icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
441904
PTPRAVIN TANDEKAR16 Oct 2025, 10:18 am

भंडारा के सुरेवाडा में स्कूल वैन पलटी, 10 विद्यार्थी घायल; सड़क के गड्ढों के कारण हादसा

Bhandara, Maharashtra:स्कूल व्हॅन उलटली... 10 विद्यार्थी जखमी...सुरेवाडा येथील घटना.... रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात.... कारधा येथून मांडवी पर्यंत विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करणारी स्कूल व्हॅन उलटली 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.... कारधा येथील सावित्रीबाई फुले शाळेतून विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्यानंतर घरी सोडून देत असतांना भंडारा जिल्ह्याच्या सुरेवाडा येथे उलटली. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून कारधा ते करडी पर्यतचा रस्ताची अक्षरशः फुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निद्राअवस्थेत आहे. या मार्गावर दररोज अपघात होत आहेत....मारोती व्हॅन चालकाने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्न चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने सुरेवाडा येथील पुलावरून वाहन पुला खाली कोसळली यात जवळपास 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज हा अपघात झालं आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट बांधकाम विभाग पाहते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर गोकुळ दूध संघ चुनाव: अदृश्य शक्तियों के आरोप, मतदाता सूची से संस्थाएं हटाने पर विवाद

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. गोकुळच्या 25 जागांसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोकुळमधील सुमारे 1400 दूध संस्थांचा सत्यविजय मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या दूध संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्या संस्थांनी कथित अदृश्य शक्ती विरोधात एल्गार पुकारलाय. या शक्तीला निवडणुकीत थारा न देण्याचा निर्धारच या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यात गोकुळच्या मतदार यादीतून अनेक संस्था वगळण्याचा आरोप करारलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनी केला. तरीही न्यायालयीन लढा देत आम्ही पात्र ठरलो, त्यामुळे आता ज्यांनी संस्थांना अपात्र करण्याचा घाट घातला, त्या कथित अदृश्य शक्तीला निवडणुतीत धडा शिकवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यातून गोकुळच्या सत्ताधारी संचालकांना पाठिंबा दर्शवण्यात आला, पण एक राजकीय संदेशही देण्यात आला: अदृश्य शक्तीच्या बाजूने असल्यास आम्ही तुमच्या सोबत नाही म्हणण्याची भूमिका घेतली. 18 ऑक्टोबरला निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही गोकुळ निवडणुकीची तयारी प्रभावीपणे सुरू केलीय. शहरातील काही चौकात banners च्या माध्यमातून नेतृत्वाची बरोबरी लढण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात थेट टक्कर होण्याची शक्यता आहे. तथापि दुखावलेल्या संस्थांचा वजन कोणत्या गटाच्या प cupboard वर जाईल, हे गोकुळच्या सत्तेच गणित ठरवणार आहे.
0
0
Report

रत्नागिरी भाजपा जिल्हा बैठक सम्पन्न

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.. यावेळी प्रदेश महामंत्री, आमदार निरजन डावखरे, आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, सिंधू रत्न Yोजनेचे उपाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आदि व्यासपीठावर उपस्थित होते.. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये सेवाभावाची भावना रुजवणे आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.. दरम्यान कार्यकर्त्यांनी लोकसंग्रह वाढवावा, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ, पायात गती ठेवून काम करा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केलं..
0
0
Report

मानोरा में किसानों ने पोळा भरकर दुष्काळ राहत की मांग तेज की

Washim, Maharashtra:वाशीम: मानोरा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. मागील दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पावसाअभावी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीदयाह खरीपची पिकं करपली असताना शशना कडून दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मानोरा तहसील कार्यालयपरिसरात शेतकरी पोळा भरवत आंदोलन केलं. परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणीची दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आंदोलनात तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, कृषी पंपाचे भारनियमन तात्काळ बंद करावे आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने मंजूर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव पर डीजे रोक से नागपुर के किसान ने विषप्राशन करने का किया प्रयास

Nagpur, Maharashtra:नागपूर - डीजे व्यवसायाशी संबंधीत शेतकऱ्याचा विषप्राशन करण्याचा प्रयत्न... - गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजे व्यवसायावर निर्बंध आल्याने चिंतेची माहिती - जलालखेडा तालुक्यातील देवग्राम येथील सतीश नत्थुजी वानखेडे यांचा विषप्राशनाचा प्रयत्न - बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या sumaras बोपापूर शिवारातील शेतात जाऊन सतीश वानखेडे यांनी विषप्राशन केले. - विषप्राशन केल्यानंतर त्यांनी मित्राला फोन करून याबाबत माहिती दिली. - मित्रांनी तातडीने शेतात पोहोचून त्यांना जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. - मात्र विष मोठ्या प्रमाणात घेतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. - सतीश वानखेडे हे शेतीसोबत डीजेचा व्यवसाय करतात. गणेशोत्सवाच्या काळात डीजे व्यवसायातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची अपेक्षा असताना निर्बंधांमुळे ते चिंतेत असल्याच बोलला जात आहे.. - त्यातच यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीतील पिकांवरही संकट निर्माण झाले आहे. - शेतीवर मोठा खर्च करूनही पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याचे सांगण्यात येत आहे. - घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. - डीजेवरील निर्बंध आणि शेतीतील संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या व्यावसायिक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल का? उचलले, याचा पोलीस तपास करत आहेत.
0
0
Report

डिंभे-मानिकडोह डैम के निर्णय पर तात्कालिक स्थगन, किसानों के लिए पानी की बड़ी मांग

Manchar, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती: मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुकडी प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित मान्यतेच्या इतिवृत्ताला पुढील स्वतंत्र बैठक होईपर्यंत स्थगिती दिली आहे. स्थानिक शेतకऱ्यांसाठी पाण्याची मागणी: आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यातील ६५ बंधाऱ्यांसाठी पावसाळ्यानंतर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने २.५५ टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. आदिवासी व दुष्काळी भागाचा विचार: डिंभे धरणग्रस्त १७ गावांसाठी आणि लोणी-धामणी दुष्काळी पट्ट्यासाठी उपसा जलसिंचन योजनांना सुधारित मान्यतेत समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली आहे. धरणाच्या तळाशी बोगदा करण्यास तीव्र विरोध: डिंभे धरणाच्या तळापासून बोगदा काढल्यास दोन महिन्यांत १३ टीएमसी पाणी रिकामा होईल आणि पुणे जिल्ह्यातील तालुके कायमचे दुष्काळी होतील; त्यामुळे कुकडीचा डावा कालवा सक्षम करण्यावर भर द्यावा. पाण्यासाठी राजकीय संघर्ष नाही: हा पाण्याचा प्रश्न पक्ष, व्यक्ती किंवा पुणे विरुद्ध नगर असा नसून, स्थानिक शेतकऱ्यांना उध्वस्त करून नवीन प्रकल्प राबवण्याला आपला तीव्र विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका मंत्री वळसे पाटील यांनी मांडली आहे. प्रतिनिधी: हेमंत चापुडे
0
0
Report

सोलापुर में रमेश कदम के बयान पर रिपब्लिकन सेना ने किया आक्रामक प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक माजी आमदार रमेश कदम यानी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधात केली होती टीका अनुसूचित जाती आरक्षणामधील उपवर्गीकरणसंदर्भात बोलताना रमेश कदम यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर टीका केली होती त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा देखील प्रयत्न केला दरम्यान रमेश कदम यांनी तात्काळ आनंदराज आंबेडकर यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली
0
0
Report
Advertisement

किसानों की नाराज़गी के बीच विधानसभा बजट समिति का ग्रामीण दौरा, पोळा खर्च पर हंगामा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यावर शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा हा महत्त्वाचा सण असताना, त्यातच पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला असताना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली 27 आमदारांची विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात भेटी देऊन विविध विभागांचा बैठकांमधून आढावा घेणार आहे. गेल्या पाच वर्षातील विविध विभागांना प्राप्त निधी व प्रत्यक्ष खर्चाची माहिती ही समिती जाणून घेणार आहे. मात्र पोळा सणाच्या कालावधीत 27 आमदारांची समिती, दहा वरिष्ठ अधिकारी, आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर पाहुणचाराची उधळपट्टी कशासाठी, पोळा सणाला दौरा म्हणजे शेतकरी भावनांचा अवमान आहे असा आरोप सत्ताधारी भाजपाचे शेतकरी नेते देवानंद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव आदींनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम से किन्हीराजा सड़क के काम धीमे, नागरिकों ने गुणवत्ता की तत्काल जाँच की मांग

Washim, Maharashtra:वाशीम : अँकर:वाशिम ते किन्हीराजा रस्त्याचं सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कामाची तातडीने स्थळ पाहणी करून तांत्रिक आणि गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी काटा व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्याच्या कामाची किंमत,अंदाजपत्रक, लांबी-रुंदी आणि कामाचा कालावधी दर्शविणारा अधिकृत माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.याचं रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक कार्यालय,न्यायालय तसेच कॉलेज आहेत.त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक असताना काम संथगतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कामात मोठ्या प्रमाणात काळी माती वापरली जात असल्याने, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशी मागणी झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक आणि सुरक्षा याबद्दलचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.कामात अनियमितता किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
0
0
Report

मनसे ने कुर्ला एल.बी.एस. रोड स्पीड ब्रेकर से गणेश मूर्ति गिरने पर कार्रवाई की मांग

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या कुर्ला एल.बी.एस. रोड परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनावेळी घडलेल्या दुर्घटनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. एल. वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६६ मध्ये खराब आणि धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरमुळे गणेशमूर्ती खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कालिना विधानसभा यांच्या वतीने एल. वॉर्ड कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. यावेळी विभाग अध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर, उपविभाग अध्यक्ष भरत धाकतोडे, उपविभाग सचिव प्रकाश कर्वे, शाखा सचिव आदर्श जाधव आणि उपशाखा अध्यक्ष रितेश पोन्नल यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशभक्तांची श्रद्धा आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण के समर्थक Shirur में जोरदार प्रदर्शन, मार्ग जाम

Shirur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे मराठा समाज आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रमक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील دوन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी शिरूरमधील मराठा बांधव रस्त्यावर उतरले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

जल संकट से खेती पर मंडरा रहा खतरा; महाराष्ट्र में पानी वितरण के निर्देश

Shirdi, Maharashtra:जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर - ऑन दुष्काळ उपाययोजना - एल निनोचा परिणाम दिसून येतोय... महिनाभर पाऊस नसल्याचा मोठा परिणाम दिसतोय... खरीप पिक जवळ जवळ संपलीत... परिस्थिती गंभीर... परिस्थितीची माहिती मागवतोय... सर्व भागाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करू... ऑन पंचनामे आणि नुकसान भरपाई - ऑगस्ट 2027 पर्यंतचे पिण्याचे पाणी राखीव ठेवून, उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय केलाय... पिण्याच्या पाण्याला प्राधान्य... ज्या भागातील धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे शेतीला पाणी देण्याच्या सूचना दिल्यात... राज्यभरातून अहवाल आल्यानंतर पंचांम्यांबाबत मंत्रिमंडळात चर्चा होईल... ऑन एस इ बी सी आरक्षण - एस इ बी सी आरक्षणाचा मराठा मुलांना मोठा फायदा होतोय... कोणत्याही न्यायालयात स्थगिती मिळू नये, यासाठी आम्ही विशेष लक्ष घातले आहे... जरांगे मुंबई आंदोलन इशारा - आमचे सहकारी त्यात लक्ष घालताय... अंतिम अहवाल आल्यानंतर बघू ... मराठा नेते पक्षाचे, जरांगे आरोप - त्या वादात पडण्याचे कारण नाही... ज्या मागण्या समोर आल्या त्याची परिपूर्ती करण्याचं काम सरकार करतय... अनेक काही असेल तर आपण त्याचाही निश्चितपणे विचार करू... जरांगेंच्या प्रश्नांवर विखे पाटलांची सावध भूमिका... Byte - राधाकृष्ण विखे पाटील
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top