Back
यवला नगरपरिषद चुनाव 2025: महायुति बनाम शिवसेना-शरद पवार गुट की हॉट टक्कर
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 16:31:54
Yeola, Maharashtra
येवला नगरपरिषद निवडणूक 2025 अत्यंत चुरशीची ठरणार आहे. नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध शिवसेना आणि शरद पवार गट असा सामना रंगला आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट…
येवला नगरपरिषद निवडणूक 2025… शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. मंत्री छगन भुजबळ यांचा परंपरागत मतदारसंघ असल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरतेय.
राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन महायुतीच्या नावाने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. या युतीकडून उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने मात्र भाजप–राष्ट्रवादीच्या विरोधात स्वतंत्र ताकदीने मैदान गाजवण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाकडून रुपेश लक्ष्मण दराडे नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत. रुपेश दराडे हे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुतणे. दराडे कुटुंबाचा येवला राजकारणात दीर्घ वारसा आहे.
विशेष म्हणजे… भुजबळांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शिवसेना उमेदवार रुपेशक दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे लढतीला नवीनच दिशा मिळाली आहे. येवला शहरात भुजबळ आणि दराडे गटांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आणि यावेळी दोन्ही बाजू एकमेकांवर मात करण्यासाठी कामाला लागल्या आहेत.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहेत.
अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी केवळ दोनच उमेदवार उरले आहेत— महायुतीचे राजेंद्र लोणारी आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रुपेश दराडे.
म्हणूनच येवला नगरपालिका कोणाच्या हातात जाणार… महायुती की विरोधी आघाडी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
157
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 17:15:35Kalyan, Maharashtra:अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण
खासदार श्रीकांत शिंदे यांनी खैरे कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन
राजकीय पक्षांनी या घटनेचे राजकारण करू नये
57
Report
JMJAVED MULANI
FollowNov 22, 2025 16:33:18200
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 16:32:53120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 16:32:33179
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 16:32:11193
Report
UPUmesh Parab
FollowNov 22, 2025 16:31:24127
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 16:17:13214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:15:14Navi Mumbai, Maharashtra:पनवेल सायन मार्गावर एका कारला लागली भीषण आग
आगीमध्ये कार जळून खाक
नेरूळ बेलापूर रोडवरील उरण फाटा येथील ब्रिज वर घडला अपघात
घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सुदैवाने कोणतीही जीवीतहानी
172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:07:48127
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:07:28161
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:05:02213
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:46138
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:25149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 15:45:25213
Report