Back
इंदापूर के विकास का दावा: दत्तात्रय भरणे ने 11 वर्ष के काम गिनाए
JMJAVED MULANI
Nov 22, 2025 16:33:18
Baramati, Maharashtra
কृषिमন্ত্রী दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर श्रीराम सोसायटी इंदापूर नगरपरिषद प्रचार सभा. इंदापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभे करता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी परिसरात पहिली जाहीर सभा घेतली यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 उमेदवारांचे चिन्ह घड्याळ आहे त्याला मतदान करा. मतदान रुपी आशीर्वाद द्या. आजची सभा ही पहिली सभा आहे. घड्याळाला मतदान करणे गरजेचे आहे हे अनेकांनी सांगितले. 2014 तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं.याचा उपयोग मी इंदापूर शहरासाठी प्रामाणिक पणे 11 वर्ष काम केलं. जास्तीचा निधी कसा आणता येईल यासाठी काम केले. ही काय जादूची कांडी नाही यासाठी खूप मोठ कष्ट घ्यावे लागते. मागील चार वर्षात अंकिता शहा यांनी देखील इंदापूर शहरासाठी प्रामाणिकपणे काम केले. एक निवेदनात अजित पवार यांनी शिरसोडीचा पूल मंजूर केला हे जगातील पहिले उदाहरण असेल,यामुळे इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे बाजारपेठ पाच पट बदलणार आहे. मागे 20 वर्षात हे काम झाले नाही हे मला विरोधकांना विचारायचे आहे. 61 कोटी रूपये आपण शहरात बंदिस्त गटार साठी दिले. रस्त्यांसाठी आपण 88 लाख रुपये दिले. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी आपण 10 कोट रूपये दिले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गरीब मुलांसाठी आपण 5 कोटी रुपयांची एक अभ्यासिका मंजूर केली आहे. ऊर्जा प्रकल्प आपण मंजूर केला आहे. शॉपिंग मॉल साठी आपण 100 कोटी रूपये दिले त्याचे काम चालू आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेत आपण साडेनऊ कोटी रूपयाचे काम सुरू आहे. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे काम सुरू आहे चांद शहावली बाबांच्या दर्गा चे काम सुरू है. विरोधकांना मला विचारायचे आहे की तुम्ही सत्तेवर होता मग तुम्ही हे का करू शकला नाही. पोलिस स्टेशनची इमारत आपल्याला नव्याने करायची आहे. मी मुंबई ला जायचो तो फिरण्यासाठी नाही तर इंदापूर साठी काही आणता येईल यासाठी जायचो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सहकार्य आपल्यालाही त्यामुळे हे काम आपण करू शकतो. विधानसभा निवडणुकीत अनेक लोकांनी गमती जमती करण्याचा प्रयत्न केला, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरत शहा माझ्या पाठीशी उभे राहिले माझा प्रचारक केला. ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्या आभार मानतो कौतुक करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध विहाराच्या बाबतीत काही सूचना मांडल्या. तालुक्याचा आमदार महत्त्वाचा असतो,तो डिपीडिसी मध्ये असतो त्यामुळे तोच निधी देतो भविष्यात तुम्हाला जो निधी मिळणार आहे पुढचे चार वर्षे मीच आमदार आहे त्यामुळे विकासासाठी जे राहील आहे ते मीच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देणार आहे. लाडक्या बहिणींना एकच विनंती लोक येतील जोरात भाषण ठोकतील भाया सारून बोलतील पण मी काम करणारा माणnisse आहे काम करीत आलो आहे काम करणार आहे. भविष्यात या तालुक्याचा भरत शहा आणि नगरसेवकांच्या मदतीने चेहरा मोहरा बदलण्याशिवाय राहणार नाही तो पर्यंत हा दत्तात्रय भरणे स्वस्त बसणार नाही. आमचे नगरसेवक कमी बोलणारे आहे पण कामाचे आहेत. मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो तेव्हा या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी शहरात एक स्विमिंग टँक असावा यासाठी शेवटच्या दिवशी 56 कोटी रुपये मंजूर करणार हा तुमचा मामा आहे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहायचे की बच्चन गिरी भाषणे गिरी करणाऱ्याच्या पाठीशी राहायचे याचा विचार करा.
200
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 17:15:35Kalyan, Maharashtra:अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण
खासदार श्रीकांत शिंदे यांनी खैरे कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन
राजकीय पक्षांनी या घटनेचे राजकारण करू नये
57
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 16:32:53120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 16:32:33179
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 16:32:11193
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 16:31:54157
Report
UPUmesh Parab
FollowNov 22, 2025 16:31:24127
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 16:17:13214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:15:14Navi Mumbai, Maharashtra:पनवेल सायन मार्गावर एका कारला लागली भीषण आग
आगीमध्ये कार जळून खाक
नेरूळ बेलापूर रोडवरील उरण फाटा येथील ब्रिज वर घडला अपघात
घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सुदैवाने कोणतीही जीवीतहानी
172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:07:48127
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:07:28161
Report
SNSWATI NAIK
FollowNov 22, 2025 16:05:02213
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:46138
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 22, 2025 16:04:25149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 15:45:25213
Report