Back
अकोला GMCH में संतप्त मरीज ने डॉक्टरों पर हमला करने की कोशिश की
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 02:00:36
Akola, Maharashtra
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच जीएमसी रुग्णालयात एका संतप्त रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्यासाठी मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टॅन्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर Association of State Medical Interns Maharashtra या संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देण्यात आले आहे. एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांत तक्रार दाखल करावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर आज तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील, असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:01:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:00:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 15:32:120
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 15:01:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 14:38:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report