Back
Shirsaath's sharp attack on Chavan family: money vs bread debate
SMSATISH MOHITE
Nov 26, 2025 04:20:23
Nanded, Maharashtra
शंकरराव चव्हाण म्हणायचे नांदेडला लंडन बनवणार, मी दोन तीन वेळा नांदेडला आलो पण मला काही बदल दिसला नाही अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी ही टीका केली. आज तर मी त्यांच्या मतदार संघातील गावात आलो, मला वाटले हे गाव तरी चांगले असेल परंतु काही नाही. ज्या लोकांनी एव्हढं मोठं राजकारण केलं, काम केलं ज्यांच्या आदर्शवर आम्ही राजकारण करतो ते गाव तर सर्वात सुंदर असेल असे वाटले होते अशी खोचाक टिकाही शिरसाठ यांनी केली.
भाकरी खाता की पैसे
एव्हढ्या सगळ्या एजंसी घेऊन करता, एव्हढा पैसा कश्याला पाहिजे, भाकरी खाता की नोटा अश्या शब्दात सामाजिक न्यायामंत्री संजय शिरसाठ यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी हे वक्तव्य केले. घरात पंधरा माणसे असली असती तर वाटण्या झाल्या असत्या आणि आपल्या वाट्याला काही येणार नाही असे असले तर समजू शकलो असतो असे म्हणत शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्यावर व्ययक्तिक टिकाही केली. संजय शिरसाठ टाईट राहतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझा फ्लॅट आहे काय आहे ते दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही, आपण प्रामाणिक पणे करतो कुणाचे हरामाचे पैसे खात नाही अशी बोचारी टिकाही शिरसाठ यांनी केली.
आमची ऑटो युनियन सगळे मंत्री झाले
फक्त एकनाथ शिंदे रिक्षा चालवत नव्हते मीही रिक्षा चालवत होतो, भाजपचे बावनकुळे, प्रताप सरनाईक हेही रिक्षा चालवत होते. आमची रिक्षा चालवणाऱ्यांची एक मोठी युनियन आहे आम्ही सगळे मंत्री झालो, सर्वसामान्य मोठे झाले पाहिजे असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाठ यांनी भोकर मध्ये आयोजित जाहीर सभेत केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 04:30:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 04:30:320
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 04:30:180
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:20:4671
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 04:20:3227
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:18:47128
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:18:24147
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 26, 2025 04:18:14136
Report
KPKAILAS PURI
FollowNov 26, 2025 03:52:36101
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 26, 2025 03:52:20101
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 03:52:01149
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 26, 2025 03:51:38170
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 03:49:45197
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 03:49:31149
Report