Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक में प्रेमी ने नंबर ब्लॉक करके युवती का अपहरण करने की कोशिश की

SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 11:37:59
Nashik, Maharashtra
*नंबर ब्लॉक केल्याचा राग; प्रियकराकडून युवतीवर मिरची पूड फेकत अपहरणाचा प्रयत्न!* *पालकांनी लग्नास नकार दिल्याने संताप; सातपूर पोलिसांकडून मुख्य संशयित अटकेत, तिघांचा शोध सुरू* अँकर नाशिकमधील कामगार नगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून प्रियकराने थेट अपहरणाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. युवतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकत तिला जबरदस्तिने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक करण्यात आली आहे. आनंद राजभर आणि संबंधित युवती यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, युवतीच्या पालकांनी लग्नास नकार दिल्यानंतर तिने संबंध तोडत त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.याचाच राग मनात धरून संशयिताने ‘माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ या विकृत मानसिकतेतून तीन मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. दुचाकी देत पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या sुमारास युवती कामगारनगर येथील किराणा दुकानात आली असता, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवले. तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला आणि अपहरणाचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शिवीगाळ करत पळ काढला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करत मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. बाईट - भाऊसाहेब दहिफळे -तपास अधिकारी मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, काही व्यक्तींमध्ये तीव्र मालकीभाव, नकार सहन न होणे आणि त्वरित अपेक्षा पूर्ण न झाल्यास आक्रमक वर्तन दिसून येते. Indian Psychiatric Society च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भावनिक परिपक्वतेचा अभाव आणि राग नियंत्रण न होणे यामुळे काही तरुण अतिशय टोकाची पावले उचलतात. तरुण पोरांमध्ये हे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे कारण हवे ते गोष्टी लगेच मुलांना लगेच मिळतात आणि त्यामुळे ती गोष्ट न मिळाल्या कारणाचा राग मनात येतो आणि यामुळे अतिशय टोकाचे पावलं हे मुलं उचलतात.... मुलांना भावनिक दृष्ट्या समजून सांगणे महत्त्वाचे आहे... त्यांची काउन्सलिंग करायला महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही म्हणजे आयुष्य संपत नाही.... अशा पद्धतीच्या गोष्टी आई-वडिलांनी समजून सांगितल्या पाहिजे... बाईट - नकूल कोळी (मानस रोग तज्ज्ञ) याशिवाय नाशिकमध्ये घडलेली ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणते आहे. प्रेमसंबंधातील मतभेद इतके टोकाचे रूप धारण करणे ही चिंतेची बाब आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 25, 2026 13:03:58
Manchar, Maharashtra:ब्रेकींग न्युज\nमंचर पुणे...\nपुणे जिल्ह्याच्या मंचर येथे भिषण आग...आगीत MSEB कार्यालया सह आजूबाजूच्या दुकांनां भिषण आग... आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना येत आहेत अडथळे... बाजूला सीएनजी पंप असल्याने सीएनजी पंपावरील वाहने केली खाली सीएनजी पंप ही केला बंद... आगीत MSEB कार्यालयातील ट्रांसफार्मर सह अनेक वस्तू जळाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा ठप्प... बाजूला असलेल्या शेतकऱ्याने ऊसाचे पाचट पेटवल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती.. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण...\n\nप्रतिनिधी हेमंत चापुडे\nझी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 25, 2026 12:52:20
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 25, 2026 12:35:18
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 25, 2026 12:34:41
Baramati, Maharashtra:इंदापूरच्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट... मुलीने न्यायालयासमोर व्यक्त केली आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा... तत्पूर्वी बारामती न्यायालयासमोर आईसोबत जाण्यास दिला होता नकार. Anchor पुण्याच्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. यावर कोर्टाने संबंधित मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्यासंदर्भात आदेश पारित केला आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. मुलगी काय म्हणाली कोर्टात? मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 25, 2026 11:32:21
Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण पूर्व परिसरात बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली बारावीत शिकणाऱ्या मुलीने घरातील पोटमाळ्यावर गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तातडीने तिला खाली उतरविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी अक्षराने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आई बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही असा मजकूर आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाणे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 25, 2026 11:03:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 10:20:17
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 25, 2026 10:01:49
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवनी कृषी महोत्सवात ‘बबल्या’ बोकड ठरला स्टार आकर्षण तब्बल ८० किलो वजनाचा उस्मानाबादी बोकड पाहण्यासाठी गर्दी. चार किलोचा गिरीराज कोंबडा देखील भाव खातोय. अँकर : धाराशिव जिल्ह्यात सध्या एका बोकडाची आणि एका कोंबड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुळजापूरच्या तुळजाभवनी कृषी महोत्सवात ८० किलो वजनाचा ‘बबल्या’ बोकड आणि चार किलोचा गिरीराज कोंबडा चांगलाच भाव खात आहेत. पाहूया या अनोख्या आकर्षणांवरचा हा खास रिपोर्ट. यावर्षीचा महोत्सव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. उस्मानाबादी जातीच्या बोकडांनी येथे विशेष लक्ष वेधले आहे. ‘बबल्या’ नावाचा तब्बल ८० किलो वजनाचा बोकड प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. शेतकरी आणि नागरिकांची बबल्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून, तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील शेतकऱ्याचा हा बोकड आहे. याचबरोबर ७५ आणि ६० किलो वजनाचे बोकडही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फक्त बबल्या बोकडाचीच नाही, तर चार किलो वजनाच्या गिरीराज कोंबड्याची देखील प्रदर्शनात चांगलीच हवा आहे. विजनवाडी येथील शेतकरी पांडुरंग माने यांचा हा कोंबडा महोत्सवातील आकर्षण ठरत आहे. कोंबड्याची किंमत बाराशे ते पंधराशे रुपयांच्या घरात असली, तरी प्रदर्शनात मात्र त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून येत आहे. उस्मानाबादी शे Pili आणि अस्सल गावरान कोंबडा त्यांच्या मटणाच्या चवीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबादी शेळीला देश-विदेशातून मागणी वाढत आहे. अशा कृषी महोत्सवांच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळीचे ब्रॅण्डिंग करून तिला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न कौतुकास्पद आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 25, 2026 10:00:18
Amravati, Maharashtra:मराठी शाळा वाचवण्यासाठी AISF च्या नेतृत्वात विद्यार्थी उतरले रस्त्यावर; हाथात संविधान घेत फुले, शाहू, आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारत हातात संविधानाची पुस्तक घेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी मोर्चादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवणारे धोरण रद्द करावे, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजन करण्याचे शासन निर्णय रद्द करावे, शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त इतर कामावर गुंतवणूक नये, हिंदी विषय सक्तीचा लादु नये, केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या संदर्भात मोर्चा नंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आलं.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 09:52:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या माणसाकडे किती संपत्ती असू शकते, जेमतेम घर चालवणारा एक सर्वसामान्य समज मात्र संभाजी नगरात एक असा गाडी चालक आहे त्यावर तब्बल 1600 कोटी रुपयांचा मालक असल्याचा आरोप आहे हा चालक आहे संभाजी नगरचे खासदार संदीपण भुमरे यांचा, पाहुयात काय आहे प्रकार... Vo 1... एक गाडी चालक तब्बल 1600 कोटींचा मालक ? चालक जावेद शेख 1600 कोटीचा धनी ? 2 जमीन घोटाळ्यात 1600 वर कोटींचा मालक असल्याचा आरोप कोट्याधीश चालक खासदार भूमरेचा कर्मचारी ! हा आहे जावेद शेख, व्यवसायाने हा खासदार संदीपण भुमरे यांचा गाडी चालक, गेली 15 ते 20 वर्ष हा इसम भुमरे यांची गाडी चालवतो मात्र गेली वर्षभरात हा चांगलच प्रकाश झोतात आलाय, तो ही तब्बल 1600 कोटी साठी... ubt नेते अंबादास दानवे यांनी या चालकाच्या नावावर शासनाचे भुमरे यांनी तब्बल 1150 कोटी गिळायचा डाव रचला असा आरोप आहे यामागे खासदार आमदार भुमरे पितापुत्र असल्याचा त्यांचा आरोप आहे , आणि याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे... Byte अंबादास दानवे ( कालच्या पीसीचा bytte Vo 2.. कोण आहे जावेद शेख भुमरे यांचा गाडी चालक जावेद पुंडलिक नगर भागात 20 बाय 30 चे पत्र्याचे घर आहे माहितीनुसार जावेदला 25 हजार पगार आहे, आणि जावेद ला वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती मिळाली नाहीय... या आरोपनंतर चालक जावेद शेख ही भडकला, आणि माझ्यावर होत असलेले आरोप खोटे असल्याचा सांगत मी अंबादास दानवे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं जावेद शेख याचं म्हणणं आहे बरं याच जावेद शेखवर सहा महिन्यान आधी शहरातील एक मोक्याची जागा ज्याची किंमत 500 कोटी होती तिचाही हिबानामा याच्या नावावर आहे आणि तीही जमीन खासदार भुमरे यांनीच लाटली असल्याचा आरोप आहे मात्र जावेद शेख हे सगळे आरोप फेटाळतोय.. Byte जावेद शेख, चालक Vo 3.. अब चालकावर आरोप झाले त्यामुळे खासदार महोदयही भडकले आणि त्यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळले आणि माझं नाव अंबादास दानवे यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली आहे आणि त्यामुळे भुमरे यांनीही अंबादास दानवेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं सांगितलं... Byte संदीपण भुमरे, खासदार Vo 4... मूळ प्रश्न असा की जावेद हा एक चालक आहे मग त्याच्यावर आधी 500 कोटींच्या जमिनीचा मालक असल्याचा आरोप होतोय तर नंतर 1150 कोटी गिळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय आणि या सगळ्या मागे खासदार भुमरे असल्याचाही आरोप होतोय या प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि ती संपेल ही मात्र या सगळ्यात एक चालक मात्र सोळाशे कोटींच्या मालक असल्याची चर्चा मात्र जोरदार रंगतेय... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 25, 2026 09:43:08
Kolhapur, Maharashtra:Kop Mahayuti Waad Feed:- 2C Anc:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती मधील शिवसेना गटनेते आणि राष्ट्रवादी गटनेत्यामध्ये जोरदार हमरी तुमरी झालीय. शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेते आदिल फरास यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांसमोर एकमेकांना बघून घेण्याची भाषा केलीय. महायुती मध्ये पदाच्या फार्म्युल्यानुसार वाद सुरू झाला आहे. गेले काही दिवस शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये वाद सुरू आहे. याचेच पडसाद कोल्हापूर महानगरपालिकेत अतिक्रमण मुद्द्यावरून आयोजित केलेल्या बैठकीत पाहायला मिळाले. या दोघांमध्ये वाद इतक्या टोकाला गेले की शेवटी महापौर रुपाराणी निकम यांनी हस्तक्षेप करत दोघांना मोठ्या आवाजात शांत राहण्याचे आवाहन केले, तरी देखील एकमेकांनी एकमेकाला बघुन घेण्याची भाषा वापरली. महानगरपालीक घडलेल्या या प्रकारामुळे महायुती मध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top