Back
राहुरी के कुंदेवाड़ी में गहू दिन: फसल के नए गेहूं वाण विकसित
SKSudarshan Khillare
Mar 06, 2026 07:48:08
Niphad, Maharashtra
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत नाशिकच्या निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज ‘गहू दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शिवार फेरी आयोजित करण्यात आली तसेच विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या या गहू संशोधन केंद्राने आजपर्यंत गव्हाच्या एकूण ३२ वाणांचे संशोधन करून शिफारस केली आहे यामध्ये १५ वाण स्वातंत्र्यपूर्व काळातील, तर १७ वाण स्वातंत्र्यानंतर विकसित करण्यात आले आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठे गहू संशोधन केंद्र म्हणून या केंद्राची ओळख असून येथे विकसित करण्यात आलेले गहू वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. नव्याने विकसित करण्यात आलेला ‘फुले समाधान’ हा गव्हाचा वाण कमी पाण्यात येणारा असून चपातीसाठी उत्तम दर्जाचा असल्याचे सांगण्यात आले. तसेच फुले सात्विक, फुले अनुपम, त्रंबक, गोदावरी, तपोवन आणि नेत्रावती अशा विविध गव्हाच्या वाणांचे संशोधन येथे करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सूचनेनुसार केंद्रात सेंद्रिय गहू उत्पादनाचा प्रयोग सुरू करण्यात आला असून तो यशस्वी टप्प्यात आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत सेंद्रिय शेतीसाठी नवीन गव्हाचे वाण उपलब्ध होणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 06, 2026 09:37:130
Report
MAMILIND ANDE
FollowMar 06, 2026 09:35:350
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 09:31:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 09:22:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 06, 2026 09:04:010
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 09:03:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 08:49:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 06, 2026 08:21:290
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 08:20:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 08:20:080
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 08:04:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 07:04:470
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 07:01:530
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 06, 2026 07:00:160
Report