Back
तुळजापूर मंदिर में कवड्यांची माळ लाने की मांग; शिवाजी-तानाजी के इतिहास का सजीव प्रतीक
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 10:05:23
Dharashiv, Maharashtra
धाराशिव — छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड विजयानंतर तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अर्पण केलेली कवड्यांची पौराणिक माळ… आणि आई तुळजाभवानीने भवानी तलवार देताना दिल्याची लोकआख्यायिका! इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेली ही माळ आजही तानाजींच्या वंशजांकडे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता हीच माळ तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी आणावी, अशी मागणी जोर धरतेय. सिंहगडाच्या गडकोटावर तानाजींनी प्राण अर्पण केले… आणि त्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गळ्यातील कवड्यांची माळ तानाजींना अर्पण केली—अशी परंपरागत माहिती इतिहासात नोंदली आहे. तानाजींच्या वंशजांकडे ही माळ अजूनही जपली जात असल्याचे सांगितले जाते. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना हीच माळ दिल्याची लोकआख्यायिका… म्हणून या माळेला धार्मिक आणि ऐतिहासिक—दोन्ही प्रकारचा अफाट मान आहे. “ही माळ म्हणजे मराठा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. तुळजापूर मंदिरात काही दिवसासाठी का होईना—दर्शनासाठी आणावी. हजारो भाविकांना ही परंपरा प्रत्यक्ष पाहता येईल.” Byte सुनील नागने,मराठा क्रांती मोर्चा “कवड्यांची माळ ही केवळ दागिना नाही… ती शिवछत्रपती आणि तानाजींच्या नात्याचं प्रतिक आहे. तुळजाभवानी परंपरेशी जोडलेली असल्याने तिचं सांस्कृतिक मूल्य प्रचंड आहे. संवर्धनासह सार्वजनिक दर्शन ही योग्य दिशा ठरेल.” BYTE सतीश कदम इतिहास तज्ञ भाविक आणि मराठा संघटनांकडूनही ‘इतिहास लोकांसमोर आला पाहिजे’ अशी मागणी सुरू आहे. राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पुजाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक परंपरा आणि शिवकालीन वारसा— या सर्वांचा संगम असलेली कवड्यांची माळ आता तुळजापूर मंदिरात आणावी, ही मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे भक्त-इतिहासप्रेमींचं लक्ष लागलंय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:51:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 10:48:44104
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 10:33:4097
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:19:24147
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 10:08:1477
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 09:45:2351
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 09:37:0754
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 09:28:04189
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 09:27:1853
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 05, 2025 09:15:42148
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 08:32:54145
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 08:30:20153
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 05, 2025 07:53:41105
Report
UPUmesh Parab
FollowDec 05, 2025 07:17:43161
Report