Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

बुलंदाणा में घरेलू गैस सिलिंडर का अवैध उपयोग: तहसीलदार ने छापेमारी, 14 सिलेंडर जब्त

MNMAYUR NIKAM
Mar 16, 2026 05:02:57
Buldhana, Maharashtra
बुलडाण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर.. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई.. कारवाईत 14 सिलेंडर जप्त .. तर फौजदारी करणार असल्याची तहसीलदार यांची माहिती .. यामध्ये ठिकठिकाणी छापे टाकले. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.. या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास ४० हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली.. यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले असून, अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता.. दरम्यान १४ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे .. तर काही हॉटेल मालकांनी कारवाईची कुणकुण लागताच सिलिंडर लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला.. अशा साठेबाजी करणाऱ्या सर्व दोषींवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 06:15:10
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 16, 2026 06:03:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज. आज ठरणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष... पूनम मुक्ता यांचे नाव चर्चेत... लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची निवड आज दुपारी होणार असून, ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी 'महायुती च्या पूनम मुक्ता यांचे नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा दुपारी दोनला होणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकांसाठी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेस सुरवात होईल. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बिनविरोधच होण्याची शक्यता आहे.
62
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 06:02:05
100
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 05:46:40
171
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 16, 2026 05:32:57
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक भोंगळ कारभार चव्हाट्यावर.. भायंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेला रात्री उंदाने हाताला कुरतडण्याचे काम केले आहे.. सुहासिनी माठेकर वय 89 वर्ष आहे.. त्यांना 12 मार्च ला रुग्णालयात भरती करून उपचार सुरू आहेत.. त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.. रुग्णालयाचा एव्हढा हलगर्जीपणा आहे की आयसीयू सारख्या विभागात सामान्य माणसांना प्रवेश नाही मात्र उदरांनी उच्छाद मांडला आहे.. सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक त्यांना बघायला गेलं असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला मात्र कर्त्यव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांनी त्यांनी रात्री बघितले नाही.. सकाळी घरचे लोक गेले तेंव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला
153
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:22:12
Beed, Maharashtra:बीड: केजजवळ ट्रॅव्हल्स पलटी होवून भडकली आग; २५ प्रवासी जखमी, प्रवाशांचे सर्वच साहित्य जळून खाक... सुदैवाने जीवितहानी नाही..! केज जिल्ह्यातील केज, मांजरसुंबा रोडवर सांगवी ते पिंपळगाव फाट्याजवळ पहाटे सुमारे 2.45 वाजता जळगावहून लातूरकडे जाणारी एसी ट्रावेल्स पलटी झाली. या अपघातात किमान २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर ट्रावेल्सला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, काही प्रवाशांनी चालक वेगात गाडी चालवत असल्याचा आरोप केला असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
87
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:05:56
129
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 05:03:55
Shirdi, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या परिणाम भारतात देखील दिसून येत आहेत.. घरगुती गॅस अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी व्यवसाय व उद्योगांसाठी लागणारा व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी समोर आलाय .. यावर पर्याय काढत काहींनी चुली देखील मांडल्यात.. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी उद्योग समूह व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एक अनोख संशोधन केले आहे.. व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या मदतीने केले आहे... कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांना सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅस उत्पादन देखील सुरू केले... आणि आता याच साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांनी संयुक्त विद्यमान व्यावसायिक गॅसला पर्याय काढत अनोख संशोधन केला आहे.. देशभरात इथेनॉल निर्मिती वाढली असून याच इथेनॉल वर आधारित एका स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून झालं आहे.. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅसच्या खर्चाच्या तुलनेत याचा खर्च परवडणारा आहे..
132
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 16, 2026 04:49:58
Dharashiv, Maharashtra:कळंब तालुक्यात हरभरा पिकाची गंज पेटवली; दोन एकरवरील पीक जळून खाक कळंब तालुक्यात हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे.या आगीत सुमारे दोन एकरवरील काढून ठेवलेले हरभरा पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या प्रकरणी शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
116
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 04:49:39
Washim, Maharashtra:कारंजा बाजार समिति में गहू बिक्री के लिए आज सुबह से shेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार-रविवारी बाजार समिती बंद होती तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची काढणी करून विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शेतकरी सकाळपासूनच क्रमांक लागण्याची प्रतीक्षा करत थांबले आहेत. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे हजारो क्विंटल गहू बाजार समितीत दाखल झाला असून खरेदी प्रक्रिया जलद करण्यासाठी मोजणी काटे वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
160
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:34:11
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ... १३ मेंढ्यांचा पाडला फडशा, तर कोंबड्यांच्या खुराड्यावरही केला हल्ला... घटना cctv कॅमेऱ्यात कैद.. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दसाने, विंचुरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्यरात्री बिबट्याने दसाने येथील एका शेडमध्ये घुसून तब्बल १३ मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात शेतकरी बापू सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे विंचुरे गावात या बिबट्याने शेतातील कोंबड्यांवर हल्ला केला असून सदर घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी विंचुरे येथील नागरिकांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे.
141
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 04:31:01
159
comment0
Report
Advertisement
Back to top