Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

कलंब तालुक्‍के में हरभरा फसल में आग, दो एकड़ जलकर राख

DPdnyaneshwar patange
Mar 16, 2026 04:49:58
Dharashiv, Maharashtra
कळंब तालुक्यात हरभरा पिकाची गंज पेटवली; दोन एकरवरील पीक जळून खाक कळंब तालुक्यात हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे.या आगीत सुमारे दोन एकरवरील काढून ठेवलेले हरभरा पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या प्रकरणी शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 16, 2026 06:03:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज. आज ठरणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष... पूनम मुक्ता यांचे नाव चर्चेत... लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची निवड आज दुपारी होणार असून, ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी 'महायुती च्या पूनम मुक्ता यांचे नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा दुपारी दोनला होणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकांसाठी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेस सुरवात होईल. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बिनविरोधच होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 06:02:05
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 05:46:40
171
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 16, 2026 05:32:57
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक भोंगळ कारभार चव्हाट्यावर.. भायंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेला रात्री उंदाने हाताला कुरतडण्याचे काम केले आहे.. सुहासिनी माठेकर वय 89 वर्ष आहे.. त्यांना 12 मार्च ला रुग्णालयात भरती करून उपचार सुरू आहेत.. त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.. रुग्णालयाचा एव्हढा हलगर्जीपणा आहे की आयसीयू सारख्या विभागात सामान्य माणसांना प्रवेश नाही मात्र उदरांनी उच्छाद मांडला आहे.. सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक त्यांना बघायला गेलं असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला मात्र कर्त्यव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांनी त्यांनी रात्री बघितले नाही.. सकाळी घरचे लोक गेले तेंव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला
153
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:22:12
Beed, Maharashtra:बीड: केजजवळ ट्रॅव्हल्स पलटी होवून भडकली आग; २५ प्रवासी जखमी, प्रवाशांचे सर्वच साहित्य जळून खाक... सुदैवाने जीवितहानी नाही..! केज जिल्ह्यातील केज, मांजरसुंबा रोडवर सांगवी ते पिंपळगाव फाट्याजवळ पहाटे सुमारे 2.45 वाजता जळगावहून लातूरकडे जाणारी एसी ट्रावेल्स पलटी झाली. या अपघातात किमान २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर ट्रावेल्सला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, काही प्रवाशांनी चालक वेगात गाडी चालवत असल्याचा आरोप केला असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
87
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:05:56
129
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 05:03:55
Shirdi, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या परिणाम भारतात देखील दिसून येत आहेत.. घरगुती गॅस अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी व्यवसाय व उद्योगांसाठी लागणारा व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी समोर आलाय .. यावर पर्याय काढत काहींनी चुली देखील मांडल्यात.. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी उद्योग समूह व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एक अनोख संशोधन केले आहे.. व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या मदतीने केले आहे... कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांना सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅस उत्पादन देखील सुरू केले... आणि आता याच साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांनी संयुक्त विद्यमान व्यावसायिक गॅसला पर्याय काढत अनोख संशोधन केला आहे.. देशभरात इथेनॉल निर्मिती वाढली असून याच इथेनॉल वर आधारित एका स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून झालं आहे.. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅसच्या खर्चाच्या तुलनेत याचा खर्च परवडणारा आहे..
126
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 16, 2026 05:02:57
Buldhana, Maharashtra:बुलडाण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर.. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई.. कारवाईत 14 सिलेंडर जप्त .. तर फौजदारी करणार असल्याची तहसीलदार यांची माहिती .. यामध्ये ठिकठिकाणी छापे टाकले. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.. या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास ४० हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली.. यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले असून, अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता.. दरम्यान १४ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे .. तर काही हॉटेल मालकांनी कारवाईची कुणकुण लागताच सिलिंडर लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला.. अशा साठेबाजी करणाऱ्या सर्व दोषींवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
137
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 04:49:39
Washim, Maharashtra:कारंजा बाजार समिति में गहू बिक्री के लिए आज सुबह से shेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार-रविवारी बाजार समिती बंद होती तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची काढणी करून विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शेतकरी सकाळपासूनच क्रमांक लागण्याची प्रतीक्षा करत थांबले आहेत. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे हजारो क्विंटल गहू बाजार समितीत दाखल झाला असून खरेदी प्रक्रिया जलद करण्यासाठी मोजणी काटे वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
160
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:34:11
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ... १३ मेंढ्यांचा पाडला फडशा, तर कोंबड्यांच्या खुराड्यावरही केला हल्ला... घटना cctv कॅमेऱ्यात कैद.. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दसाने, विंचुरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्यरात्री बिबट्याने दसाने येथील एका शेडमध्ये घुसून तब्बल १३ मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात शेतकरी बापू सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे विंचुरे गावात या बिबट्याने शेतातील कोंबड्यांवर हल्ला केला असून सदर घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी विंचुरे येथील नागरिकांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे.
141
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 04:31:01
159
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 04:22:03
Shirdi, Maharashtra:मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे.. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केलंय.. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपूरे यांनी म्हटलंय.. दरम्यान बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशी इच्छा असून, आमच्यावर निवडणुका लादल्या तर आम्ही लढायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.. तर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचं अधोरेखित केले आहे.. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो.. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.. सुजय विखे, माजी खासदार भाजप माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
164
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:21:41
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) - नाशिकच्या मनमाड गुरुद्वाराने केली गॅस टंचाईवर मात... लंगरचा स्वयंपाकासाठी वापरतात वाफेची यंत्रणा... 8 ते दहा हजार भाविकांना दिला जातो अखंडित लंगर... Anc:- युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका जो देशभरातील देवस्थानाला बसला आहे.गॅस अभावी अन्नछत्र व महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्न सतावत आहे.मात्र नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर आधीच उपाय योजना करून ठेवली आहे.गुरुद्वारांमध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार होता.त्यासाठी लाकडे जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर या ठिकाणी पोळी, भाजी, दाल , भात असा लंगर तयार केला जातो.त्यामुळे गॅस टंचाई जरी असली तरी मनमाडच्या गुरुद्वारात दररोज 8 ते दहा हजार भाविकांना रोज अविरतपणे लंगर सेवा सुरू आहे. सुरजित सिंग, लंगर प्रमुख
156
comment0
Report
Advertisement
Back to top