Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर में महिला दिवस पर गर्भवती की प्रसूति के लिए अस्पतालों में भीड़

HPHARSHAD PATIL
Mar 09, 2026 02:32:08
Palghar, Maharashtra
पालघर - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच एका गर्भवती महिलेची प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागली. पालघरच्या डहाणू येथील दर्शना माच्छी या महिलेची प्रसुतीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास धावपळ झाली . डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याच कारण देत गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयाने ऍडमिट करून घेण्यास नकार दिला. शिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये देखील डॉक्टर्स नसल्याने मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे गर्भवती महिले च्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. तर या घटनेची चौकशी करणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड यांनी सांगितल आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 08:31:20
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: पैठणच्या वाळवंटात भक्तीचा पूर; शांतीब्रह्माच्या दर्शनासाठी जनसागराचा महापूर दुमदुमला पंढरीचा राणा, पैठणी गूंजला विठ्ठल नामाचा गजर नाथचरणी वारकरी नतमस्तक; दक्षिण काशी दुमडुमली शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 'नाथ षष्ठी' उत्सवासाठी आज दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. भानुदास-एकनाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला असून, गोदावरीच्या पात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी पैठणमध्ये प्रवेश केला असून, ठिकठिकाणी हरिनामाचा गजर सुरू आहे. नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जायकवाडी धरणाच्या परिसरातही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 07:33:06
Jalna, Maharashtra:- ऑन कृषी वाहिनी योजना.... आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री स्वर कृषी वाहिनी योजना याच्या १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.यावर भाजपाने पुरावे मागितले.त्याचे पुरावे आज देत आहे.अगोदर ५ तक्रारीविषयी बोललो आता ६ तक्रारी आहे.निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. आश्चर्याची बाब विभागाने तक्रार दाखल करायला पाहिजे यात अर्थिक गुन्हे शाखेला तक्रार दाखल केली.तक्रारीत म्हणाले वारंवार सूचना देऊन तक्रारी दाखल केल्या नाही.सरकारला चुना लावण्याचं काम कंपन्यांनी केलं हे राजकीय नेते प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.यात राहुल पन्हाळे यच्यावर तक्रार आहे आहे.यासोबत अन्य लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. माझी मागणी आहे.या प्रकल्पाची चौकशी करा आणि कारवाई करा अशी मागणी आहे.यात ४ अधिकारी सस्पेंड झाले आहे. ऑन घोटाळा कसा.... बँक गॅरंटी बोगस आहे हे अधिकाऱ्यांना माहित आहे.जागा स्वतःच्या नावाने केली,फायनान्स उचलले आहे.यात फक्त राहुल पन्हाळे नावाच्या अधिकाऱ्यावरच तक्रार आहे. एखाद टेंडर घेतल्यावर इन्फस्ट्राचर सरकार उपलब्ध करून देते.परंतु हे सगळ होऊन तिथे काम सुरू केले नाही.जेव्हा सरकारला वाटलं तेव्हा बँक गॅरंटी तपासल्या तेव्हा बोगस असल्याचं आढळून आले.यामुळे सरकारची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे.नांदेडमध्ये तीन हजार एकर जमीन मेघा इंजिनियरिंग कंपनीला दिला आहे. कोणत्याही खात्यात काही झालं तर त्या खात्यात मंत्री प्रमुख असतो. माझ्या मुद्द्यांवर त्यांची खुलासा केला नाही.त्यांच्या नोटीसवर मी लागली खुलासा देणार आहे. - ऑन विमान अपघात.... पायलट कडून चूक का झाली यामुळे शंकेला वाव आहे.एखादा आत्मघातकी असतात.त्यामागे कोण असणार असताच ना हा बांगलादेशी..... हा विषय मोठा आहे.बांगलादेशी सीमा ओलांडून येतात म्हणजे सीमा सुरक्षित नाही का? सरकारच यात अपयश आहे. - ऑन अविनाश जाधव.... संजय शिरसाट यांच्या खात्यात अनियमितता आहे.यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या फाईल मंजूर करत नाही.हॉटेल,भिजणं व्यवस्था आर्थिक नियमितता होते.नोकरा भारती टेंडरमध्ये गैरव्यवहार झालं आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आहे. - ऑन अजित पवार नाव.... नावाला काही लोकांचा विरोध असू शकतो मात्र मृत्यूनंतर विरोध करू नये. - ऑन शिवसेना हातगाडी आंदोलन.... शिंदे गट सत्तात् असता जिल्ह्यात पालकमंत्री असताना हातगाडी विरोधात आंदोलन का करावे लागते? प्रशासन तुमचं ऐकत नाही का? त्यावर आंदोलन करणे ही दुटप्पी भूमिका आहे.पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन आयुक्तांना आदेश ददिला पाहिजे. - ऑन गॅस तुटवडा.... अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असताना आता पोलिस चुकीच्या कारवाया करत आहे.पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल मालक घरगुती गॅस वापरत आहे. - पेट्रोल..... या पध्दतीने अधिकाऱ्याने समाजात भीती निर्माण करू नये. - On कॉपी मुक्त अभियान.... कॉपी मुक्त अभियान चालवले मात्र मोठ्या प्रमाणात कॉपी चकली यात शिक्षा अधिक सहभागी होते त्यांच्यावर कारवाई व्हावी. - ऑन पत्राचाळ.... पत्रा चाळीचा मुख्य माणूस बाहेर छोट्या माणसाला आता टाकता
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 09, 2026 07:32:29
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण आल्याचे पहायला मिळत आहे. नवीन पनवेल सेक्टर 14 येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मध्ये पुनर्विकासाच्या विषयावर आयोजित सर्वसाधारण सभेत सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत आणि त्यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी बाहेरील मुले बोलावून रहिवाशांना मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. बैठकी दरम्यान पुनर्विकासाच्या अटी तसेच प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समितीमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या वादादरम्यान सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने काही बाहेरील तरुणांना सोसायटीत बोलावले आणि या टोळक्याने बैठकीत घुसून उपस्थित रहिवाशांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोसायटीतील दोन जण जखमी झाले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 09, 2026 07:19:41
Beed, Maharashtra:बीड : सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला न्यायालयीन कोठडी स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून केली होती अटक... तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आता कारागृहात रवानगी बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जनवरी रोजी आत्महत्या केली होती.. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले होते.. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनी प्रदीप फाटे याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती... त्याला बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.. त्या कोठडीची मुदत आज संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 09, 2026 07:07:00
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 09, 2026 07:06:28
Kalyan, Maharashtra:टिटवाळा जवळ रस्त्यावर उभी असलेल्या रक्ताने माखलेली कारचा रहस्य उलगडला. मैत्रिणीला भेटण्यासाठी निघाला आणि कारचा रहस्य समोर आला. ANC- कल्याण टिटवाळ्यात गोवेली रस्त्यालगत उबेर कार मध्ये रक्ताच्या दागाने माखलेली कार सापडली होती. मात्र गाडीत कोणी नव्हते टिटवाळा पोलिसांनी गाडी चालक चा शोध घेतला अखेर चालकाचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. या प्रकरणाच्या तपासात अतिशय धक्कादाय माहिती समोर आली आहे. एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने उबेर कार बुक केली. पुण्याला जात असताना गणेश खिंड परिसरात चालकाने अचानक गाडी थांबविली. चाकू दाखवित प्रवासी विद्यार्थ्याकडून पैसे मागितले. या वरुन दोघांचा वाद झाला. प्रतिकार करताना चाकू प्रवासी विद्यार्थीच्या हातून चालकाचा गळा चिरला गेला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी आदर्श भालेराव या इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्याला उबेर चालक नासीर अन्सारी याच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. चालकाची हत्या करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र नियतीने डाव आखला आणि एका चालक जीवानिशी गेला तर विद्यार्थ्याचे आयुष्य उद्धवस्त झाले. Vo..टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. टिटवाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. नक्की या गाडीचा चालक कुठे आहे. त्याच्यासोबत काय घडले आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला. पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने राेड म’प आणि शेवटचा प्रवासी कोण आहे. याचा शोध लावला. पोलिसांना माहिती मिळाली की, आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षला आहे तो त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. गाडी गणेश खिंडीजवळ आली असता नासीर याने गाडी थांबविली. नासीरला चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे पैसे बऱ्या बोलाने दे. यावेळी आदर्शने प्रतिकार केला. त्यांच्यात जोरदार झटापट झाली. या झटापटीत नाशीरच्या हातीतील चाकू आदर्शनच्या हाती आला. तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवळ्याला आणली. गाडी टिटवळा गोवेली रस्त्यावर टाकून पळून गेला. पोलिस तपास हे उघड झाले की, नासीरला पैशाची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. आदर्शचा हेतू नासीरची हत्या करण्याचा नव्हता. मात्र हा गुन्हा घडला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 07:05:47
Baramati, Maharashtra:बारामती पार्थ पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळाची पाहणी... दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेला सव्वा महिना उलटून गेला असतानाही त्यांच्या आठवणी बारामतीत अजूनही ताज्या आहेत. आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले पार्थ पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरात असलेल्या अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत पाहणी केली. या वेळी पार्थ पवार यांनी स्मृतीस्थळ परिसराची माहिती घेतली तसेच तेथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, या दृष्टीने स्मृतीस्थळ उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 09, 2026 06:47:21
Nagpur, Maharashtra:नागपूरत वळूने वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणानंतर आता महाल परिसरात मोकाट आणि आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले आहे... आज सकाळी महालातील टिळक पुतळा, शिवाजी चौक, दसरा रोड या भागात कुत्रा चावल्यानंतर आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले... सकाळच्या वेळेस रस्त्यांवर मोकाट सैरावैरा धावणाऱ्या या म्हशीमुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली... यावेळी स्थानिक नगरसेवक सचिन नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आक्रमक झालेल्या म्हशीला भट सभागृह पकडले... तोवर या म्हशीने किमान दहा जणांना जखमी केल्याची माहिती आहे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 06:36:04
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महापालिकेने हातगाड्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरणार, हातगाड्या ठरतायात रस्ते वाहतुकीत अडथळा ऋषी जैस्वाल यांचा महापालिका अधिकाऱ्यांना ईशारा अँकर : छत्रपती संभाजीनगरमध्ये हातगाड्या वाहतूक व्यवस्थेत अडथळे ठरतायत. उद्या संध्याकाळपर्यत महापालिकाेने हातगाड्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषी जैस्वाल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलाय. दरम्यान हातगाड्यांवर कारवाई न झाल्यास ऋषी जैस्वाल विरुद्ध महापालिका अधिकारी असा सामना होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 09, 2026 06:02:22
Nashik, Maharashtra:नाशिकमधल्या गंगापूर रोड परिसरात एका डॉक्टर विवाहित महिलेनं पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टर मनीषा निलेश जेजुरकर असे या मयत महिलचं नाव असून तिच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी नाशिक गंगापूर पोलीस ठाण्यात पती डॉक्टर निलेश जेजुरकर विरोधात तक्रार दाखल केली आहे. गंगापूर पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार आहेत. गंगापूर पोलीस व क्राइम ब्रांच तपास चालू आहेत. मनिषा यांच्या आत्महत्येनंतर मानसिक त्रासातून आणि घरातील पतीच्या छळणुकीतून आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचं म्हटलं जातं, पतीविरोधात इतर आत्महत्येच्या प्रकरणांवर देखील कारवाईची मागणी केली जाते आहे. बाईट: मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस ठाणे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 05:49:16
Baramati, Maharashtra:बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी च्या संशोधक मुलींनी पाण्यात उतरून माश्याच्या देशी प्रजाती वर माहिती संकलित केली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील उजनी जलाशयाच्या पाण्यात उतरून माश्याच्या देशी प्रजाती वर माहिती संकलित केली, कोळीस व कवडस या देशी जातींच्या माश्याचे ब्रँडिंग (प्रजनन) येत्या हंगामात करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या माश्याची परिस्थिती पाहण्यात आली. या माश्याना कोणती रोगराई झाली आहे का? ते सशक्त आहेत का? याची पाहणी करण्यात आली. या मुलींनी स्वतः पाण्यात उतरून वडाप जाळीच्या साहाय्याने संकलित केलेले मासे पकडून तपासणी केली. या शिकाऊ महिला संशोधकांना बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी चे वरिष्ठ Shास्त्रज्ञ डॉ. उम्नेš काटवटे यांनी मार्गदर्शन केले.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 05:47:06
Khed, Maharashtra:भिमाशंकर मंदिर बंदला आज दोन महिने पुर्ण मंदिराचे काम संथ गतीने मंदिर बंदच्या मुदतीला महिना शिल्लक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला विकासकामांमुळे तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मंदिर पुन्हा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक असतानाही अनेक कामे अद्याप अपूर्णच असल्याचे चित्र समोर येत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात विविध कामे सुरू असली तरी कामाची गती संथ असल्याने प्रशासनाने दिलेल्या मुदतीत मंदिर भाविकांसाठी खुले होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात देवस्थान, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे भाविकांचे आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top