Back
राहुरी सीट के लिए तनपुरे की पोटनिवडणूक चर्चाएं, फडणवीस की तारीफ से राजनीति गर्म
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 04:22:03
Shirdi, Maharashtra
मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे.. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केलंय.. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत..
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपूरे यांनी म्हटलंय..
दरम्यान बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशी इच्छा असून, आमच्यावर निवडणुका लादल्या तर आम्ही लढायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय..
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.. तर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचं अधोरेखित केले आहे.. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो.. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे..
सुजय विखे, माजी खासदार भाजप
माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 16, 2026 05:32:5793
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:22:1287
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:05:56129
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 05:03:55126
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 16, 2026 05:02:57137
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 05:02:24130
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:58116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:39160
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11141
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:01159
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:41156
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report