Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

मरळगोई में आग से किसान घर और 3 लाख रु की नकदी जलकर राख

SKSudarshan Khillare
Nov 26, 2025 03:18:33
Niphad, Maharashtra
अँकर :-नाशिकच्या निफाड तालुक्यातील मरळगोई या आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कांदा विक्री करून घर बांधण्यासाठी साठवून ठेवलेले तीन लाख रुपयांची रोकड आगीमध्ये जळून भस्म सात झाले आहे किरण घुगे या शेतकऱ्याचे नाव असून घुगे कुटुंबीय कौटुंबिक कामासाठी घराबाहेर गेले असताना अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला तसेच नवीन घर बांधण्यासाठी साठवuun ठेवलेले तीन लाख रुपये देखील जळावे त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 26, 2025 04:20:46
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 26, 2025 04:20:32
Ratnagiri, Maharashtra:खेडमध्ये उबाठाला मोठा धक्का, उबाठाच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता खालकर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोडी मात्र पहावयास मिळत आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनिता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वइच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र देखील सादर केले आहे. मंगळवारी सायंकाळी मोठी राजकीय उलथापालथ पहावयास मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंड वरील आणि त्यांच्या प्रभागातील उमेदवार सुनिता खालकर यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.. खेड शहरात होणारी विकास कामे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 26, 2025 04:20:23
Nanded, Maharashtra:शंकरराव चव्हाण म्हणायचे नांदेडला लंडन बनवणार, मी दोन तीन वेळा नांदेडला आलो पण मला काही बदल दिसला नाही अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी ही टीका केली. आज तर मी त्यांच्या मतदार संघातील गावात आलो, मला वाटले हे गाव तरी चांगले असेल परंतु काही नाही. ज्या लोकांनी एव्हढं मोठं राजकारण केलं, काम केलं ज्यांच्या आदर्शवर आम्ही राजकारण करतो ते गाव तर सर्वात सुंदर असेल असे वाटले होते अशी खोचाक टिकाही शिरसाठ यांनी केली. भाकरी खाता की पैसे एव्हढ्या सगळ्या एजंसी घेऊन करता, एव्हढा पैसा कश्याला पाहिजे, भाकरी खाता की नोटा अश्या शब्दात सामाजिक न्यायामंत्री संजय शिरसाठ यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी हे वक्तव्य केले. घरात पंधरा माणसे असली असती तर वाटण्या झाल्या असत्या आणि आपल्या वाट्याला काही येणार नाही असे असले तर समजू शकलो असतो असे म्हणत शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्यावर व्ययक्तिक टिकाही केली. संजय शिरसाठ टाईट राहतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझा फ्लॅट आहे काय आहे ते दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही, आपण प्रामाणिक पणे करतो कुणाचे हरामाचे पैसे खात नाही अशी बोचारी टिकाही शिरसाठ यांनी केली. आमची ऑटो युनियन सगळे मंत्री झाले फक्त एकनाथ शिंदे रिक्षा चालवत नव्हते मीही रिक्षा चालवत होतो, भाजपचे बावनकुळे, प्रताप सरनाईक हेही रिक्षा चालवत होते. आमची रिक्षा चालवणाऱ्यांची एक मोठी युनियन आहे आम्ही सगळे मंत्री झालो, सर्वसामान्य मोठे झाले पाहिजे असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाठ यांनी भोकर मध्ये आयोजित जाहीर सभेत केले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 26, 2025 04:18:47
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक आणि पाटील गटाचं एखाद्या विषयावर एकमत झालंय असं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादी घोळाबाबत महाडिक आणि पाटील यांनी एकमत नोंदविले आहे. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात नावे गेले असतील तर ती तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे असं निवेदन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले. प्रत्येक प्रभागात अशा प्रकारचा घोळ झाल्याने त दुरुस्त झाल्याशिवाय प्रारूप मतदार यादी अंतिम करू नये अशी मागणी देखील ऋतुराज पाटील यांनी केली आहे. याच विषयावर बोलत असताना भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो, त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे अशी आमचीही मागणी आहे अस म्हटलय.
107
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 26, 2025 04:18:14
104
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 26, 2025 03:52:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कसली कंबर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदयात्रे दरम्यान प्रतिस्पर्धी भाजपाने दिल्या शुभेच्छा - मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोहोळ शहरातून काढण्यात आली पदयात्रा - मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार - मोहोळ शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान चक्क प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपने दिल्या शुभेच्छा - आम्ही मैत्री जपत राजकारण करतो मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केली भावना - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांची मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका - आमदार राजू खरे यांनी पक्षाच्या विरोधात काम करत शिंदे सेनेचा प्रचार सुरू केल्याने माजी. आ. रमेश कदम संतप्त
101
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 26, 2025 03:52:01
Bhandara, Maharashtra:आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुढे मित्र पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला............मुख्यमंत्री फडणवीस यांचे कडे तक्रार करण्याची केली विनंती. Anchor: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा गोंदिया जिल्हा दौऱ्यावर होते यादरम्यान भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या तक्रारी ह्या शिंदे यांच्यापुढे मांडल्या भंडाऱ्यात पहिल्यांदाच आता राजकारणाची पातळी गाटत आहे आम्ही लोकांना सांगतो सरकारमध्ये जेव्हा आम्ही देवेंद्रजींना बघतो शिंदे साहेबांना बघतो अजित दादांना बघतो ते कधीच एकमेकांवरती टीका करत नाही आणि हे बघा भंडारा जिल्ह्याचे काही नेते जे नाबालिस आहेत ते महिला बद्दल उपशब्द वापरतात काही लोकांना सोडतात आणि आमच्याबद्देल वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करतात मी आग्रहाचे विनंती करेन साहेब आपणास की या सगळ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना थांबवायला पाहिजे पाहिजे गरज पडली तर देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण विनंती करावं की शेवटी आपण मित्र पक्षांमध्ये आहोत शेवटी आपल्याला एकत्र राहायचं आहे. उद्याच्या कोणाला एम एल सी ची गरज पडली कुणाला मतदान पदवीधर मतदार संघाची गरज पडली तर आमच्या दरवाजे दिसतात सगळे चकरा मारतात परंतु जेव्हा आम्हाला गरज पडते म्हणजे आम्ही आमच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे कार्याचे नाहीत काय? अशा पद्धतीने भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील मित्र पक्षांमध्ये असलेली परिस्थिती शेंडडे मांडली.
149
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 26, 2025 03:51:38
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप कडून आक्रमक भाषणबाजी करून प्रचारात धुरळा उडवला आहे. मात्र मोहिते पाटील यांच्या कडून आज पर्यंत केलेल्या विकासाचा डोस अकलूज मध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यात हाय व्होल्टेज लढत सुरू आहे. भाजप कडून मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक प्रचार सुरू आहे. पण मोहिते पाटील यांच्याืकडून त्या टीकेला संयम शालीनता ठेवून प्रचार सुरू आहे. अकलूज शहरात मोठ्या शहरातील अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. थेट सत्तेत असताना गावचा केलेला विकास हेच उत्तर विरोधकांच्या आक्रमक प्रचाराला दिले जात असून.
107
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 03:49:31
Nashik, Maharashtra:नाशिक महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या शहरातील ३१ प्रभागांच्या मतदार यादीतील घोळ निवारण्यासाठी सहा विभागांत ३१ पथकांची नियुक्ती करण्यातआलीये... प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्या. याबाबत महापालिकेत मंगळवारी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले... त्यासाठी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. पथकात महापालिकेने सहा विभागीय अधिकाऱ्यांसोबत एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात पाच अधिकारी असणार असून, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.....
149
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 26, 2025 03:49:12
189
comment0
Report
Advertisement
Back to top