Back
धुळे के भामपूर में 14 वर्षीय बालक पर अमानवीय मारपीट; दो आरोपी गिरफ्तार
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:07:48
Dhule, Maharashtra
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भामपूर परिसरात 14 वर्षीय मुलाला शेतात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली आणि, तोला बैलगाडीला बांधून चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यां प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भामपूर गावातील दोन संशयितांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला शेतात पळवून नेऊन, त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चितामण उर्फ चिंटुभाऊ साहेवराव कोळी आणि त्याचा भाऊ सचिन उर्फ डॉक्टर साहेवराव कोळी या दोघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा हिमांशु आणि पत्नी वंदना हे रडत असल्याचे दिसले. मुलाच्या पाठीवर व हातावर भाजल्याच्या जख mannerा दिसल्याने त्यांनी संपूर्ण बाब विचारली. तो सकाळी दहा वाजता भामपूर येथील शिवाजी चौकात बसलेला असताना चितामण कोळी हा तेथे आला. त्याने मुलाला जबरदस्ती मोटारसायकलवर बसवून जळोद रस्त्यालगतच्या त्यांच्या शेतातील विटभट्टीजवळ नेले. त्या मुलाला बैलगाडीवर झोपून लोखंडी बैलगाडीखाली आग लावण्यात आली. आगीमुळे चटके बसू लागल्याने चटके बसत असल्यामुळे मुलगा आरडा ओरडा करत होता. अखेर जीव मुठीत घेऊन हिमांशुने भीतीपोटी “लाईट घरी कोठीत ठेवले आहे, आणून देतो” असे खोटे सांगितले. त्यानंतर चितामणने त्याची दोरी सोडली. यां घटनेनंतर वडील संतोष गवळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली असून मुलाला पळवून नेणे, मारहाण करणे, लोखंडी बैलगाडीला बांधून जाळण्याचा प्रयत्न करणे आणि जीवाला धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपींच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलावर झालेल्या अत्याचाराची ग्रामस्थांतून व्यापक निंदा होत आहे.
127
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 22, 2025 16:33:18200
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 16:32:5361
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 16:32:33133
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 16:32:11193
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 16:31:5470
Report
UPUmesh Parab
FollowNov 22, 2025 16:31:24127
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 16:17:13214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:15:14Navi Mumbai, Maharashtra:पनवेल सायन मार्गावर एका कारला लागली भीषण आग
आगीमध्ये कार जळून खाक
नेरूळ बेलापूर रोडवरील उरण फाटा येथील ब्रिज वर घडला अपघात
घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सुदैवाने कोणतीही जीवीतहानी
172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:07:28161
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:05:02213
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:46138
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:25149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 15:45:25213
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 15:31:30145
Report