Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव में गुंड Nilesh Ghayval के संबंध में नया मामला; ठेकेदार रमेश कोकाटे पर बनावट कागदपत्रों से ठेके लेने का आरोप

DPdnyaneshwar patange
Oct 16, 2025 05:46:56
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव गुंड निलेश घायवळच्या सहकार्यावर धाराशिव मध्ये गुन्हा दाखल . निलेश घायवळचं धाराशिव कनेक्शन पुन्हा उघड बनावट कागदपत्र प्रकरणी मित्र ठेकेदार रमेश कोकाटेवर गुन्हा दाखल! अँकर धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर निलेश घायवळसोबत फोटो व्हायरल झालेल्या ठेकेदारावर आता धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील निपाणी गावचा रहिवासी आणि माजी सरपंच ठेकेदार रमेश कोकाटे याने शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला असल्याचं उघड झालं आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कंत्राट मिळवण्यासाठी ही बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या प्रकरणी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेकराज यांच्या फिर्यादीवरून आनंद नगर पोलिस ठाण्यात ठेकेदार रमेश कोकाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रमेश कोकाटे हा निपाणीतील त्या कुस्ती स्पर्धेतील गोंधळाच्या प्रकरणातही आरोपी आहे, ज्यात निलेश घायवळसह अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. धाराशिवमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे निलेश घायवळचं धाराशिव कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं आहे.
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 16, 2025 11:51:49
Akola, Maharashtra:ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य समर्पित करणारे क्रांतीकारी ओबीसी योध्दा विजय बोचरे यांच्या आत्मबलिदानानंतर ओबीसी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हैदराबाद गॅजेट लावल्यामुळे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी सुरू झाल्याचा आरोप करत ओबीसी समाजाने शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यात आज विविध ओबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात विजय बोचरे यांच्या कुटुंबाला तातडीने सानुग्रह आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 16, 2025 11:49:41
Ambernath, Maharashtra:Anchor उल्हासनगर शहरात एका शिलाई कामगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीय, क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याचं पोलिस तपासात उघड झालंय, या प्रकारणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी मधू सिंग याला अटक केली आहे. या हल्ल्यात अनुप गौतम हा कारागीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सद्या कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, गोविंद साहू यांचं बर्तन गल्लीत रेडीमेड कपड्याचं कारखाना आहे, याठिकाणी आरोपी मधू सिंग आणि जखमी अनुप गौतम हे काम करतात, बुधावरी दुपारी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि ह्याच वादातून मधू सिंग याने धारधार हत्याराने गौतम याच्यावर वार केले, यात गौतम हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सुरवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर कळवा याठिकाणी हलविण्यात आलंय, आता या प्रकारणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी मधू सिंग ह्याला अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 16, 2025 11:20:02
Parbhani, Maharashtra:अँकर- ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे,पण तुम्ही ही ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे, हिंगोलीच्या कळमनुरी येथे ऑनलाइन शॉपिंग करणे एका तरुणाला चांगलेच महागात ओढलय,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी कोल्ड हॉट वाटर फील्डर मशीन ऍमेझॉनवरून ऑनलाईन पद्धतीने मागवली होती, याची घरी डिलिव्हरी झाली असता त्यांनी सदर बॉक्स फोडून पाहिला,तर या अपार्सलमध्ये लाकड आणि कचरा निघाल्याची धक्कादायक घटना संलर आलीय,यांचे व्हिडीओ राजू कांबळे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल करून लोकांना सावज होण्याचे आवाहन केले आहे...
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 11:19:39
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 11:07:41
Shirur, Maharashtra:- या लॉन्चमुळे महाराष्ट्रातील शाश्वत नवकल्पनामध्ये नेतृत्व पुढे येत आहे. - बॅटरी स्वैपिंग तंत्रज्ञानासह ब्लू एनर्जी मोटर्स चे मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक ट्रक आणि मुंबई-पुणे कॉरिडॉर भारताचा पहिला महामार्ग जो इलेक्ट्रिक झाला आहे, - हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी तसेच ग्रीन एनर्जी आणि भविष्यात स्वावलंबी होणार आहे - पर्यावरणीय शाश्वतता आणि औ‌द्योगिक विकास या दोन्ही क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक . - या ट्रकच्या लॉन्चमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला जाणार आहे. - पर्यावरणपूरक आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला चालना देणारा हा ट्रक उद्योग क्षेत्रात मोठा बदल घडवेल, - आजचा दिवस हा ब्ल्यू एनर्जी मोटर्स साठी मोठा असणार आहे - मेकिंग इंडिया 2024 मधील ऑटोमोबाईल मोबालीटी चा आम्हाला अभिमान आहे ही कंपनी महाराष्ट्रातील पुण्यात आहे - या कंपनी सोबत दहा हजार ट्रॅक चा सामंजस्य करार करण्यात आला आहे - बॅटरीचा किंमत कमी करण्याचे प्रयत्न आहे - त्याचसोबत त्याची लाईफ कशी वाढेल याकडे सुधा पाहिले जाणार आहे - भविष्यात एकदा ट्रक चार्जिंग केला तर तो 400 किलोमीटर पर्यंत चालणार आहे - यामुळे अपघात ची संख्या घटणार आहे अशी टेक्नॉलॉजी या वाहनात असणार आहे - अनेक वाहने ही ओव्हरलोड वाहतूक करत असतात कारण त्या ट्रकची डिझाइन तशी आहे - आता हा ट्रॅक सांगेल की ओव्हर लोड आहे का - पोलिसांना अशा वाहनावर कारवाई करणे सोपे जाईल - डिझेल ट्रॅक और इलेक्ट्रिक वाहने यांमध्ये फरक आहे - महाराष्ट्र सरकार हे इलेक्ट्रिक कंपन्यांना सहकार्य करत आहे - ग्रीन मोबिलिटी संकल्पना राज्यात आणायची आहे
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 10:47:39
Nashik, Maharashtra:नाशिक - रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष - आज उत्तर महाराष्ट्रात बैठकीसाठी आलो होतो - परंतु सांगायला आनंद होतोय - सामाजिक क्षेत्रात काम करणारे भरत कोकाटे यांची एक दोन वेळा भेट झाली - मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करावे असे त्यांना आमचे पदाधिकारी विनंती करत होते - विनंतीला मान दिला आणि भाजपात आज प्रवेश केला - ग्रामीण भागात प्रवेशामुळे त्या भागाला वेगळं बळ मिळेल - कोकाटे आणि सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो ऑन बैठक - पूर्वी देवेंद्रजिनी बैठक घेतली होती - जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने रचना करायची होती - फॉलोअप घेण्यासाठी बैठक घेतली - प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीला निवेदन केले - दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ऑन नारा - एक गोष्ट लक्षात घ्या - युतीबाबत निर्णय नेते घेतील - खाली असणारा कार्यकर्ता आहे - कार्यकर्त्यांनी निवडणूक त्यांनी लढली पाहिजे - दिवाळीनंतर आचारसंहिता घोषित होऊ शकते - कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर पार्टी जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल ऑन बोगस वोट - आपणही गेले अनेक वर्षे प्रत्येक पक्ष बोलतो - यादी चांगली असावी - नोंदणी आणि आक्षेप घेणे हा एक भाग आहे - आयोग कार्यक्रम देत असते - प्रक्रिया सुरू असतात - जाहिरपणे या गोष्टी होतात - उमेदवार 100 टक्के अभ्यास करतो - जे आक्षेप घेतो त्याचे ग्राह्य धरले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो - वस्तुस्थिती लक्षात घ्या - फेक नरेटिव्ह विरोधक तयार करत आहे - देवेंद्रजींनी सांगितले आहे - पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असतात
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 10:45:22
Nashik, Maharashtra:नाशिक @ भारत कोकाटे - राजकीय जीवनात काम करत असताना स्वतःला काय मिळेल यापेक्षा कार्यकर्त्याना काय देऊ शक्यतो हे महत्वाचे आहे - मी 4 वर्षांपासून त्यांना न्याय देऊ शकलो नाही - मोदी साहेब, फडणवीस साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल - छोट्या छोट्या समस्या असतात ते सोडवायच्या आहेत - रेशन कार्ड आणि इतर समस्या असतात - मी कुणावरही नाराज नाही - माझे बंधू यांच्याशी राजकीय मतभेद - कौटुंबिक कलह नाही - त्यांनी स्थान निर्माण केलं तसे मीही करेल - राजकारणात कोणीही इच्छू असू शकते - पक्षाचा आदेश मला मान्य असेल - उबाठात प्रवेश केला तेव्हा काम करता आला नाही - फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात तो आदर्श मी घेतला - त्यासाठी मी पक्षात प्रवेश केला
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 16, 2025 10:18:20
Bhandara, Maharashtra:स्कूल व्हॅन उलटली... 10 विद्यार्थी जखमी...सुरेवाडा येथील घटना.... रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात.... कारधा येथून मांडवी पर्यंत विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करणारी स्कूल व्हॅन उलटली 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.... कारधा येथील सावित्रीबाई फुले शाळेतून विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्यानंतर घरी सोडून देत असतांना भंडारा जिल्ह्याच्या सुरेवाडा येथे उलटली. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून कारधा ते करडी पर्यतचा रस्ताची अक्षरशः फुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निद्राअवस्थेत आहे. या मार्गावर दररोज अपघात होत आहेत....मारोती व्हॅन चालकाने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्न चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने सुरेवाडा येथील पुलावरून वाहन पुला खाली कोसळली यात जवळपास 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज हा अपघात झालं आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट बांधकाम विभाग पाहते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 16, 2025 10:14:30
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 16, 2025 09:58:32
Nanded, Maharashtra:यंदा अतिवृष्टीमुळे पीक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. दोन पैसे मिळतील ही अपेक्षा असताना अतिवृष्टीमुळे स्वप्नावर पाणी फेरल्यागेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न भेडसावत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील दुगाव येथील श्रद्धा भंडारे हिचीही अशीच कहाणी. श्रद्धा इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. गावात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने नायगाव मध्ये एका भाड्याच्या खोलीत राहून ती शिक्षण घेत आहे. तर श्रद्धाचा मोठा भाऊ साईप्रसाद बी टेक द्वितीय वर्षात शिकत आहे. पण त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा पेलावा असा प्रश्न वडिलांसमोर उभा ठाकलाय. वडील प्रल्हाद भंडारे यांना 2 एकर जमीन. यंदा त्यांनी आपल्या जमिनीवर सोयाबीन पेरले होते. पण अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक उध्वस्त झाले. पाण्यामुळे पूर्ण शेत खरडून गेले आहे. दोन पैसे मिळणे तर सोडाच उलट पेरणीसाठी उसनवारी घेतलेले पैसे कसे फेडावे असा प्रश्न प्रल्हाद भंडारे यांना पडलाय. शैक्षणिक साहित्य, ट्यूशन फीस इतर खर्च कसा करावा हा प्रश्न भेडसावतोय. तहसीलदार बनण्याच्या श्रद्धाच्या स्वप्नांना थोडे बळ देण्यासाठी आता तुमच्या मदतीची गरज आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 16, 2025 09:58:09
Amravati, Maharashtra:अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत 500 रुपयांच्या बनावटी नोटा; रहाटगाव मध्ये 26 हजार 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर नकली नोटा बाजारात आल्या असून नांदगाव पेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 26 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रहाटगाव मधून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची अंगझडती घेतल्यावर 500 रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे अमरावती शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात 500 रुपयाच्या नकली नोटा चलनात आहे का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
4
comment0
Report
Advertisement
Back to top