Back
अकोला के आकोट में कैटरिंग गोदाम में आग, गैस सिलेंडर फटने से लाखों नुकसान
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 02:32:44
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील लोहारी मार्गावरील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलनी परिसरात विजय इंगळे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये व्यवसायासाठी लागणारे साहित्य, अन्नधान्य आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवून ठेवले होते. अचानक या गोडाऊनला आग लागली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सिलिंडरच्या स्फोटामुळे गोडाऊनवरील टीनपत्रे हवेत दूरवर उडाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा तर्क वर्तवण्यात येत आहे.या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण फर्निचर, अन्नधान्य आणि कॅटरिंगचे महागडे साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 13, 2026 03:31:200
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:19:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:05:070
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 13, 2026 03:04:450
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 13, 2026 03:00:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 02:33:230
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:55Bhandara, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम कृषी साहित्यांचे 30 ते 40 टक्के दर वाढले... युद्धाचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 02:32:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:01:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:00:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:00:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report