Back
200 करोड़ के ग्रीन बॉन्ड पर निवेशकों का भारी ओवरसब्सक्राइब, जलापूर्ति पर होंगे प्रोजेक्ट्स
SGSagar Gaikwad
Mar 13, 2026 03:00:25
Nashik, Maharashtra
ग्रीन बाँडचे पैसे लवकरच महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार
बाजारात साडेपाचपट प्रतिसाद
अँकर
महानगरपालिकेनरे बाजारात आणलेल्या २०० कोटी रुपयांच्या ग्रीन बाँडला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या दोन दिवसांत हा इश्यू तब्बल ५.४६ पट ओव्हरसब्स्क्राइब झाला. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत २०० कोटी रुपयांची उभारणी झाली असून लवकरच महानगरपालिकेच्या तिजोरीत पडतील, अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूड यांनी दिली. ९ मार्च रोजी सार्वजनिक इश्यूद्वारे हा ग्रीन बाँड बाजारात आणण्यात आला होता. या इश्यूमध्ये १२० कोटींचा हिस्सा संस्थागत गुंतवणूकदारांसाठी, ५० कोटी नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी तर ३० कोटी सामान्य गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. अपेक्षेपेक्षा अधिक मागणी नोंदवल्यामुळे हा इश्यू मोठ्या प्रमाणात ओव्हरसब्स्क्राइब झाला. या ग्रीन बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मनपाकडून दर सहा महिन्यांनी ८.०५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलपुरवठा आणि पाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 13, 2026 03:31:200
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:19:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:05:070
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 13, 2026 03:04:450
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 02:33:230
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:55Bhandara, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम कृषी साहित्यांचे 30 ते 40 टक्के दर वाढले... युद्धाचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:32:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 02:32:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:01:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:00:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:00:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report