Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

उपमहापौर धनंजय जाधव बोले: पुराने कार्यालय की सफाई और सुविधाओं पर जोर

LBLAILESH BARGAJE
Mar 13, 2026 03:19:43
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर येथील उपमहापौर धनंजय जाधव यांनी महानगरपालिकेच्या जुन्या कार्यालयाला भेट दिली या भेटीत कार्यालयाच्या दुरावस्थेबद्दल कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन कार्यालयातील स्वच्छता आणि नागरिकांच्या सोयी बाबत सूचना दिल्या आहेत महानगरपालिकेचे जुने कार्यालय शहरात असून याच ठिकाणी नागरिकांच्या वेगवेगळ्या नोंदी आणि कर भरण्याची कार्यालय आहेत या भेटीत जाधव यांनी कर्मचाऱ्यांची अडचणी देखील जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. महानगरपालिकेत तब्बल अडीच वर्षानंतर निवडणूक झाल्यामुळे नवीन नगरसेवक आणि पदाधिकारी सक्रिय झाले असून नागरिकांच्या सेवा सुविधा कर्मचारी यांच्याकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 13, 2026 03:05:07
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 13, 2026 03:04:45
Nashik, Maharashtra:त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका भाविकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी स्वतंत्रपणे करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत....१ मार्च २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका भाविकावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र संबंधित व्हिडीओ अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले असून संपूर्ण घटनेचा सत्य तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नाशिक येथील द्वितीय कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) तसेच त्र्यंबकेश्वर ग्राम न्यायालयाच्या न्यायाधीश के. एम. चंडालिया यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. के. एम. चंडालिया यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे व इतर सामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत....
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 13, 2026 03:00:25
Nashik, Maharashtra:ग्रीन बाँडचे पैसे लवकरच महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार बाजारात साडेपाचपट प्रतिसाद अँकर महानगरपालिकेनरे बाजारात आणलेल्या २०० कोटी रुपयांच्या ग्रीन बाँडला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या दोन दिवसांत हा इश्यू तब्बल ५.४६ पट ओव्हरसब्स्क्राइब झाला. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत २०० कोटी रुपयांची उभारणी झाली असून लवकरच महानगरपालिकेच्या तिजोरीत पडतील, अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूड यांनी दिली. ९ मार्च रोजी सार्वजनिक इश्यूद्वारे हा ग्रीन बाँड बाजारात आणण्यात आला होता. या इश्यूमध्ये १२० कोटींचा हिस्सा संस्थागत गुंतवणूकदारांसाठी, ५० कोटी नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी तर ३० कोटी सामान्य गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. अपेक्षेपेक्षा अधिक मागणी नोंदवल्यामुळे हा इश्यू मोठ्या प्रमाणात ओव्हरसब्स्क्राइब झाला. या ग्रीन बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मनपाकडून दर सहा महिन्यांनी ८.०५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलपुरवठा आणि पाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 13, 2026 02:33:23
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 02:32:44
Akola, Maharashtra: अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील लोहारी मार्गावरील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलनी परिसरात विजय इंगळे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये व्यवसायासाठी लागणारे साहित्य, अन्नधान्य आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवून ठेवले होते. अचानक या गोडाऊनला आग लागली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सिलिंडरच्या स्फोटामुळे गोडाऊनवरील टीनपत्रे हवेत दूरवर उडाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा तर्क वर्तवण्यात येत आहे.या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण फर्निचर, अन्नधान्य आणि कॅटरिंगचे महागडे साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 13, 2026 02:32:26
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 13, 2026 02:32:10
Bhandara, Maharashtra:वडेगाव/बंध्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. सुमारे 25 ते 30 जंगली हत्तींचा कळप या परिसरात दाखल झाला आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारातून मार्ग काढताना मका पिकाचे मोठे नुकसान केले. दयाराम घुगुसकर व तेजराम गुरनुले या शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकाची हत्तींच्या कळपाने नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींचा कळप गावाजवळ आल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाला याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी मालिकगस्त केली असून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवत परिसरात गस्त घालत आहेत. हंतींच्या कळपामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने नागरिकांनी सतर्क राहावे तसेच हत्तींच्या कळपाजवळ जाणे टाळावे असे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 02:01:16
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | मालमत्ता कर 1250 कोटींपेक्षा अधिकचा थकला,7 मालमत्ता जप्त छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मालमत्ताधारक कर भरणा करत नाहीत. अनेक ठिकाणी मालमत्ता कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे १२५० कोटींपेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकला आहे. दुसरीकडे योजना पूर्ण करण्यासाठी मनपाला कर्ज काढावे लागत आहे. परिणामी मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा आयुक्तांनी जप्तीचे अस्त्र उगारत ७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. मार्च महिन्याचे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. यासाठी शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनपा अधिनियम ४२, पोटनियम १ अंतर्गत जप्तीची कारवाई केली जात आहे. १ एप्रिल २०२५ ते १२ मार्च २०२६ पर्यंत १ लाख ३३ हजार नागरिकांनी १९४ कोटी रुपये मालमत्ता कर भरणा केला आहे. गुरुवारी एका दिवशी मालमत्ताधारकांनी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. १९ कोटी रुपये नळपट्टी नागरिकांनी भरली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 02:00:52
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अनिल मकरिये यांनी एमआयएमचे उमेदवार खान अब्दुल मतीन यांचा 6 मतांनी पराभव केला. मकरिये यांना 10 मत मिळाले, मतीन यांना 4 मते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित आघाडीचे नगरसेवक तटस्थ राहिले. भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 2 नगरसेवक मकरिये यांच्या बाजूने मतदान. महापालिकेच्या 5 विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेलेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वरचढ झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राबता ज्याचा दिसत होता, आता भाजपने जम बसवल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 02:00:36
Akola, Maharashtra:अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच जीएमसी रुग्णालयात एका संतप्त रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्यासाठी मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टॅन्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर Association of State Medical Interns Maharashtra या संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देण्यात आले आहे. एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांत तक्रार दाखल करावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर आज तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील, असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 12, 2026 16:30:20
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... Exclusive video... स्किप्ट ::- निलंगा एसटी डेपोमध्ये भीषण आग... डिझेल भरताना बसला मोठा भडका... आगीत एसटी बस जळून खाक... डिझेल भरत असलेला ऑपरेटर गंभीर भाजला... निलंगा शासकीय रुग्णालयात जखमी ऑपरेटरवर उपचार सुर.... AC ::- लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एस.टी. आगारात बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून डिझेल भरत असलेला एस.टी. महामंडळाचा ऑपरेटर गंभीररीत्या भाजला आहे. जखमी ऑपरेटरला तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी डिझेल भरत असताना ही आग लागल्याने मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 15:46:32
Akola, Maharashtra:अकोला शहरातील मानेक टॉकीजजवळ असलेल्या तेलीपुरा रोडवर वीज वितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तेलीपुरा रोडवरील वीज वितरणाच्या डीपीमधून अचानक ठिणग्या उडत आग भडकली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यानंतर तत्काळ महावितरण विभाग आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. या आगीमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top