Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर के वारोरा में अकोना कोयला खदान से चोरी; CCTV पकड़ा, पांच रक्षक निलंबित

AAASHISH AMBADE
Mar 06, 2026 07:01:53
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुर जिले के वारोरा तालुक में अकना coal खदान क्रमांक 2 से बड़ी मात्रा में कोयला चोरी की धक्कादायक घटना होने की बात सामने आई है। वेकोली के माध्यम से वारोरा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है। इस मामले में बड़े मछे फँसने की संभावना बताई जा रही है। वेकोली के महाव्यवस्थापक राकेश प्रसाद ने तात्कालिक कार्रवाई करते हुए इस प्रकरण की लापरवाही के लिए पांच सुरक्षा रक्षकों को निलंबित कर दिया है। सीसीटीवी फुटेज और रिकॉर्ड में अनियमितताएँ सामने आने से चोरी की पुष्टि हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार, वी। वी. ट्रांसपोर्ट कंपनी, नागपुर की गाड़ी खदान परिसर से कोयला लेकर बाहर निकलते समय सुरक्षा गार्ड की मौजूदगी में वजन न देखते हुए बाड़ पार कर गई। यह घटना दूसरी बार दूसरे ट्रक के साथ भी दोहराई गई। इस संदिग्ध गतिविधि को देखते हुए डिस्पैच अधिकारी मुकेश गजभिये ने महाव्यवस्थापक राकेश प्रसाद को सुझाते हुए जानकारी दी। इसके बाद सीसीटीवी फुटेज की जाँच से चोरी की पुष्टि हुई। यह कोयला आवरपूर सिमेंट कंपनी के लिए सप्लाई किया जाना बताया गया है। चोरी का पता चलते ही संबंधित कंपनी को सूचना देकर कोयला आपूर्ति तत्काल बंद कर दी गई है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 06, 2026 09:22:54
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे बारावी पेपर फुटीच अजून एक महत्त्वाचं केंद्र असल्याचं तपासात उघडकीस आलय.. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर व्हॉट्सअप च्या माध्यमातून पेपर फुटीच्या प्रकरणानंतर उमरेड येथील शिकवणी क्लासमध्ये सराव परीक्षेतील बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षाेत जसेच्या तसे आले होते. बोर्डाकडून चौकशी केल्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली... आणि गुन्हा दाखल करण्यात आला. उमरेड पोलिसांत बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला, उमरेडमधील शिकवणी वर्गाचालक डॉ. अतुल चौधरी पोलिसांनी ताब्यात घेतलेय. 26 जानेवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली. सराव परीक्षेत दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाचा पेपर जशेच्या तशी आले होते; 50% पेपरमध्ये साधर्म्यता आढळली. या प्रकरणी चौकशी झाली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 06, 2026 09:04:01
Jalna, Maharashtra:जालना : 108 कोटींचा सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी अभावी रखडला गया. अँकर: जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी तसेच कुंडलिका नदी स्वच्छ राहावी यासाठी 108 कोटींचा प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं, मात्र निधी अभावी काम रखडले. प्रकल्प 2014 मध्ये भूमिपूजन झाला असताना 12 वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. 108 कोटींपैकी कंत्राटदाराला 94 कोटी रुपये दिले गेले असले तरी महापालिकेनं 16 कोटी रुपये दिले नाहीत, त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा प्रश्नचिन्ह बनलेला आहे. या प्रकल्पासाठी पाईपलाईन कुंडलिका नदीतून टाकण्यात आली होती, परंतु अंडर ग्राउंड पाईपलाइनच्या सिमेंट काँक्रिट खड्डे उघडे असल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका यांनी वरिष्ठता देऊनच हा प्रश्न हाताळावा असे नागरिकांचे अपेक्षा आहेत. महापालिका महापौर वंदना मगरे यांनी प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय आणि पर्सनालिटीजचे म्हणणे आहे की निधीची कमतरता दूर केल्याशिवाय योजना पूर्ण होणार नाही. 12 वर्षात 2 वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही; नागरिकांमधून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 06, 2026 09:03:40
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे इमारतीचा स्लॅब स्लॅब कोसळून चार विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाल्या असून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई मनपा विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय. यासोबतच जखमी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शिवसेना करणार असून मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी सत्ताधारी भाजपावर टीका करत श्वेतपत्रिका काढणाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांची श्वेतपत्रिका काढावी असा टोला लगावलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 06, 2026 08:49:50
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिराचीवाडी या छोट्याशा गावाने आता समृद्धीकडे मोठी झेप घेतली आहे. एका अर्थाने हे गाव समृद्धीच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. कारण एकेकाळी माळरानावर वसलेल्या या गावाची स्मशानभूमी आज पर्यटनाचे केंद्र बनली आहे. त्यामुळे गावातील विकासकामं पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून ग्रामस्थ आवर्जून पिराचीवाडीला भेट देत आहेत. को Kagal तालुक्यातील उंचावर वसलेलं हे गाव. पाऊस कमी आणि शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून. त्यामुळे शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं आणि अनेकांना मजुरी किंवा हमाली हा मुख्य व्यवसाय बनला होता. पण गावातील तरुण शेतकरी सुभाष भोसले यांनी परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी स्वतःचं शेत, घर, बंगला आणि दागिने गहाण ठेवत जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची सहकारी पाणीपुरवठा योजना उभी केली. यानंतर खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाचा पाया रचला गेला. आज गावात स्वप्नवत स्मशानभूमी, ग्रामपंचायतीसह इतर विभागांच्या सुसज्ज इमारती, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. गावात वनराई आणि स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थही आता हे स्वप्नातील गाव असल्याची भावना व्यक्त करत आहेत. गावातील विकासकामं पाहण्यासाठी अनेकजण येथे भेट देत आहेत. ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेते भाऊ कदम यांनी देखील गावाला भेट दिली होती. गावाच्या विकासासाठी फक्त निधी असणं पुरेसं नसतं, तर त्या निधीचा योग्य वापर आणि गावकऱ्यांची एकजूट यावरच खरा विकास अवलंबून असतो.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 08:21:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Pkg Sng_halad_dar स्लग - आखाती युद्धामुळे सांगलीच्या हळदीला फटका... हळदीचे दर घसरले.. अँकर - हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे,जगप्रसिद्ध असणार ही बाजारपेठ आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे आता संकटात सापडण्याची शक्यता आहे.देश भरातील हजारो टन हळद बंदर आणि जहाजांमध्ये अडकून पडली आहे,याशिवाय स्थानिक हळदीचे दर देखील घसरले आहेत. ग्राफिक्स in सांगलीच्या सोनेरी हळदीवर आखाती देशातील युद्धाचं संकट इराण-इजराईल अमेरिका युद्धामुळे हजारो टन हळद जहाज व बंदरावर अडकुन सांगली जिल्ह्यातुन गेलेली 350 टन हळद निर्यात अभावी पडली अडकुन जगात सांगलीची हळद उच्च प्रतिची म्हणून गणली जाते जागतिक पातळीवरील मसाल्या कंपनीकडुन सांगलीच्या हळदीचा केला जातो त्यामुळे सांगलीच्या हळदीला युरोप पाठोपाठ आखाती देशात देखील मोठी मागणी असते.. ग्राफिक्सवर out व्ही वो - सांगलीतली हळदीला आखाती देशातल्या युद्ध मुळे फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे,सांगलीत पिकणाऱ्या हळदीत कर्क्युमन अधिक असतो,त्यामुळे जगात सांगलीच्या हळदीला चांगली मागणी आहे, त्यामुळे हळदीचे जगातले दर हे सांगलीच्या बाजारपेठेत ठरतात. Wkt व्ही वो - सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेत सध्या हळदीचे साडेचौदा हजार रुपये सरासरी दर आहेत.मात्र हे दर आता आखाती देशातल्या युद्धामुळे घसरले आहेत, जवळपास साडेतेरा हजार रुपये सरासरी इतका दर प्रतिक्विंटल हळदीला मिळाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेतून हळद 15 ते 20% हळद ही निर्यादीसाठी खरेदी केली जाते,मात्र आता ही खरेदी थांबली आहे. बाईट - मनोहर सारडा - हळद व्यापारी - सांगלי. व्ही वो - अगदी देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे मुंबईच्या बंदर आणि जहाजांमध्ये जवळपास सांगली जिल्ह्यातील साडेतीनशे टन हळद अडकली आहे याशिवाय देशांतर्गत जाणारी हजारो टन हळद अडकली आहे आणि याचा परिणाम आता हळदीच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. निर्यात थांबल्यामुळे हळदीचे दर घसरले आहेत, त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे. व्ही वो - हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळाला होता,मात्र आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट सांगलीच्या हळदीवर झाला पाहायला मिळत आहे, त्यामुळे आखाती देशातील युद्ध कधी थांबणार आणि हळदीची निर्यात कधी होणार याची प्रतीक्षा शेतकरी आणि व्यापारयांना लागली आहे。
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 08:20:27
Kalyan, Maharashtra:तिसऱ्या दिवशी ही NUHM डॉ, नर्सेस आणि कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिकेतील NUHM डॉक्टर, नर्सेस, व कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांन पासून धरणे आंदोलन सुरू आहे. चार महिन्या पासून कर्मचाऱ्यांना बकाया पगार मिळालेला नाही. तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु आहे. पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासन देण्यात आलं असल्याने शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी KDMC अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठवडाभरात या कर्मचाऱ्यांना थकीत पगार द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार KDMC प्रशासनाला दिला आहे. बाइट महेश गायकवाड, शिवसेना संपर्क प्रमुख, नगरसेवक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 06, 2026 08:20:08
Nagpur, Maharashtra:एयरफोर्स पायलट पुरवेश दुरगकर के नागपुर स्थित घर पर मातम छाया हुआ है। पुरवेश की मृत्यु सुखोई Su-30 फाइटर जेट के क्रैश होने से हुई। पूर्वश के पिता और रिटायर्ड रेलवे कर्मचारी रवींद्र दुरगकर ने कहा कि उन्होंने बुधवार को पुरवेश से बात की थी。 उन्होंने कहा कि पुरवेश के ग्रुप कैप्टन ने सुबह उनसे संपर्क किया था और उनके निधन के बारे में बताया था。 उन्होंने ऑपरेशन सिंदूर में भी हिस्सा लिया था और वह देश के लिए बहुत समर्पित थे और उन्हें इंडियन एयरफोर्स में होने पर बहुत गर्व था。 दुरगकर ने कहा कि वह अपने साथियों की बहुत तारीफ करते थे。 दुरगकर ने कहा कि उनका बेटा असम के तेजपुर में पोस्टेड था और अभी वह जोहरात में था क्योंकि तेजपुर में रनवे का कुछ काम चल रहा था।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 08:04:57
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 06, 2026 07:48:08
Niphad, Maharashtra:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत नाशिकच्या निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज ‘गहू दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शिवार फेरी आयोजित करण्यात आली तसेच विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या या गहू संशोधन केंद्राने आजपर्यंत गव्हाच्या एकूण ३२ वाणांचे संशोधन करून शिफारस केली आहे यामध्ये १५ वाण स्वातंत्र्यपूर्व काळातील, तर १७ वाण स्वातंत्र्यानंतर विकसित करण्यात आले आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठे गहू संशोधन केंद्र म्हणून या केंद्राची ओळख असून येथे विकसित करण्यात आलेले गहू वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. नव्याने विकसित करण्यात आलेला ‘फुले समाधान’ हा गव्हाचा वाण कमी पाण्यात येणारा असून चपातीसाठी उत्तम दर्जाचा असल्याचे सांगण्यात आले. तसेच फुले सात्विक, फुले अनुपम, त्रंबक, गोदावरी, तपोवन आणि नेत्रावती अशा विविध गव्हाच्या वाणांचे संशोधन येथे करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सूचनेनुसार केंद्रात सेंद्रिय गहू उत्पादनाचा प्रयोग सुरू करण्यात आला असून तो यशस्वी टप्प्यात आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत सेंद्रिय शेतीसाठी नवीन गव्हाचे वाण उपलब्ध होणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी दिली.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 06, 2026 07:04:47
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीत राहून डॉ. ज्योती वाघमारे बनल्या खासदार राजकारणात खऱ्या अर्थाने एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला न्याय मिळाल्याची भावना आता राज्यभरातून व्यक्त होतेय... ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केलीय... झोपडपट्टीत राहत असताना देखील दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या... महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला त्यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालाय... दहा वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले.. सोलापुरात काही काळ त्यांनी काँग्रेसचे काम केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला... ज्योती वाघमारे यांच्या कामाची दखल एकनाथ शिंदेंनी घेत त्यांना राज्य प्रवक्ते पदाची मोठी जबाबदारी दिली.... तेही काम त्यांनी यशस्वीपणे केल्यानंतर थेट इतकी मोठ्या स्पर्धेतून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेतून बिनविरोध खासदार करण्यात आलं.... ज्योती वाघमारे यांचे आई-वडील आज देखील त्याच झोपडपट्टीत राहतात... प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी ज्या झोपडपट्टीत आपल्या आयुष्य घालवून स्वतःला घडवलं त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 06, 2026 07:00:16
Virar, Maharashtra:विरार पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तपास करून नागरिकांना दिलासा देणारी कामगिरी केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींवर कारवाई करत पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या मदतीने वेगवेगळ्या कंपन्यांचे तब्बल ६३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे १२ लाख ३० हजार रुपये इतकी असून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. मोबाईल हरवल्यानंतरही पोलिसांनी केलेल्या तत्पर तपासामुळे अनेकांना आपले महागडे फोन परत मिळाले आहेत. विरार पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून ही यशस्वी मोहीम राबवली. तसेच नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 06, 2026 06:07:08
Shirdi, Maharashtra:विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व बाळासाहेब थोरात यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यात सुरू असलेली श्रेयवादाची लढाई अजूनही सुरूच आहे.. नगरपालिका निवडणुकीत तांबे यांनी बाजी मारली.. मात्र आता संगमनेर शहरात नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाली आहे.. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बस स्थानक परिसरात दोन्ही आमदारांकडून शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले... एकीकडे तांबे यांच्या माध्यमातून स्मारकासाठी जनतेतून मते मागवण्यात आली तर दुसरीकडे अमोल खताळ यांनी होय अश्वारूढच पुतळा उभारणार अशा पद्धतीने देखावे सादर करत डीजेच्या तालावर कार्यक्रम घेण्यात आले... विधानसभा निवडणुकीपासून अपक्ष आमदार सत्यजित तांबे व शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यात सुरू असलेली ही श्रेयवादाची लढाई मतदारसंघाला विकासाकडे नेणार की यातून भविष्यकाळात वाद निर्माण होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top