...मनपा आयुक्त हे एखादा पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात , त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अपेक्षा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी आमचे म्हणणे निवडणूक आयोगाकडे मांडणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हंटलंय. निलेश लंके ऑन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजीनामा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पदाचा राजीनामा दिला... याबाबत खा.निलेश लंके यांना विचारले असता फाळके हे शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी कौटुंबिक कारण सांगितले होते पण ते राजीनामा देतील असं वाटलं नव्हतं...मात्र आपल्या ऐवजी नवीन चेहऱ्याला संधी मिळाल्यास पक्षाला आणखी बळकटी मिळेल असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा असं निलेश लंके यांनी म्हंटलंय.
2
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 16, 2025 16:02:00
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 16, 2025 16:01:48
1
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 16, 2025 16:00:46
Kolhapur, Maharashtra:यंदाच्या ऊस हंगामात पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळायलाच हवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमधून करण्यात आली आहे . शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही मागणी केली आहे . जर साखर कारखानदारांनी 10 नोव्हेंबर पर्यंत ही मागणी मान्य केली नाही तर शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष अटळ आहे असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे . दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाने ओरडलं जातं की उसाचा हंगाम शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे लांबला जातो पण यावेळी 25 दिवस साखर कारखानदारांना वेळ देतोय त्यामुळे त्यांनी नंतर ओरड करू नये असं देखील शेट्टी म्हणालेत . यावेळी साखर कारखान्याच्या काटा मारी संदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली . काटामारी कशाप्रकारे केली जाते हे मी फडणवीस यांना सांगितले आहे, पण बहुतेक फडणवीस हे साखर कारखानदार यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत असतील अशी देखील टीका केलीय . एकीकडे साखर ऊस उत्पादन वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करा असं सांगत आहेत, पण त्यानी काटामारी रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा असं देखील ऊस परिषदेत सुचवले आहे .
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 16, 2025 14:17:07
Chandrapur, Maharashtra:नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन ऐक्या मधली सर्वात मोठी समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे. सोबतच आमच्या समाजात सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यावर कोपरखळी देखील मारली. रिपब्लिकन ऐक्यात नवीन गट-तट पडू नये हे पाहणं देखील जनतेची जबाबदारी असल्याचं म्हणत बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत रिपब्लिकन ऐक्यात येणार नाही तोपर्यंत लोकांना ऐक्य झालं असं वाटणार नाही, त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारावं अशी भूमिका ही रामदास आठवले यांनी मांडली. चंद्रपूर धम्मदीक्षा अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी रामदास आठवले आज चंद्रपुरात आले असता त्यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत आपली ही भूमिका स्पष्ट केली.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 16, 2025 13:57:36
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 13:56:42
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष गंभीर बनला असून बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षी चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून आक्रमक शेतकऱ्यांनी बेल्हे जेजुरी महामार्ग रोखून आंदोलन सुरू केलंय. गेली पाच तासांपासून हे आंदोलन सुरू असून भर पावसात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधी या आंदोलनाला उपस्थित आहेत. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून आमच्या हद्दीत बिबट्या नकोच वनविभागाने त्यांच्या फॉरेस्टच्या जागेत बिबट्याचा बंदोबस्त करावा यांसारख्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सुरू आहे.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 16, 2025 13:36:53
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये नागरिकांचे गर्दीच्या ठिकाणांहून तसेच घरातून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता, जो अकोला पोलिसांनी शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द केला आहे.पोलिसांनी विशेष मोहिम राबवून चोरीच्या मोबाईल फोनचा मागोवा घेतला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून संबंधित व्यक्तींना शोधण्यात आले आणि त्यांच्याकडून मोबाईल तसेच इतर वस्तू जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आल्या.या मोहिमेत काही दुचाकी आणि मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे.आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. दिवाळीपूर्वी आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांनीच आपली दिवाळी उजळवली असल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा अकोला पोलिसांचा जोर कायम असल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top